नमस्कार लाईव्ह ०९-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- इंडोनेशियामध्ये भूकंपाचे धक्के, 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के
२- अफगाणिस्तानच्या कंधार विमानतळावर काल तालिबान या दशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात ३१ जण ठार
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्यावर्षी पाकिस्तान दौ-यावर जाणार - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची इस्लामाबादमध्ये माहिती
पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होत असलेल्या सार्क बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले आहे. हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी त्या पाकिस्तानमध्ये आल्या असून त्यांनी मोदींच्या उपस्थितीबद्दल माहिती दिली आहे.
स्वराज यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांची भेट घेतली असून दळणवळण, दहशतवाद आदी मुद्यांवर चर्चा केली. जवळपास अर्धा तास झालेल्या या चर्चेमध्ये अफगाणिस्तान पाकिस्तानच्या ट्रेड अँड ट्रान्झिट अग्रीमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी भारत उत्सुक असल्याचेही स्वराज यांनी सांगितले आहे.
४- तामिऴनाडूतील नैसर्गिक आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पत्राव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली मागणी
५- आसाम अशांत करण्याचं भाजपाचं षडयंत्र - मुख्यमंत्री तरूण गोगोई
आसाममध्ये कायदा व सुव्यवस्थेची समस्य निर्माण करण्याचं आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र भाजपा रचत असल्याचा आरोप मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी केला आहे. मोदी सरकारने दिलेली वचने पूर्ण करण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आजच्या दिसपूर घेरावचे आयोजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना गोगोई म्हणाले की, राज्यामध्ये धार्मिक तणाव निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न असून मंदीरामध्ये बीफ ठेवण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं अशी गुप्तचरांची माहिती आहे. कट्टरतावाद्यांना, ज्यामध्ये बंडखोर आणि जिहादी यांचा समावेश आहे, अशांना भाजपा प्रोत्साहन देत असल्याचा आरोप गोगोईंनी केला आहे.
६- राहुल गांधींच्या चपला माजी केंद्रीय मंत्र्याने उचलल्या
पक्षश्रेष्ठींच्या चपला उचलून ‘निष्ठा’ दाखवण्याचे प्रकार भारतात नवे नाहीत. त्यातच काँग्रेसमध्येतर असे प्रकार अनेकवेळा घडले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती पदुचेरीतही झाली. पूरग्रस्त पदुचेरीच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चपला उचलून, माजी केंद्रीय मंत्र्यांने ‘निष्ठा’ दाखवण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री आणि काँग्रेसचे कायदे सल्लागार व्ही नारायणसामी यांनी हा पराक्रम गाजवला. राहुल गांधी पूरपरिस्थितीचा आढावा घेत होते. पाणी साचलेल्या परिसरातून जाताना, त्यांनी बूट काढले. त्यावेळी नारायणसामी यांनी चप्पल हातात घेऊन राहुल गांधींना दिल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे.
७- नॅशनल हेराल्ड प्रकरण हा १०० टक्के राजकीय सूड - राहूल गांधी
नॅशनल हेराल्ड खटला हा १०० टक्के पंतप्रधान घेत असलेला राजकीय सूड असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी व्यक्त केली आहे. अर्थात, न्यायालयीन व्यवस्थेवर आपला संपूर्ण विश्वास असल्याचेही गांधी म्हणाले. मात्र, न्यायालयीन व्यवस्थेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस संसदीय कामकाजाचा गैरवापर करत असल्याच्या आरोपाचा मात्र त्यांनी इन्कार केला आहे. हा १०० टक्के राजकीय सूड आहे, या शब्दात त्यांनी नॅशनल हेराल्ड खटल्याचे - ज्यामध्ये सोनिया गांधी व राहूल गांधी यांना १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे - वर्णन केले आहे. संसदेबाहेर पत्रकारांशी ते बोलत होते. सगळ्यात शेवटी न्यायाचा विजय होईल आणि सत्य समोर येईल असेही त्यांनी सांगितले.
८- चेन्नईतील शाळा, कॉलेज येत्या १३ डिसेंबरपर्यंत बंद
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- शेतकऱ्याचे नाव: एकनाथ गणपतराव खडसे, काही तासात 30 लाख रुपयांची सबसिडी बँकेत जमा !
एकनाथराव गणपतराव खडसे… मुक्ताईनगरचा एक सामान्य शेतकरी… या शेतकर्याने सबसीडीसाठी अर्ज केला आणि या शेतकर्याला अनुदान देण्यासाठी प्रशासन वेगानं कामाला लागलं. काही दिवस नव्हे, महिने नव्हे तर काही तासांतच हरितगृह उभारणीसाठी मिळणारं अनुदान या शेतकर्याच्या बँकेत जमाही झालं. याच भागातील अशोक मोरेश्वर, पुजाजी किसन झोपे, अरुण रायपुरे यांनी फलोत्पादन सबसीडी मिळावी म्हणून 2013 -14 ला अर्ज केलाय. एक वर्ष लोटलं तरीही या शेतकर्यांची फाईल जागची हलली नाही.
राज्यात बस पाससाठी शेतकर्यांची मुलगी आत्महत्या करते. शेतकर्यांच्या आत्महत्या खरी की खोटी सिद्ध करण्यासाठी नातेवाईक प्रशासनाचे उंबरठे झिजवताय. पण, फाईली हलत नाही. मात्र, खडसे यांना 38 लाखांची सबसीडी देण्यासाठी गतिशिलतेनं कामाला लागलं. तीच गतिशिलता सरकारनं इतर शेतकर्यांबाबत जरी दाखवली तरी शेतकरी आत्महत्येचा आकडा निश्चितच खाली येईल.
१०- स्मार्ट सिटी ही अत्यंत फसवी योजना: राज ठाकरे
‘स्मार्ट सिटी ही अत्यंत फसवी योजना असून हा केंद्राचा राजकीय खेळ आहे.’ अशी घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ‘महापालिकेने केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकार करु पाहत आहे आणि त्यामुळेच मनसेचा या योजनेला विरोध आहे.’ अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
११- सलमान दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे पुरावे नाहीत : हायकोर्ट
१२- कोल्हापूर : काँग्रेसच्या महादेवराव महाडिक यांची बंडखोरी, विधानपरिषदेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज
१३- विधानपरिषद : शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा अर्ज दाखल, अकोला-वाशिम-बुलडाणा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज
१४- सोलापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून प्रशांत परिचारक यांचा उमेदवारी अर्ज दाखल
१५- दिवा ‘धूर’कांड प्रकरणी 55 ड्रम्स सापडले
मुंबईतील दिवा-शिळ रोड मंगळवारी रात्री धुराचं साम्राज्य पसरल होतं. इथल्या डम्पिंग ग्राउंड वर कुणीतरी रसायन आणून टाकल्याने हा धूर पसरला होता. दिवा डम्पिंग ग्राऊंडवर केमिकलचे 55 ड्रम्स सापडले आहेत. या केमिकलच्या त्रासामुळे अग्निशामक दलाचा एक अधिकारी अत्यवस्थ झालाय. त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
१६- राज्यातील साखर कारखाने बंद राहण्याची शक्यता, साखर कामगार २ जानेवारीपासून बेमुदत संपावर
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- औरंगाबादमधील सहा महिने कोंडून अमानवीय आत्याच्यार केलेल्या पिडीत महिलेला एक लाख वीस हजार रुपयांना खरेदी केल्याचे उघड
औरंगाबादमधील विवाहितेला सहा महिने एका खोलीत कोंडून तिच्यावर अमानवीय अत्याचार केल्याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आहे. आरोपी संजय अग्रवालने सारिकाला 1 लाख 20 हजार रुपयांना खरेदी केल्याचं उघड झालं आहे.
औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे परभणीतील ऊसतोड कामगाराची मुलगी असलेल्या सारिका अग्रवालची विक्री मावशीनेच केल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे. या संदर्भात पोलिसांना अग्रवाल कुटुंबियांकडे काही बाँड सापडले आहेत. संजय अग्रवाल याचं हे तिसरं लग्न आहे. या संपूर्ण प्रकारात कोणतं रॅकेट कार्यरत आहे का, याचा तसाप पोलिस करत आहेत.
१८- मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात बावनदीजवळ एसटी आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात
१९- चाकणजवळ जीप चालकाने दुचाकीला उडवल, ३ ठार
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- अभिनेता सलमान खान हिट अँड रन प्रकरण, उद्या अंतिम निकाल
सलमान खान हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण या घटनेतील महत्त्वाचे साक्षीदार कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांची साक्ष विश्वासार्ह नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे रवींद्र पाटील यांची साक्ष फेटाळण्याची शक्यता आहे. या घटनेतील साक्षीदार असलेल्या रवींद्र पाटील यांचा काही वर्षापूर्वीच मृत्यू झाला आहे. पण त्याआधी पाटील यांनी साक्ष दिली होती. यामध्ये सलमान खान मद्यप्राशन करुन गाडी चालवत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पाटील यांची साक्ष सलमान खान हिट अॅन्ड रन प्रकरणी ग्राह्य धरली जात होती.
२१- लाखो देऊन लिलावात घेतलेली दाऊदची कार 'तो' जाळणार
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील संपत्तीचा लिलाव सुरु झाला आहे. दाऊदच्या कथित गाडीची 3 लाख 32 हजार रुपयांना एका इसमाने खरेदी केली आहे. दाऊदच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह गाडीचं दहन करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. पाकमोडिया स्ट्रीटवरील त्याच्या ‘दिल्ली जायका’ हॉटेलसाठी आयकर विभागाकडून 1 कोटी 18 लाखांची किमान किंमत निश्चित करण्यात आली आहे. अत्यंत कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत दाऊदच्या संपत्तीच्या लिलावाला सुरुवात झाली. संपत्ती दाऊदची असल्यामुळे फार कमी व्यक्तींनी त्यात रस दाखवल्याचं म्हटलं जातं.
२२- मुंबई : अभिनेत्री जिया खान आत्महत्याप्रकरणी सीबीआयने आरोपपत्र दाखल केले
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२३- सचखंड एक्स्प्रेस आणि श्री गंगानगर एक्स्प्रेस दिनांक १०/१२/२०१५ रोजी नांदेड येथून उशिरा सुटणार
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~
२४- मुखेड येथे भव्य पशु पालक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_90.html
~~~~~~~~~~~~~~~
२५- मौजे आंबुलगा ता.मुखेड येथे विशेष ग्रामसभा संपन्न
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_56.html
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या, पण सांडण्या अगोदर ते वाटायलाही शिका
[रुपाली इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
स्वतंत्र विदर्भाची मागणी योग्य आहे का?
अ- होय
ब- नाही
क- तटस्थ
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment