Saturday, 12 December 2015

नमस्कार लाईव्ह १२-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १२-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
 [आंतरराष्ट्रीय]
१- काबूलमध्ये काल संध्याकाळी झालेल्या कार बॉम्बस्फोटाची जबाबदारी तालिबानने स्वीकारली
~~~~~~~~~~~~~~~
 [राष्ट्रीय]
२- भारत-पाकिस्तानमध्ये काश्मीर महत्वाचा मु्द्दा रहाणार - इमरान खान
३- भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान ८० टक्के निधी देणार - मनोज सिन्हा, मंत्री 
४- वाराणसीतील दसश्वमेध घाटावर जपानचे पंतप्रधान शिंझो एब पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गंगाआरतीमध्ये सहभागी होणार
~~~~~~~~~~~~~~~
 [राज्य]
५- ...म्हणून सोनियांनी मला पंतप्रधानपद नाकारलं: पवार 
                            'पंतप्रधानपदावर स्वतंत्रपणे विचार करणारी व्यक्ती येऊ नये, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी सन १९९१मध्ये पंतप्रधानपदासाठी पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नावाला प्राधान्य दिले', असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षसोहळ्याचे गुरुवारी दिल्लीत आयोजन करण्यात आले होते.

६- जावेद अहमद सौदीत भारताचे राजदूत, कोण होणार मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
                            मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. सौदी सरकारकडून जावेद यांच्या निवडीला मान्यता मिळाल्यानं त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. जावेद अहमद लवकरच सौदीमधील राजदूत पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.जावेद हे 1980 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राकेश मारियांच्या उचलबांगडीनंतर जावेद अहमद यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. मात्र, आयुक्तपदावरुन अहमद यांना थेट सौदीमधील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. जावेद अहमद हे जानेवारी 2016 मध्ये ते निवृत्त होणार आहेत.

७- डान्सबार परवानगीचे नियम कडक; पैशाची उधळपट्टी, धुम्रपानावर बंदी 
                           सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरची बंदी उठवली खरी, पण पुन्हा डान्सबार सुरु होतील का याची काही शाश्वती देता येत नाही. सरकारच्या समितीने डान्सबारसाठी जी मार्गदर्शक तत्वं किंवा सूचना दिल्या आहेत, त्या सामान्यत: डान्सबार चालकांना पाळणं शक्य होईल का?
याबाबत शंका आहे.
सरकारच्या अटींनुसार
– डान्सबारमध्ये महिलावंर पैशांची उधळपट्टी करता येणार नाही
– डान्सबारमध्ये धुम्रपान करता येणार नाही
– डान्सबारमध्ये 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत असायला हवा
– पोलिसांनी मागणी केल्यास सीसीटीव्ही फुटेज द्यावं लागेल
– 18 वर्षाखालील महिलांना डान्सबारमध्ये नाच करता येणार नाही
– स्टेजवरुन बारबाला खाली येणार नाहीत
– ग्राहक आणि बारबालांमध्ये कायम 4 ते 5 फूट अंतर राहील
त्यामुळे डान्सबार पुन्हा सुरु करण्यासाठी या अटी आणि शर्तींचं पालन करताना चालकांच्या नाकीनऊ येणार हे स्पष्ट आहे.

८- 2027 पर्यंत मुंबई एण्ट्री पाईंटचे टोल सुरूच राहणार: शिंदे
                          मुंबई एन्ट्री पाईंटवरील पाचही टोलवसुलीचा झोल एबीपी माझानं दाखवला होता. मात्र, ठरलेल्या काळाप्रमाणे म्हणजेच 2027 पर्यंत ही टोलवसुली थांबवण्याचं कोणतंही कायदेशीर कारण नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मुंबईच्या पाच टोलमधून कंपनीला 1176 कोटी मिळाले असून, टोल आणि वाहन संख्येत दरवर्षी होणारी वाढ पाहता 16 वर्षाच्या टोल वसुलीच्या ठेक्यात कंपनीस तिप्पट नफा होणार खरं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिलं.

९- विधान परिषद निवडणुक : मनसे तटस्थ राहणार, काँग्रेसला होणार फायदा 
                      या महिन्याअखेरीस होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबईतील दोन जागांसाठी मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. मनसेच्या 28 नगरसेवकांच्या मतांवर डोळा असणार्‍या उमेदवारांची मात्र आता मोठी पळापळ होणार आहे. मनसेच्या या निर्णयाचा काँग्रेसला फायदा होणार आहे, तर भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. तर अपक्ष उमेदवार प्रसाद लाड यांनाही तगडी लढत द्यावी लागणार आहे. मनसेनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

१०- मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता 
११- आज १२ डिसेंबर शरद पवार, युवराज सिंग यांचा वाढदिवस तर गोपिनाथ मुंडे यांची जयंती 
१२- शरद पवारांची निवृत्तीची भाषा म्हणजे चकवा त्यावर कोणीविश्वास ठेवू नये - सामना 
१३- विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस 
~~~~~~~~~~~~~~~
 [प्रादेशिक]
१४- RSSच्या कार्यकर्त्यावर विषप्रयोग, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने विषाचं इंजेक्शन 
                        सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रमेश पारिसनाथ शेटे यांच्यावर विषारी इंजेन्शनचा हल्ला करण्यात आला. रमेश शेटे काल पहाटे फिरायला गेले असता, दोघा अज्ञात व्यक्तींनी टोकदार वस्तूने त्यांच्या मानेवर वार केला. त्या व्यक्तींनी इंजेक्शनद्वारे विषप्रयोग केल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरातील एका खाजगी रुगाणालयात दाखल केलं आहे.

१५- पश्चिम बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी भाजपने आरएसएस स्वयंसेवक दिलीप घोष यांची नियुक्ती 
१६- काल रात्री नवी दिल्लीमध्ये अनेक गाड्या एकावर एक आपटून झालेल्या विचित्र अपघातात सहाजण जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- परळीत गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त स्मारकाचा लोकार्पण सोहळा 
१८- जिया खानच्या आईचा सीबीआयविरोधी पवित्रा 
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१९- बंधाऱ्याचा तुटलेला दरवाजा बसविला, पाठबंधारेविभागाकडून हस्तांतरणाला दिरंगाई 
२०- मुदतबाह्य औषधीवर मुदतीचे लेबल चिकटवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून व्यापाऱ्यावर गुन्हा 
२१- धर्माबाद तालुक्यातील सालेगावात महिलेचा विनयभंग 
२२- 'मनारेगा'चि कामे करा, अन्यथा कारवाई जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा ग्रामसेवकांना दम 
२३- बिलोली; ३५ एकरमध्ये अतिक्रमण तलावाच्या हद्दीसाठी ६३ जणांना नोटीसा 
२४- शहरावरील पाणी टंचाईचे संकट होणार, सांगावी येथील महापालिकेच्या पर्यायी उदभव पाणीपुरवठा योजनेची यशस्वी चाचणी 
~~~~~~~~~~~~~~~
 [वाढदिवस]
अश्विनी वडिवाळे, नेताजी देशमुख, रणवीर देशमुख, पिंटू दुर्रानी, संतोष सिंगारे, किशोर चौधरी, समभा पाटील, नितीन जोशी, गाझी काझी, गजानन मुधळ, सोपान मुंडे, मनोज लंगडे, अभिषेक कंठाळे, मीना नागा, अमोल खतगावकर, गजानन कल्याणकर, राजसिंग रामगडिया,

निर्मल सोनोवाल, शिवराज जाधव, संजय पाटील, राम पवार, अनिल चवरे, अल्पेश भावसार, सचिन देसाई, मनोज वाघमारे, गंगाधर पवळे, माधव झुन्झारे, रमेश मोरे,
~~~~~~~~~~~~~~~
 [सुविचार]
कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही...
[प्रकाश नरवाडे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस. स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता- ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/sss-sports-food-supplements.html
~~~~~~~~~~~~~~~
जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456
8975495656

No comments: