Friday, 30 October 2015

मोदी सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचे नसून भांडवलदारांचे सरकार आहे - माजी मंत्री कमल किशोर कदम



मोदी सरकार हे शेतकऱ्याच्या हिताचे नसून भांडवलदारांचे सरकार आहे - माजी मंत्री कमल किशोर कदम
 नांदेड (संघरत्न पवार)
केंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजप प्रणीत सरकार असून जनतेला 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून भूलथापा देवून मोदी सरकार हे केंद्रात दाखल झाले व त्यांना दीड वर्ष पूर्ण झाले. त्यांनी जनतेला अच्छे दिन स्वप्न दाखवले परंतु या महागाईमुळे नागरिकांना बुरे दिन आले असून सर्वत्र महागाईचा भडका उडाला असून मोदी सरकार हे शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचे नसून ते भांडवलदरांचे आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजीमंत्री कमल किशोर कदम यांनी महागाई विरोधार केलेल्या थालीनाद आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतांना केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. ते पुढे बोलतांना म्हणाले कि आपण पाहतो कि गेली वर्षभर महागाई वाढत गेली असून गोरगरिबांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. सध्या महागाईने सामान्य जनता होरपळत असून मोदी सरकारच्या काळामध्ये सर्वच वस्तूंचे भाव वाढले असून पूर्वी साठ रुपये किलो असलेली तुरडाळ या सरकारच्या काळात १८० रु. किलो झाली आहे. कांदेही बाजारात ८० रु. किलो विकत आहे. पेट्रोल, डिझेलचेही भाव मोदी सरकारने वाढविले आहे. सध्या मराठवाड्यात व जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या सरकारने मदत जास्त प्रमाणात करीत नसून त्यांना शेतकऱ्यांविषयी  आस्था नाही. यामुळे दुष्काळापायी शेतकऱ्याच्या एक हजार आत्महत्या झाल्या आहेत व करीतही आहेत. हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचे नसून भांडवलदराचे आहे. त्यांना जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे. मोदी सरकारने आम्हाला अच्छे दिन देशातील काळा पैसा व महागाई कमी करू असे जाहीरनाम्यात सांगितले मात्र दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थालीनाद आंदोलन करण्यात येत असून सरकारला धारेवर धरून शेतकरी व शेतमजुरांना शासनाची त्वरित मदत पुरावा अन्यथा सत्तेतून बाहे व्हा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि. ३० ऑक्टोबर रोजी मोदी सरकारच्या विरोधात थालीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष डॉ. सुनील कदम, नगरसेवक रामनारायण काबरा, मनपा महिला सभापती सविता कंठेवाड, नगरसेविका डॉ. शिला कदम, फेरोज लाला, जीवन घोगरे पाटील, मोहन हंबर्डे, तातेराव आलेगावकर, लक्ष्मण भवरे, प्रकाश कामळजकर, गजानन कल्याणकर, आबा पाटील पळसेकर, महिला अध्यक्षा सौ. कल्पना डोंगळीकर, प्रांजली रावणगावकर, निर्मला सोनकांबळे, रितू कोलंबीकर, गौतम पवार, एकनाथ वाघमारे, जि.प. सदस्या सुरेखा कदम, नंदा किरवलेकर, गणेश तंदलापूरकर आदी जणांसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 'मोदी सरकार हाय-हाय, फडणीस सरकार हाय-हाय' असे नारे देत थालीनाद आंदोलन करून शेतकरी आत्महत्याबद्दल पथनाट्य सदर करून जिल्हाधिकाऱ्यांना महागाई विरोधात निवेदन देण्यात आले. 

No comments: