Friday, 16 October 2015

नमस्कार लाईव्ह १६-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १६-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

1- राज्यातील १४ हजार ७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर - सरकारची घोषणा
2- शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवरच होणार, मनसेच्या याचिकेला केराची टोपली
3- मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी अहमदनगर-नाशिकमधील अनधिकृत धरणं कॅप्सूल बॉम्बने उडवा - भाजप आमदार प्रशांत बंब
4- तीन प्रयोगशाळांमध्ये झालेल्या  3 हजार 500 चाचणीत मॅगी पास, नेस्लेचा दावा
5- कुर्ला येथील रेस्टॉरंन्टमध्ये सिलेंडरचा स्फोट,  तब्बल आठ जणांचा मृत्यू, जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल
6- अभिनेता रवी किशनची मुलगी बेपत्ता,खुद्द रवी किशननेच केली पोलिसात तक्रार दाखल
7- क्रिकेटच्या इतिहासात शनिवारी नवा अध्याय, ऑस्ट्रेलियात पुरुषांच्या अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यात खेळणारी सारा टेलर ही पहिली महिला क्रिकेटर ठरणार
8- नांदेड येथे शेतकरी आत्महत्या, करणे व उपाय या विषयावर शेतकरी संवाद व मार्गदर्शन मेळावा संपन्न
-------------------------
हवामान अंदाज
आज २६ºC / ३४ºC आहे
आकाश निरभ्र आहे
उद्या दि. १७-१०-२०१५ चे हवामान अंदाज
२३ºC / ३२ºC राहील
आकाश निरभ्र राहील
--------------------------
आजचा सुविचार
हातपाय न हलवत मिळालेल्या पैशाला लगेच पाय फुटतात
(सचिन पंडित, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: