पाणीच पाणी अबबबबब .......
* जलवाहिनी ला अनेक ठिकाणी लागली गळती
* बिलोली पालिकेचे दुर्लक्ष
* शहराला दोन दिवासाड पाणीपुरवठा
* सुरळीत पाणीपुरवठा करावी अशी शहरवासियांची मागणी
बिलोली : ( यादव लोकडे )
येथिल नगर पालिकेच्या दुर्लक्ष कारभारामुळे बिलोली शहराला केले जाणाऱ्या जलवाहिनी ला अनेक ठिकाणी गळती लागली असून यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून याकडे दुर्लक्ष झाले आहे ही जलवाहिनी मुख्य रस्त्यालगत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी अबबबब..... पाणीच पाणी म्हणून प्रशासनाच्या अक्षम्य कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत
गेल्या काही वर्षापासून सबंध महाराष्ट्रात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकरी नापिकीमुळे हवालदिल झाला आहे तर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेले व पाण्यासाठी नागरिक भटकंती करित असलेले वृत्त दररोज विविध वृत्तपत्रात दररोज आपण वाचत असतो परंतु बिलोली नगरपालिकेने बिलोली शहराला भविष्यात पाण्याचा प्रश्न उदभवू नये व पाण्याचा योग्य वापर व्हावा या उद्देशाने सन 1997 साली तत्कालीन नगरध्यक्ष यांनी जवळपास 2 कोटी रूपये खर्च करून सगरोळी मांजरा नदिपात्रातून बिलोली शहरापर्यत 12 किमी जलवाहिनी च्या मदतीने पाणी शहराला पुरवठा करीत असते . एकीकडे पाण्याचा दुष्काळ असताना ही जलवाहिनी मुख्य रस्त्याच्या लगत असल्यामुळे या परिसरात मात्र प्रशासनाच्या अक्षम्य कारभारामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . गत विस वर्षापुर्वी करण्यात आलेल्या या जलवाहिनी ला अनेक ठिकाणी गळती लागली असून यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे . या जलवाहिनी चे करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे काम नजरेस आले असून सध्या शहराला दोन दिवसाड पाणी पुरवठा केला जात असला तरी या गळत्या जलवाहिनीकडे कुणीही लक्ष दिले नाहीत तर अनेक वेळा शहरवासियांनी नगरपालिकेवर घागर मोर्चा काढून पाणी टंचाई निवारण मागणी केली असली तरी प्रशासन कुठलेही पाऊल उचलत नाही नगरपालिकेने वेळीच लक्ष देऊन ही गळत थांबवावी व सुरळीत पाणी पुरवठा करून शहर वासियांची तहान भागवावी अशी मागणी होत आहे ......

No comments:
Post a Comment