Monday, 19 October 2015

किनवट तालुक्यातील बोधडी (बु) येथील आदिवासी शेतकर्‍याचा खून, आठ दिवसांत घटनेचा छडा, मारेकर्‍यास पोलिस कोठडी

किनवट तालुक्यातील बोधडी बु. येथे झाला होता आदिवासी शेतकर्‍याचा खून
४/आठ दिवसांत घटनेचा छडा 

किनवट : बोधडी बु. येथील आदिवासी शेतकर्‍याच्या मारेकर्‍यास किनवट पोलिसांनी आठव्या दिवशी अटक केली. त्याला पाच दिवसांची न्यायालयाने कोठडी सुनावली.
८ ऑक्टोबर रोजी बोधडी येथील दिगंबर शंकरराव डवरे (वय ४४) यांचा डोक्यात दगडाचा चिरा घालून खून करण्यात आला. याप्रकरणी किनवट पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. घटनेच्या दिवशी बोधडी येथील देशी दारुचे दुकान व पान टपरी फोडल्याची घटना घडली. तीन दारुचे बॉक्स आढळून आले. हा खून चोरट्यांनीच केल्याचे पोलिस तपासात प्रथमदर्शनी दिसून आले. मारेकरी कोण? या शोधात किनवटचे पोलिस असताना दारु चोर शंकर नागोराव गुंडगुळे (२३, रा. आंदबोरी (चि) याचा सुगावा लागला.
पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश नडवीनकेरी, हर्षल चव्हाण, पोहेकॉ सुभष वानोळे, नामदेव गीते, सय्यद सिराज, गणेश केजकर, सतीश कदम यांनी खून प्रकरणातील मारेकरी शंकर गुंडगुळे यास त्याच्या राहत्या घरुन उचलले. त्याला किनवटच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्या. जी. आर. कोलते यांनी २१ ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. /(वार्ताहर

No comments: