नमस्कार लाईव्ह ०२-१०-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रींच्या जयंतीनिमित्त समाधीस्थळांवर जाऊन श्रद्धांजली न दिल्याने काँग्रेस आणि शास्त्रींच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली नाराजी
२- लातूर जिल्ह्यात वीज कोसळून तीन ठार
३- वीजबिल भरणा केंद्रावर लुट, सीसीटीव्हीत आरोपी
४- तीन बारमध्ये बनावटी विदेशी मद्य, करवाई होणार
४- लातूरमध्ये सरकारी दवाखान्यात मारहाण, कारवाईची मागणी
~~~~~~~~~~
संक्षिप्त
1-अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे अलिशान ईब्राहिम शेख या महिलेचा अंगावर वीज पडल्यामुळे मृत्यू, जिल्हा आपत्ती विभागाने दिली माहिती
2-उद्यापासून फिल्म फेडरेशनचा बेमुदत संप, फेडरेशनच्या २१ शाखांचा समावेश, सर्व शूटिंगज रखडणार, टीव्हीला मोठा फटका बसण्याची शक्यता
3-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल
4-१६ वेळा झेंडा दाखवून शांतता चर्चेस उत्सुक असल्याचे सांगणारा पाकिस्तान प्रत्येकवेळी गोळीबार सुरुच ठेवणार असेल तर १७ व्यांदा भारताला ठोस प्रत्युत्तर द्यावेच लागेल - राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री
5-राजघाटः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना वाहिली आदरांजली
~~~~~~~~~~
हवामान अंदाज
आज २७ºC / २९ºC आहे
उद्या दि. ३ ऑक्टोबर २०१५ चे हवामान अंदाज
२९ºC / ३१ºC राहील
~~~~~~~~~~
सुविचार
अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे
(महात्मा गांधी, नमस्कार लाईव्ह वाचक)
No comments:
Post a Comment