Sunday, 31 January 2016

नमस्कार लाईव्ह ३१-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- खादीमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य - पंतप्रधान मोदी 
२- राजकारणापायी तारुण्य वाया, रावसाहेब दानवेंची टोलेबाजी 
३- पठाणकोट - दोन मॅगझीन, २९ जिवंत काडतूस, एक एके-४७ आणि त्याची ५९ जिवंत काडतूस सापडली 
४- ‘जलयुक्त शिवार’ ही भ्रष्टाचाराला सदाचारात बदलणारी योजना : राजेंद्र सिंह 
५- मोदींची 'मन की बात' मोबाइलवर 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- लोकसहभाग आणि पारदर्शीपणा नसेल तर स्मार्ट सिटी अपयशी होईल. स्मार्ट सिटी होण्यास १० वर्षे लागतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
७- एमपीएससी' परीक्षेचा निकाल जाहीर; कोल्हापूरचा अजिंक्य आजगेकर राज्यात प्रथम 
८- माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचे पती ब्रीज बेदी यांचे निधन.
९- मुंबईत गुन्हेगारीची पध्दत सतत बदलते, त्यामुळे पोलिसांचे काम आव्हानात्मक आहे - दत्तात्रय पडसलगीकर 
१०- अपंग हिमांशूचा मुंबई-दिल्ली सायकलवारीचा निर्धार 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- धर्माबाद; महेश्वरी युवा मिलानोत्सव कार्यक्रम संपन्न 
१२- आंध्र प्रदेश - तुनी रेल्वे स्टेशन वर रत्नांचल एक्सप्रेसच्या ५ बोगीला जमावाने आग लावली 
१३- पुणे; सळई घेऊन जाणा-या भरधाव ट्रकने लवळे फाटा जवळ ६ वाहनांना उडविले. ३ जण जागीच ठआर तर २ गंभीर जखमी 
१४- नागपुरात पोलिसाच्याच घरी चोरी, रोख रकमेसह 6 तोळे सोनं लंपास 
१५- कोल्हापूर; ट्रक न थांबवल्याने वाहतूक पोलिसाची चालकाला मारहाण 
१६- अर्धापूर; नळाला तोटी न लावल्या मूळे हजारो लीटर पाणी वाया 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- सिडनीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, 140 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश 
१८- कतरिनाच्या हेअर कलरसाठी ५५ लाख खर्च 
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
देण्यासाठी दान, घेण्यसाठी ज्ञान आणि त्यागण्यासाठी 'अभिमान' सर्वश्रेष्ठ आहे
(राजू हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

सिडनीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, 140 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच व्हाईट वॉश


सिडनी : धोनीच्या टीम इंडियानं सिडनीच्या तिसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यात सनसनाटी विजय साजरा करून ऑस्ट्रेलियात 3-0 अशा ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली.
भारतानं ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियावर क्लीन स्वीप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिडनीच्या ट्वेन्टी20त ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 198 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अर्धशतकं आणि सुरेश रैना आणि युवराज सिंगनं हाणामारीच्या षटकांत गाजवलेला पराक्रम यांच्या जोरावर भारतानं सात विकेट्स राखून विजय साजरा केला.
=============================================

‘जलयुक्त शिवार’ ही भ्रष्टाचाराला सदाचारात बदलणारी योजना : राजेंद्र सिंह


चंद्रपूर जलयुक्त शिवार ही भ्रष्टाचाराला सदाचारात बदलणारी योजना आहे, असं म्हणत जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी जलयुक्त शिवार योजनेची स्तुती केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कारभारावर ताशेरेही ओढले आहे.
मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह चंद्रपुरातील राज्य सरकार आयोजित जलपरिषदेला उपस्थित होते. यावेळी भाषणात राजेंद्र सिंह यांनी राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची स्तुती केली.
“राजेंद्र सिंह यांच्या मते जलशिवार योजनेत समाज जोडला गेला आहे. राज आणि समाज एकत्र आल्यामुळे पारदर्शकता येते आणि त्यामुळे या योजनेतला पैसा भ्रष्टाचारात जाऊच शकत नाही. या आधी 70 हजार कोटी खर्च झाले. मात्र, एक इंच देखील जमीन देखील सिंचित झाली नाही”, असं सांगत राजेंद्र सिंह यांनी आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.
=============================================

नागपुरात पोलिसाच्याच घरी चोरी, रोख रकमेसह 6 तोळे सोनं लंपास


नागपूर नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल प्रसारमाध्यमांकडून टीका होत असली, तरीही नागपुरात रामराज्य असल्याचा दावा नागपूर पोलीस करतात. मात्र, आता तेच पोलीस चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. कारण आता पोलीस मुख्यालय परिसरात राहणारया पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी घरफोडी झाली आहे. एवढेच नाही, तर पोलिस मुख्यालयातून दोन दिवसांपूर्वी पोलिसांची नवीकोरी बुलेट आणि मोठ्या संख्येत बेट्रीज ही चोरीला गेल्या असल्याचे समोर आले आहे.
एखाद्या समस्येची झळ जोवर स्वत: बसत नाही, तोवर त्याची जाणीव ही होत नाही, असे म्हणतात. नागपूर पोलिसांच्या बाबतीत असेच काही घडत आहे.
नागपुरात गुन्हेगारी वाढल्याचे आरोप झाल्यास, वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठे आहे गुन्हेगारी, असे विचारतात. नागपुरात जणू रामराज्य असल्याचा चित्र रंगवतात. मात्र, त्याच नागपुरात आता खुद्द पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना गुन्हेगारीची झळ बसत आहे.
नागपूर पोलिस मुख्यालय परिसरातल्या पोलिस लाईन मध्ये राहणारे शीघ्र कृती दलाचे पोलिस कर्मचारी संदीप मालवकरच्या घरी घरफोडी झाली आहे. मालवकर कुटुंब सध्या अकोल्याला गेलेले असल्यामुळे किती मुद्देमाल चोरीला गेला आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, 6 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि काही मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या असल्याची माहिती मिळते आहे.
चोरट्यांनी थेट पोलिस मुख्यालय परिसरात राहणाऱ्या पोलिस कर्मचारीच्या घराला लक्ष्य केल्यामुळे पोलिस अधिकारी ही हादरले आहेत. संपूर्ण पोलीस लाईन परिसरात किती पोलीस काल रात्री गश्तीवर होते, किती ठिकाणी नाकाबंदी केली होती, याची झाडाझडती आता सुरु करण्यात आली आहे.
=============================================

राजकारणापायी तारुण्य वाया, रावसाहेब दानवेंची टोलेबाजी


जालना : भाजप प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा जालन्यात नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारणापायी तारुण्य वाया गेल्याची खंत दानवेंनी बोलून दाखवली.
दानवेंनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात जोरदार फटकेबाजी केली. राजकारण आणि कार्यकर्ते सांभाळता सांभळता तारुण्य वाया गेलं, अशी टोलेबाजी दानवेंनी केल्यानंतर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
‘देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर आपण प्रदेशाध्यक्ष झालो. मात्र आता मुख्यमंत्री फडवणवीसांची जागा रिक्त होणं शक्य नाही त्यामुळे मुख्यमंत्रिपद आपल्या वाटेला येणार नाही’ असा टोलाही दानवेंनी यावेळी लगावला.
=============================================

ट्रक न थांबवल्याने वाहतूक पोलिसाची चालकाला मारहाण


कोल्हापूर : कोल्हापुरात वाहतुक पोलिसांच्या दादागिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचालकाला वाहतुक पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना कॅमेरात कैद झाली आहे.
यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण या हवालदाराने नागरिकांना धमकी देत त्यांनाही मारण्याचा प्रयत्न केला. संदीप अबीटकर असं या पोलिस हवालदाराचं नावं असल्याची माहिती आहे.
यावेळी ट्रकचालक आपण दंड भरायला तयार असल्याचंही सांगत होता. मात्र या निर्दयी हवालादाराने ट्रकचालकाच्या मानेवर मारहाण सुरुच ठेवली. त्यामुळे या पोलिसावर आता काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
=============================================

अपंग हिमांशूचा मुंबई-दिल्ली सायकलवारीचा निर्धार


मुंबई : अपघातात अपंगत्व आलेला एक तरुण इतर अपंगांना प्रेरणा देण्यासाठी एका सायकल प्रवासावर निघाला आहे. आपला संपूर्ण डावा पाय गमावलेला हिमांशू कुमार मुंबई ते दिल्ली हा प्रवास सायकलने करणार आहे.
मुंबई ते दिल्ली हा जवळपास 1500 किमीचा प्रवास सायकलद्वारे 15 दिवसात पार करण्याचा त्याचा निर्धार आहे. भारताचा तिरंगा फडकवून हिमांशूने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
त्याच्या या मनोदयास पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेचे उपनेते हाजी अरफात शेख, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांनी हिमांशूसोबत कुर्ला ते वांद्रे दरम्यान सायकल चालवून सहभाग घेतला.
=============================================

खादीमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य - पंतप्रधान मोदी


' भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता खादीमध्ये आहे' असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले होते. सध्याच्या तरूणांमध्ये खादीचे आकर्षण खूप वाढले असून कोट्यावधी नागरिकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य या खादीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. नवीन वर्षात मोदींनी पहिल्यांदाच देशवासियांसी 'मन की बात'द्वारे त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करत त्यांनी विविध उपक्रम व सुरू असलेल्या कामांविषयी माहिती दिली.
' सध्या खादीच्या माध्यमातून १८ लाख रोजगार निर्मिती झाली आहे. यामध्ये कोट्यवधींना रोजगार देण्याची क्षमता आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्याकडे एक खादीचा जोड ठेवला पाहिजे' असे ते म्हणाले. 
दरम्यान आता देशवासियांना ' मन की बात ' कधीही ऐकता येणार. मोबाईवरून 8190881908 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर मन की बात कुठेही व केव्हाही ऐकता येऊ शकेल, असे मोदींनी नमूद केले. ५० टक्के शेतकऱ्यांना पिकविमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. 
मोदींच्या 'मन की बात' मधील महत्वाचे मुद्दे :
- देशासाठी प्राणांची आहुती देणा-यांना श्रद्धांजली वाहणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. दरवर्षी ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता सव्वाशे कोटी भारतीयांनी २ मिनिटांसाठी मौन पाळावे. 
- भारताचे स्वातंत्र्य आणि सभ्यता हे खादीत आहे, असे सरदार पटेल यांनी म्हटले आहे. तरूण पिढीसाठीही खादी आकर्षण बनत आहे.
- २६ जानेवारी रोजी हरियाण, गुजरातमध्ये एक अनोखा प्रयोग दिसला. गावातील सर्वात शिक्षित मुलीला ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात आला. या कृतीततून 'बेटी बचाव- बेटी पढाओ'चा एक उत्तम संदेश या कृतीतून देण्यात आला.
- आता 8190881908 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन 'मन की बात' कधीही ऐकता येणे शक्य.
- ५० टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार आहे.
- आंध्र प्रदेशमधील विशाखा पट्टणम येथील समुद्र किनाऱ्यावर इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होत आहे. जगातील प्रमुख देशांची लढाऊ जहाजं व युद्धनौका या इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होणार आहे. भारताने ही मोहीम आयोजित केल्याचा अभिमान वाटतो.
=============================================
अर्धापूर; नळाला तोटी न लावल्या मूळे हजारो लीटर पाणी वाया

अर्धापूर शहरात लंगडे गली हनुमान चोक येथील बोअरवेल वर प्रशासनाचे लक्ष नसल्या कारणाने येथील रहिवाशांनी आपल्या ला हवे असेल तेव्हा बोअरवेल चालू करत आहेत। हया बोअरवेल ला 3 (तीन) ठीकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी नळ बसवण्यात आले आहे।पण त्यातील ऐकयाही नळाला तोटी न लावल्या मूळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे।
आजच्या हया बिकट दूशकाळात जर ऐवठया मोठया प्रमाणात जर पाणी वाया जात असेल तर हयाची सर्व जबाबदारी कोणाची? असे जनतेचे म्हणणे आहे।....
=============================================

नमस्कार लाईव्ह ३१-०१-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पठाणकोट हल्ल्यामुळे भारत-पाक चर्चेला खीळ - नवाज शरीफ 
२- इराणचे राष्ट्राध्यक्षांच्या भावनांची कदर करण्यासाठी इटलीमध्ये सौंदर्यापूर्ण नग्न पुतळ्यांना ठेवले झाकून 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- रोहित वेमुला हा दलित नव्हताच – सुषमा स्वराज 
४- पुढील निवडणुकीत जनता मोदींना धूळ चारेल - यशवंत सिन्हा 
५- व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले 
६- आ. बच्चू कडू यांची गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट; अपंग व्यक्तींच्या समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- 'शनिचौथऱ्यावर प्रवेश न दिल्यास महिलांनीच बहिष्कार टाकावा' 
८- नाशिक : 'आमची मुलगी तरुणासोबत पळाली, सुरेश प्रभू, मदत करा' 
९- हॉटेल सुरु करणं आता आणखी सोपं, गृह खात्याच्या 5 परवानग्या रद्द करण्याचा निर्णय 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- देवनारच्या आगीप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा 
१२- मुंबई; मंडपात हुंड्याची मागणी, लग्नाच्या बेड्याऐंवजी पोलिसांच्या बेड्या 
१३- दादरला धावती लोकल पकडताना 45 वर्षीय इसमाचा मृत्यू 
१४- हिंगोली; वसतिगृहात विद्यार्थीनींना दिली जाते सडकली फळं 
१५- वर्धाः नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात होऊन २ जण जागीच ठार तर १ जखमी 
१६- मध्य प्रदेश; सागर जिल्ह्यातून पोलिसांनी १ हजार किलो स्फोटके, १३२ डिटोनेटर्स, इतर साहित्य जप्त, ३ अटक
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका जिंकण्याची भारताला संधी 
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१८- रेशीम उत्पादकांना स्वत:च्या शेतावरच मिळणार मंजुरी 
१९- आजपासून नांदेडला शिक्षक साहित्य संमेलन 
२०- मुदखेड; रेतीच्या दोन टिप्परला ४० हजाराचा दंड 
२१- राजकारणात चांगल्या लोकांची गरज - आ. चिखलीकर 
२२- करवसुलीत दिरंगाई करणाऱ्या ८० कर्मचाऱ्यांचे वेतन आयुक्तांनी रोखले 
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
आकाश ठाकूर, फेरोज लाला, चंद्रपाल सिंघ देवरा, सुदर्शन गोरने, महेश देशपांडे, गोपाल अग्रवाल 
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
सौंदर्य हे वस्तुत नसते तर पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते
(प्राजक्ता मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4

==================================================================
==================================================================


'शनिचौथऱ्यावर प्रवेश न दिल्यास महिलांनीच बहिष्कार टाकावा'



अहमदनगर : शनिशिंगणापूरला महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळत नसेल तर महिलांनीच शनीवर बहिष्कार टाकावा आणि मंदिरात जाऊ नये, असं आवाहन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजूळे यांनी केलं आहे. ते अहमदनगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी बोलत होते.
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरातन काळापासून स्त्रियांना दोषी ठरवलं जात असल्याचा आरोप मंजुळेंनी केला. तसेच स्त्री पुरुषापेक्षा उजवीच आहे, मात्र धर्मव्यवस्थेनं आतापर्यंत स्त्रियांचं शोषणच केलं आहे, असं मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं.
महाभारत, रामायणापासून स्त्रीलाच दोषी ठरवण्यात आलं, त्यामुळे स्त्रियांनी व्यक्त होण्याची गरज नागराज मंजुळे यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, औरंगाबाद हायकोर्टानं अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना शनि शिंगणापूर प्रकरणी नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चार आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत.
औरंगाबादेतल्या डॉ. वसुधा पवार यांनी शनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश आणि पूजेचा समान अधिकार मिळावा यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांसह, मुंबई धर्मादाय आयुक्त आणि राज्याच्या विधी न्याय खात्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली.

================================================

देवनारच्या आगीप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा



मुंबई : देवनार डंम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे तीनही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले होते, त्यानंतर तातडीनं ही कारवाई करण्यात आली.
अग्निशमन दलाच्या वतीनं जेट कूल सोल्युशन या नव्या पद्धतीचा वापर करण्यात आला. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग अग्निशमन दलाद्वारे करण्यात आला. कचऱ्यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला गेला.
आगीची तीव्रता मोठी नसली तरी हवेच्या गतीमुळे आग धुमसत असल्यानं वातावरणात प्रचंड धूर पसरला होता. खबरदारीचा उपाय म्हणून देवनार परिसरातील सर्व शाळा आणि कॉलेजना प्रशासनाने दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.
धुरामुळे श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून डोळ्यांवर काळा चष्मा आणि तोंडावर ओला रुमाल ठेवावा असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.

================================================

'आमची मुलगी तरुणासोबत पळाली, सुरेश प्रभू, मदत करा'

नाशिक : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची तत्परता पुन्हा एकदा समोर आली आहे. घरातून पळून गेलेले अल्पवयीन प्रेमी युगल सुरेश प्रभूंच्या मदतीमुळे पालकांच्या ताब्यात आलं आहे.
पश्चिम बंगालच्या हावडामध्ये राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीच्या पित्याने शनिवारी प्रभू यांना “आमची मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली आहे. ते रेल्वेने पळाल्याचा संशय आहे. मदत करा”, असं ट्वीट केलं. ट्वीटमध्ये मुलीचा फोटो आणि मोबाईल नंबरही देण्यात आला होता. भुसावळजवळ ट्रेन असल्याचा अंदाज त्यात व्यक्त केला होता.
हावडाहून गीतांजली एक्स्प्रेसने हे प्रेमीयुगल मुंबईला यायला निघालं होतं. प्रभू यांनी तत्काळ आरपीएफ जवानांना युगुलाला शोधण्याचे आदेश दिले. त्यानंतर एका तासात ही कारवाई झाली. या प्रेमीयुगलला नाशिक रेल्वे स्थानकात ताब्यात घेण्यात आलं.
पोलिसांनी दोघांच्या घरी कळवल्यानंतर विमानाने दोन्ही अल्पवयीन मुलांचे पालक विमानाने मुंबईला आले. दोन्ही मुलं आपापल्या आईवडिलांच्या ताब्यात सुखरुप असल्याची माहिती आहे.

