Monday, 19 October 2015

नमस्कार लाईव्ह दि. १९-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह दि. १९-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- डाळीचा साठा करण्यावर पुन्हा निर्बंध लागू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तातडीने आदेश
२- सावरकरही गोमांस सेवनाचा सल्ला देत, गोमांस सेवनावरुन सुरु झालेल्या वादात आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचीही उडी
३- बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये राडा घालणाऱ्या 10 शिवसैनिकांना सत्र न्यायालयाकडून जामीन, प्रत्येकी 2 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका
४- आम्ही शिवसेनेच्या मताशी सहमत नाही, आपले खेळाडूही देशाबाहेर जातात, हे लक्षात असू द्या, मुंबईत मॅच झाल्यास आम्ही संरक्षण देऊ - रावसाहेब दानवे
५- आंदोलन करणे शिवसेनेचा अधिकार, निषेध करणार नाही : भाजप
६- नागपुरात तब्बल २५ टन तूर डाळ चोरीला गेल्याची घटना उघडकीस… मुंबईतून नागपुरात ट्रक मध्ये तूर आणली जात असताना झाली चोरी…
७- जम्मू-काश्मीरमधील अपक्ष आमदार इंजिनियर रशीद यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक
८- मराठवाड्याला पाणी देण्यावरुन उत्तर महाराष्ट्राच्या नेत्यांचा विरोध, आंदोलनात शिवसेनाही सहभागी
९- बलात्काराचा आरोपी अभिनेता विशाल ठक्करनं केलं सरेंडर
१०- उद्या दि.२० मंगळवारी माजी मुख्यमंत्री, खा.अशोकराव चव्हाण, यांची हिमायतनगर येथे जाहीर सभा
~~~~~~~~~~~~~~~~
११- असाध्य रोगांपासून स्वत: बचाव, उपाययोजना करण्याच्या तत्वावर नांदेडयेथे १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान 'स्वदेशी चिकित्सा शिबीर'
~~~~~~~~~~~~~~~~

१२- किनवट तालुक्यातील बोधडी (बु) येथील आदिवासी शेतकर्‍याचा खून, आठ दिवसांत घटनेचा छडा, मारेकर्‍यास पोलिस कोठडी
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २५ºC / ३४ºC आहे
उद्या दि. २०-१०-२०१५चे हवामान अंदाज
२३ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
कुणी चांगले म्हणावे म्हणूनकाम करू नका, आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नका.
(आनंद कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: