Sunday, 11 October 2015

नमस्कार लाईव्ह ११-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ११-१०-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

१- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमीपूजन, कार्यक्रमांवर शिवसेनेचा बहिष्कार
२- गोव्यामध्ये सनातन संस्थेविरोधातल्या मोर्च्यावर गोवा सरकारने घातली बंदी
३- वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून शेतक-यांवर मानसोपचार करण्यासंदर्भात शासननिर्णय जाहीर करणे म्हणजे शेतक-यांना वेडे ठरविण्याचाच प्रकार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा तीव्र शब्दांत निषेध
४- बिग बीला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची अमाप गर्दी
५- अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी, जैन भवन येथे  रविवारी सभात अण्णा हजारे यांनी भाषण केल्यास गोळ्या झाडू
६- कानपूर वन डेत दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव, रोहित शर्माचं शतक वाया
७- परदेशात सोन्याच्या भावात तेजी मात्र स्वदेशात अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्तीत
८- डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक गुणवत्‍ता अभियानामुळे मुलांच्‍या गुणवत्‍तेत अमुलाग्र बदल -जि.प.सदस्‍या वर्षाताई भोसीकर
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / ३५ºC आहे
उद्या दि. १२ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२३ºC / ३३ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
(आशिष बारे, नमस्कार लाईव्ह वाचक)

No comments: