Thursday, 10 December 2015

विना अनुदानित शिक्षकांचा विराट महामोर्चा विधान भवनावर



(कायम)विना अनुदानित शाळा कृती समिती==============  
                             विना अनुदानित शिक्षकांचा विराट महामोर्चा विधान भवनावर धडकला. मोर्चा मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून जवळपास 15000 शिक्षक सहभागी झाले आहेत. मोर्चाचे नेतृत्व आ.नागो गाणार, आ.विक्रम काळे, आ. बाळूभाऊ धानोरकर, शेखर भोयर, माजी आमदार भगवानआप्पा साळुंखे, कृती समितीचे अध्यक्ष तात्या म्हसकर, खंडेराव जगदाळे, प्रशांत रेडीज, अरूण मराठे, पुंडलिक रहाटे, बाविस्कर सर, ऊदय देशमुख, एस.के.वाहुरवाघ,सुरेश सिरसाट,  बाळकृष्ण गावंडे, दिपक देशमुख, पठाण सर, अजय भोयर, अमित भाई प्रसाद व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. सर्व प्रथम मोर्चा यशवंत स्टेडियम येथे गेला त्या ठिकाणी श्रीराम सेनेचे अध्यक्ष रणजित सफेलकर बाविस्कर सर  व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यानी स्वागत करून ते बहुसंख्येने  सहभागी झाले होते. त्या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले व जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही असे सांगितले. तेथून मोर्चा विविध मार्गाने जावून रेल्वे स्टेशन परिसरातून जात असताना ठिक ठिकाणी बराच वेळ रस्ता जाम होवून नागरिकाना प्रचंड प्रमाणात त्रास झाला व पुढे निघून कस्तुरचंद पार्क येथे अडविण्यात आला.मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले.


 सभेला  आ.बाळूभाऊ धानोरकर ,शेखर भोयर, कृती समितीचे ऊपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, प्रशांत रेडीज, यांनी संबोधित केले. दरम्यान जेवणाची चोख व्यवस्था श्री राम सेनेच्या वतीने करण्यात आली. नंतर विविध आमदार व कृती समितीच्या पदाधिकारयांना चर्चेकरिता बोलविण्यात आले. परंतु समाधानकारक चर्चा झाली नसल्यामुळे कृती समितीने मोर्चा विसर्जित न करता भर रस्त्यावर मोर्चा मुक्कामी ठेवण्याचे ठरविले. सध्या सर्वच शिक्षकांनी थंडी मध्ये रस्त्यावर मुक्काम ठोकला आहे. सलाम त्या शिक्षकाला . सभागृहात काय चर्चा होते व काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. धन्यवाद.

No comments: