Sunday, 18 October 2015

अंगणवाडयांमधून बालकांवर चांगले संस्‍कार रुजविण्‍यासाठी अंगणवाडी कार्येकर्तींनी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी केले.



कंधार तालुक्‍यातल्‍या सोमठाणा येथे नुतनिकरण करण्‍यात आलेल्‍या अंगणवाडीचे उदघाटन वर्षाताई भोसीकर यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. सरपंच धोंडूबाई गित्‍ते, जिल्‍हा कॉग्रेस कमिटीचे जिल्‍हा सरचिटणिस संजय भोसीकरहरीहर पाटील कुरुळेकरजिल्‍हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारेअभियंता विशाल कदमअंगणवाडी पर्यवेक्षीका सर्कलवाड, अंगणवाडी कार्यकर्ती राधाबाई बालाजी गिते, मंजुळा संग्राम गिते, देऊबाई किशनराव आनकाडे, प्रतिभा सुभाष गायकवाड, आशा बालाजी कागणे, शिवनंदा विठ्ठल गुट्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, मुलांवर योग्‍य संस्‍कार रुजविण्‍यासाठी आंगणवाडयांमध्‍ये भौतिक सुविधा निर्माण करणे आवश्‍यक असून मुलांना विविध खेळांचे व बुध्‍दीमत्‍ता वाढविणारे विविध खेळ, तसेच पोषण आहाराची आवश्‍यकता आहे. परंतु अनेक गावांमध्‍ये कुपोषित मुले आढळून येतात. या कुपोषणमुक्‍तीच्‍या चळवळीला फुलवळ सर्कलमधून सुरुवात करण्‍यात आली आहे. या जनजागृतीसाठी अंगणवाडी कार्यकर्तीने गृहभेटीमध्‍ये मुलांच्‍या पोषण आहाराविषयी त्‍यांच्‍या पालकांशी चर्चा करावी. आवश्‍यकता असल्‍यास गावात पंक्‍तीचे कार्यक्रम घ्‍यावे. कुपोषणातून सर्वसाधारण श्रेणीत आणण्‍यासाठी मुलांना दररोज गुळ व शेंगदाने तसेच वेळोवेळी पोष्‍टीक पदार्थ मातांनी दिल्‍यास बालकांचे पोषण होण्‍यास मदत होईल, असे मत जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी व्‍यक्‍त केले.
    प्रारंभी मॉ.जिजाऊं यांच्‍या प्रतिमेचं पूजन करुन उपस्थित मान्‍यवरांचा अंगणवाडीच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यता आला. याप्रसंगी अंगणवाडी कार्यकर्तींनी तयार केलेल्‍या विविध पौष्‍टीक आहार पदार्थांच्या प्रदर्शनाचे उदघाटन वर्षाताई भोसीकर यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले.या कार्यक्रमाला उप सरपंच संग्राम होणरावभानुदास गित्‍तेचद्रकांत ढवळेकिशन महाराजदशरथ पाटीलविनोद महाबळेयांच्‍यासह गावातील महिला, प्रतिष्ठित नागरीक, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनिस यांची उ‍पस्थिती होती. 

No comments: