Saturday, 24 October 2015

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धर्माबाद येथे दुर्गा महोत्सव समिती तर्फे १२ हजारांचा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द


मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धर्माबाद येथे दुर्गा महोत्सव समिती तर्फे १२ हजारांचा धनादेश तहसीलदारांकडे सुपूर्द

धर्माबाद(माधव हणमंते)-
आपल्या पारंपारिक कार्यक्रमात काटकसर करून येथील सार्वजनिक नवरात्र दुर्गा महोत्सव समितीतर्फे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २१ हजारांचा धनादेश आज तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्याकडे सुपूर्द केला.
सिन्हानंद प्रतिष्ठान व दुर्गा महोत्सव समिती तर्फे उपरोक्त कार्यक्रमा व्यतिरिक्त महाप्रसादाचे आयोजन करून मुकबधीर व अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना गरम शाल व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमाचे सर्वच स्थरांतून कौतुक होत असून तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी किती पैसे द्यावेत हे महत्वाचे नसून त्यामागची कर्तव्यदक्ष भावना महत्वाची असल्याचे प्रतिपादन केले. 

No comments: