Saturday, 24 October 2015

समाजकल्‍याण विभागाच्‍या योजना सामान्‍यांपर्यंत पाहोचवणार - जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर







समाजकल्‍याण विभागाच्‍या योजना सामान्‍यांपर्यंत पाहोचवणार असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी दिली. कंधार येथे शनिवार दिनांक 24 ऑक्‍टोबर रोजी लोककलावंतांना वाद्य साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या.
     जिल्‍हा कॉंग्रेस कमीटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, प्राचार्य राजेंद्र भोसीकर, शाहीर सिताराम जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्‍थानिक भजनी मंडळ तसेच कलावंतांना समाजकल्‍याण विभागाच्‍या वतीने वाद्य साहित्‍याचे वाटप करण्‍यात येते. या योजने अंतर्गत कंधार तालुक्‍यातील पानभोसी येथील शाहीर सिताराम जोंधळे आणि त्‍यांच्‍या संचास या साहित्‍याचे वाटप करण्‍यात आले.
     भोसीकर पुढे म्‍हणाल्‍या, अनुसूचित जातीच्‍या कल्‍याणासाठी समाज कल्‍याण विभागाच्‍या वतीने विविध योजना राबविल्‍या जातात. या योजना सर्वाभिमुख करण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करणार असून सर्वसामान्‍यांपर्यंत या योजनांचा लाभ लाभार्थ्‍यांना मिळवून देवू. या योजने अंतर्गत महिलांसाठी शिलाई मशिन, अपंगांसाठी पिठाची गिरणी व इतर व्‍यवसाय अनुसूचित जाती मधील शिक्षण घेणा-या मुलींना सायकलचे वाटप आदी योजना राबविल्‍या जातात.
     स्‍थानिक भजनी मंडळांना वाद्य साहित्‍याचे वाटप करणे हे त्‍यांच्‍यासाठी वरदान असून ग्रामीण भागातील कला जोपासण्‍यासाठी ही एक नवी संजिवनीच आहे. असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

No comments: