Tuesday, 27 October 2015

धर्माबाद मार्केट यार्डमध्ये सोयाबीन, उडीद, मुग न्या मालाचा लिलाव बंद झाल्याने तहसीलदारांना निवेदन



धर्माबाद मार्केट यार्डमध्ये सोयाबीन, उडीद, मुग न्या मालाचा लिलाव बंद झाल्याने तहसीलदारांना निवेदन

धर्माबाद(माधव हणमंते, प्रतिनिधी)---
धर्माबाद मार्केट कमिटी येथे दि- १८-१०-२०१५ रोजी सोयाबीन, उडीद, मुग हा माल विक्रीसाठी आणला आहे. महागाईच्या मुद्यांमुळे गोदामावर धाडसत्र चालू असल्यामुळे दि.२०-१०-२०१५ पासून मार्केट कमिटीमध्ये मालाचा लिलाव बंद आहे. शेतकऱ्यांचा माल विक्री होत नाही. दिवाळी सन समोर समोर असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी अर्थी अडचण निर्माण झाली आहे.
अगोदरच दुष्काळात होरपळत असलेला शेतकरी शासनाच्या या नवीन आडमुठ्या धोरणामुळे त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी  तहसीलदार व उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिले आहे.
निवेदन देतेवेळी पांडुरंग पाटील चिंचोलीकर, सभापती गणेशराव पाटील करखेलीकर, गोविंद रोशगावकर, गोविंद सोनटक्के, माधव पा. शिंदे, सुधीर येलमे, मिर्झा गफ्फार, अशोक कदम, दावाजी आगलावे व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

No comments: