Friday, 23 October 2015

नमस्कार लाईव्ह २३-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २३-१०-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- सिंचन घोटाळ्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी तब्बल 308 बोगस कंपन्या स्थापन केल्या, भाजप खासदार सोमय्या खळबळजनक दावा
२- पाकमध्ये घुसून हिंमत दाखवा- उद्धव ठाकरे
३- नाशिक : वडाळेभोईत ट्रकने तिघांना चिरडलं, तीन जण जखमी, संतप्त ग्रामस्थांचा रास्तारोको सुरु, मुंबई-आग्रा महामार्गावरची घटना
४- गायक अभिजीत भट्टाचार्य विरोधात छेडछाडीची तक्रार, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप
५- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळणार, जि.प. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
६- शेतकऱ्यांना 'अच्छे दिन' येणार नाहीत, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज - अशोकराव चव्हाण
७- राज्यात स्वच्छतागृह बांधण्यात नांदेड जिल्हा अव्वल पण लाभार्थी निधीपासून वंचित
८- फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या फुलाला दसऱ्याच्या तोंडावर कवडीमोल भाव, भगवा झेंडू ३० तर पिवळा झेंडू ५० रुपये
९- नांदेड सिडको परिसरातून गोदामचे कुलूप तोडून एक लाख एकोणवीस हजारांचा शाबूदाणा चोरी
१०- लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे एकच डॉक्टर असल्याचा रुग्णालयात चक्क फलक
~~~~~~~~~~~~~~
वाढदिवस
सचिन दुर्गम, नरेश चीत्रपू, सूर्या ठाकूर, रोहित नाईक, विकास गायकवाड, मनोज मोरे, नझीर सुभानी, शरद लातुरीया, अद्वित उंबरकर
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
१. ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
२. हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
३. हे असच का ?
(गंगाधर गच्चे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
<<::महत्वाची सूचना ::>>
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र हे www.namaskarlive.blogspot.com व नमस्कार लाईव्हचे पोर्टल www.namaskarlive.com वर अधिकृतरीत्या प्रकाशित होते.
What's Up वरील प्रत्येक बातमीपत्रात संबंधित बातमीपत्राची लिंक दिली जाते. वाचकांनी लिंकवर क्लिक करून बातमीपत्राची खातरजमा करावी व पुढे शेअर करावे. इतर कुठल्याही बातमीपत्राचा नमस्कार लाईव्हशी संबंध नाही.

No comments: