Thursday, 10 December 2015

नमस्कार लाईव्ह १०-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १०-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
 [आंतरराष्ट्रीय]
१- मुस्लिमांच्या समर्थनासाठी उतरला फेसबुक संस्थापक झुकरबर्ग 
             पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिमांविरोधी वाढत चाललेल्या असंतोषाविषयी फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गनं चिंता व्यक्त केली आहे. फेसबुकवर पोस्ट अपलोड करुन झुकरबर्गनं मुस्लिम धर्मियांना पाठिंबा दर्शवला आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा या नात्यानं मी समस्त मुस्लिमांच्या हक्कासाठी लढत राहीन. मुस्लिमांसाठी सुरक्षित आणि शांतीचं वातावरण तयार व्हावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही या पोस्टमध्ये झुकरबर्गनं म्हटलं आहे.

२- तालिबानने कंदहार विमानतळावर केलेल्या हल्ल्यातील मृतांचा आकडा ५० पर्यंत पोहोचला - एएफपी 

३- तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचा प्रमुख आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू इमरान खान ११ डिसेंबरला भारतात येणार 
~~~~~~~~~~~~~~~
 [राष्ट्रीय]
४- नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून राज्यसभेत पुन्हा गोंधळ 

५- देशद्रोहाच्या खटल्यामध्ये हार्दिक पटेलने जामिनासाठी दाखल केलेला अर्ज सूरत सत्र न्यायालयाने फेटाळला 

६- राष्ट्रीय हरीत लवादाने (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) गौमुख ते हरिव्दार पर्यंत संपूर्ण प्लास्टिक बंदीचे दिले निर्देश. गंगेमध्ये प्रदूषण केले तर, उद्योग बंद करणार 

७- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज पाकिस्तान दौ-याबदद्ल संसदेत देणार निवेदन 
~~~~~~~~~~~~~~~
 [राज्य] 
८- धनगर आरक्षण आणखी दीड वर्ष रखडलं, धनगर आणि धनगड शब्दामुळं घोळ 

९- कांद्याचे निर्यातमूल्य घटवा, शिवसेना खासदारांचं दिल्लीत आंदोलन 

१०- कोयना धरणाच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के 
                     सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान हे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ही 2.90 रिश्टर स्केल इतकी होती. कोयना धरणापासून 12 किलोमीटर अंतरावर गोशेटवाडी हे भूकंपाचे केंद्रस्थान आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांनी घबराट निर्माण झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आधीही याच परिसरात भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहे.

११- रमेश कदमांचा प्रताप, तब्बल 59 गाड्या धूळ खात 
                   शेतकर्‍यांनी उत्पादन केलेला माल थेट ग्राहकांना विकण्यासाठी ‘ताजी भाजी तुमच्या दारी’ ही योजना सुरू केली होती. त्यासाठी शेतातील ताज्या भाज्या तात्काळ ग्राहकांना विकण्यासाठी 59 गाड्या खरेदी केल्या होत्या. या खरेदी केलेल्या गाड्या लाभाथीर्ंना देण्यासाठी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सरकारने आदेशही काढले. पण हे आदेश फक्त कागदावरच राहिलेत. प्रत्यक्षात या गाड्या आजही ठाणे शहरात धूळ खात पडून आहेत. त्यामुळे या कोट्यवधीच्या गाड्यांचं पुढे होणार काय हा प्रश्न उपस्थित झालाय.

१२- हरियाणात फक्त साक्षर असलेल्या व्यक्तींनाच लढवता येणार पंचायतीची निवडणूक 
~~~~~~~~~~~~~~~
 [प्रादेशिक]
१३- छत्तीसगडमधील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांचा लष्करी तळावर हल्ला, एक जवान शहीद 

१४- कल्याण: अण्णाभाऊ साठे नगरमधील रहिवाशांनी अडवून धरल्या कचऱ्याच्या गाड्या, डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी स्थानिकांचं आंदोलन 

१५- साकोली तालुक्यात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, पहाटे साडेतीनच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरची घटना 

१६- नागपुरात स्टंटबाजांचा धुमाकूळ, बॅरिकेट्स उडवलं  
             हिवाळी अधिवेशनासाठी राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ आणि राज्यातले आमदार नागपुरात आहे. त्यासाठी विधानभवनासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणं अपेक्षित आहे. मात्र, काल रात्री साडेतीनच्या सुमारास विधानभवनाबाहेरच 5 बाईकस्वार स्टंटबाजांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. या स्टंटबाजांनी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेट्सचीही नाधसूस केली. यात पाचही स्टंटबाज जखमी झालेत. त्यातले दोघे गंभीर आहेत.

१७- चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची गळा आवळून हत्या 
                  चारित्र्याच्या संशयावरुन प्रियकरानं आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुमार पाटील याला अटक करण्यात आली आहे. कुमार याचे मिनल नावाच्या तरुणीशी वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. विशेष म्हणजे कुटुंबियांची सहमती असल्यानं दोघं लग्नही करणार होते. मात्र, गेल्या काही दिवांपासून मिनलच्या चारित्र्यावर संशय घेवून ती आपल्याशिवाय इतर कोणावरतरी प्रेम करीत असावी असं संशयाचं भूत कुमारच्या डोक्यात घुसलं होतं. फिरायला जाण्याच्या बहाण्यानं मिनलला अकलोलीला नेलं. तिथं एका लॉजमध्ये कुमारनं मिनलचा ओढणीनं गळा आवळून तिला ठार केलं. मिनलने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव कुमारनं सुरुवातीला रचला. मात्र, मिनलच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी तपासात कुमारनं मिनलच्या हत्येची कबुली दिली.

१८- मातीच्या मूर्तीच्या बोटांमधून पाणी.. 
                      शिर्डीत सध्या भाविकांची एकच रीघ लागलीय... ती भोजन तयार करणाऱ्या साईंच्या मूर्तीच्या दर्शनासाठी...साईबाबा आपल्या भक्तांसाठी भोजन तयार करतात, अशी मूर्तिरुपी प्रतिकृती शिर्डीतील नवीन प्रसादालयासमोर तयार करण्यात आलेली आहे. या मूर्तीच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटामधून मंगळवारी थेंब थेंब पाणी पडत असल्याचं काही भाविकांच्या लक्षात आलं. जवळपास अर्धा तास मूर्तीच्या बोटांमधून पाणी खाली पडत होतं. मूर्तीच्या बोटांमधून पाणी का पडत होतं? याचं शास्त्रीय कारण अद्याप माहीत पडलं नसलं तरी साईंच्या भाविकांना मात्र हा साईंचाच 'चमत्कार' असल्याची खात्री आहे. अर्थातच, व्हॉटसअप आणि सोशल मीडियामुळे ही बातमी पसरायला वेळ लागली नाही...  प्रत्यक्षदर्शी भाविकांनी व कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर त्याचे चित्रीकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ग्रुपवर टाकले... आणि साईंचा हा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांनी एकच तुंबड गर्दी केली.


१९- कार्ल्याचं प्रसिद्ध एकविरा देवीचं मंदिर 'अनधिकृत' 
                     सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मावळच्या तहसीलदारांनी कार्ल्याचे एकविरा देवीचं मंदिर अनधिकृत ठरवलंय. उल्लेखनीय म्हणजे, राज्यातल्या लाखो भाविकांचं तसंच ठाकरे घराण्याची ही कुलस्वामिनी आहे.  या मंदिरासह तालुक्यातल्या ३५ गावांमधली ३८ अनधिकृत धार्मिक स्थळं अनधिकृत ठरवण्यात आली आहेत. मात्र यावर एकविरा देवस्थान विश्वस्त मंडळानं आक्षेप घेतलाय. या मंदिराचा १८५७ च्या गॅझेटमध्येही उल्लेख असल्याचा दावा मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते अनंत तरे यांनी केलाय.

२०- औरंगाबादमधील बिडकीन येथील शेतातील घरावर दरोडा, २० हजारांची लूट. दरोडेखोरांनी घरातील लोकांना केली मारहाण, २ जण जखमी 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- हिट अँड रन प्रकरण: संशयाच्या आधारे सलमानला दोषी ठरवले जाऊ शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय 
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड] 
२२- माहूर तालुक्यातील चार ग्रामसेवक निलंबित, मुख्य-कार्यकारी अधिकाऱ्यांचा दणका 
२३- किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे नापिकीस कंटाळून महिला शेतकऱ्याची आत्महत्या 
२४- अंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत बाराशे शिक्षक 
२५- लातूर; सराफा बाजारातील कारागीरच्या दुकानातून एक किलो सोने लंपास 
२६- पोलीस पाटील पदी महिलांची संख्या वाढणार, तीस टक्के जागा राखीव ठेवण्याचे निर्देश 
२७- ऑनलाईन मागविला मोबाईल अन मिळाली मनगटी घड्याळ, ऑनलाईन शॉपिंग कंपनीचा ग्राहकांना गंडा 
२८- ६४ लाख २४ हजारांची रक्कम हडप करणाऱ्या व्यंकटेश लोणेसह ८ जणांना अटकपूर्व जमीन नाकारलं 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२९- मुंबई; दामू नगर मधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_10.html

~~~~~~~~~~~~~~~
३०- विना अनुदानित शिक्षकांचा विराट महामोर्चा विधान भवनावर
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_84.html

~~~~~~~~~~~~~~~
३१- हिमायतनगरच्या आदिवासी वस्तीग्रहातील विद्यार्थांना शिक्षणसाठी भोगाव्या लागतात नरक यातना
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_36.html

~~~~~~~~~~~~~~~
३२- वडोदा वनक्षेत्रात बिबट्याने केली गाय फस्त
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_12.html

~~~~~~~~~~~~~~~
 [वाढदिवस]
विकास भोसले, अमोल बारेकर, गणेश कानवडे, विकी चालीन्द्रावर, अविनाश पोफाळे, संदीप धुमाळ, तेजस भिंगारे, मारोती कंठेवाड, सोनू यादव. सुरेश हणमंते, गणेश वडजे, वैभव कुलकर्णी, गिरीश पारसेवार, क्षितीज जाधव, भवानी सिंग, मोहम्मद फाझ्लेराब्बी, सरिता कुमारी, अभिजित चौन्गुले, मधु डोंगलीकार, अशोक मुंडे, पप्पू शर्मा, सुधीर विश्वासराव, महेश राठोड, अनिकेत सांगवी 
~~~~~~~~~~~~~~~
 [सुविचार]
कर्तुत्व कधीच कौतुकावर अवलंबून नसाव .
कारण कौतुक हे अल्पायुषी असतं पण कर्तुत्व हे आयुष्यभर टिकवाव लागतं
[नरेश तटकरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
स्वतंत्र विदर्भाची मागणी योग्य आहे का?
अ- होय
ब- नाही
क- तटस्थ
http://namaskarlivenanded.blogspot.in/?m=0
~~~~~~~~~~~~~~~
जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments: