Sunday, 18 October 2015

शिंपाळा ग्राम पंचायत बिनविरोध

शिंपाळा ग्राम पंचायत बिनविरोध

सगरोळी / प्रतिनिधी 
    तिस-या टप्यातील  ग्राम पंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने , नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी येथून जवळच असलेल्या शिंपाळा ग्राम पंचायततीच्या सात जागा पैकी सहा जागेवर प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने सदर ग्राम पंचायत बिनविरोध निघाली आहे .
शिंपाळा ह्या  गावाला वेगळीच पंरपरा आहे.गेल्या २५ ते ३० वर्षापासून बिनविरोध निवडणूकीची पंरपरा जोपासत यावेळी गावात सल्ला मसलत करुन ग्राम पंचायत बिनविरोध काढून आमदार सुभाष साबणे यांनी केलेल्या आहवानाला व प्रशासानाला सहकार्य करण्याची भूमिका गावक-यांनी घेतली व आमदाराच्या १० लाख रुपये विकास निधिला बक्षिसास पाञ ठरले आहे.
 येथील सरपंच पद आरक्षीत सोडतीमध्ये अनु.जमाती महिला प्रवर्गासाठी सदर पद आरक्षित होते.या जागेसाठी नामनिर्देशन दाखल न झाल्याने सदरची जागा रिक्त आहे.
दाखल केलेले अर्ज असे -गंगाराम सायबू गरबडे ,अनुसयाबाई विठ्ठल वाघमारे ,चंदरबाई भूमन्ना कोणरोड ,बापूराव मारोती शिंदे ,सुंदरबाई नागनाथराव मरखले  ,दत्ता गंगाराम आटनेवार या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
गावातील एकमेकाप्रति आसलेला आदर,सामाजिक ऐक्य, दुष्काळाचे सावट, प्रशासानास सहकार्य या निवडणूकीत दिसून आला,
ग्राम पंचायत बिनविरोध व्हावी यासाठी धडाडीचे कार्यकर्ते गणेश पाटील ,सामाजिक कार्यक्रर्ते व पञकार राजु पाटील शिंदे यांची सामंजस्याची भूमिका महत्त्वाची ठरली.राजेंद्र मुंगडे,अँड शिवकुमार पाटील,राजेंद्र वाघमारे ,चंद्रकांत पाटील,जी जी सायनोड,गंगाराम साखरे,लक्ष्मण मुंगडे,बस्वराज मुंगडे,दिलीप शिंदे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले आहे.
गावक-यांचे आमदार सुभाष साबणे,पञकार प्रकाशभाउ जोशी व अनेकांनी अभिनंदन केले आहे.
प्रकाश जोशी राहेरकर

No comments: