‘चकरा नखरा… चकरा नखरा… शांताबाई, शांताबाई’ म्हणत… अवघ्या महाराष्ट्रला थिरकायाला लावणाऱ्या ‘शांताबाई’ गाण्याची चर्चा दिवसेंदिवस चांगलीच रंगू लागली आहे. या गाण्यावरील अनेक मजेशीर व्हिडिओही गेले अनेक दिवस सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. मात्र, आता या गाण्याचा ऑफिशियल व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला आहे.
सुरवातीला दहिहंडी, गणपती विसर्जनात वाजलेलं शांताबाईने नंतर गरब्यातही ताल धरला. अन् आता तर थेट एका चॅनलच्या अवॉर्ड सोहळ्यात अभिनेत्रींनीही शांताबाईवर दणकेबाज परफॉर्मन्स दिला आहे.
दिवसेंदिवस हे गाणं भलतंच लोकप्रिय होत आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या यू-ट्यूबवरील या गाण्याच्या व्हिडिओलाही तब्बल 50 हजाराच्यावर हिट्स मिळालेले आहेत. हे गाणं काही दिवसांपूर्वीच चित्रित करण्यात आलं असून यातील अनेक कलाकार नवखे आहेत. मात्र, गाण्याप्रमाणेच या कलाकारांनीही डान्स करताना अक्षरश: कल्ला केला आहे.
गीतकार, संगीतकार संजय लोंढे यांच्या शांताबाई गाण्याला अवघ्या महाराष्ट्राने आधीच डोक्यावर उचलून घेतलं आहे. आता नुकत्याच लाँच झालेला हा व्हिडिओही हजारो जणांनी पाहिला आहे.
No comments:
Post a Comment