================================================

मुंबई; मंडपात हुंड्याची मागणी, लग्नाच्या बेड्याऐंवजी पोलिसांच्या बेड्या


नवी मुंबई : ऐन लग्नमंडपातच हुंड्याची मागणी केल्यानंतर लग्न मोडल्याची संतापजनक घटना नवी मुंबईत घडली आहे. यावेळी वरपक्षातील मंडळींनी वधूच्या मामाला बेदम मारहाणही केली. याप्रकरणी रबाळे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक झाली आहे.
ऐरोलीत राहणाऱ्या एका युवतीचा विवाह शुक्रवारी वडाळ्यातील शैलेश गुप्ताशी होणार होता. लग्न ठरल्यानंतर मुलीकडच्यांनी गुप्ता परिवाराला दोन लाखांचा हुंडाही दिला होता. मात्र ऐन लग्नातच नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी आणखी एक लाख रुपयांची मागणी केली.
या कारणावरुन दोन्ही पक्षात वाद झाला आणि त्याच रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी मुलाकडच्या काही नातेवाईकांनी मुलीच्या मामाला बेदम मारहाण केली. या घटनेनंतर पोलिसांनी नवरदेवासह पाच जणांना अटक केली आहे.
================================================

हॉटेल सुरु करणं आता आणखी सोपं, गृह खात्याच्या 5 परवानग्या रद्द करण्याचा निर्णय


मुंबई : ज्यांना हॉटेल व्यवसायात उतरायचं आहे, अशांना फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. हॉटेल उद्योगाची उभारणीची प्रक्रिया आता आणखी सोपी केली आहे. हॉटेल उद्योग उभारण्यासाठी गृह विभागाशी संबंधित 5 परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योगाला चालना मिळणार आहे.

राज्याच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ या मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्र्यंनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षभरात उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी केल्या आहेत. यापूर्वी उद्योग, नगरविकास, पर्यावरण आदी विभागांच्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली होती. आता या मोहिमेला गृह विभागाकडूनही पाठबळ मिळाले आहे.

गृह विभागाने मुंबई पोलिस अधिनियमांतर्गत तयार केलेल्या नियमानुसार हॉटेल व आदरातिथ्य उद्योगांना आता खाद्य नोंदणी प्रमाणपत्र, स्विमिंग पूल परवाना, सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणासाठी परवाना पीपीईएल – ए तसेच पीपीईएल – बी आणि सादरीकरण परवाना या पाच परवानग्या घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. या परवानग्या रद्द करण्यात आल्यामुळे हा उद्योग सुरू करण्यासाठी येणाऱ्या विविध अडचणी व लागणारा विलंब कमी होणार असून अनावश्यक कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही.

दरम्यान, राज्यात आता हॉटेल व्यवसाय करताना महापालिकेने दिलेले परवाने, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या परवान्यानंतर हॉटेल व आदरातिथ्य व्यवसाय सुरू करता येईल.


================================================

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका जिंकण्याची भारताला संधी


सिडनी : अॅडलेड आणि मेलबर्नमध्ये कांगारुंना लोळवल्यावर धोनीची टीम इंडिया आता ट्वेन्टी 20 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉशचा दणका देण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघामधला तिसरा ट्वेन्टी20 सामना आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजून आठ मिनिटांनी या लढतीला सुरुवात होईल. सिडनीच्या मैदानातच टीम इंडियाने वन डे मालिकेतला अखेरचा सामना जिंकण्याची करामत केली होती. त्यानंतर धोनी ब्रिगेडचं नशीबच पालटलं आहे.

टीम इंडियासमोर आता हाच विनिंग फॉर्म कायम राखण्याचं आव्हान आहे. तर जसप्रित बुमरा आणि हार्दिक पंड्यासारख्या नवख्या खेळाडूंसाठी आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवण्याची ही आणखी एक संधी ठरु शकते.
================================================

दादरला धावती लोकल पकडताना 45 वर्षीय इसमाचा मृत्यू

मुंबई : धावत्या लोकलमध्ये चढण्याची घाई एका प्रवाशाच्या जीवावर बेतली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धावत चढण्याच्या नादात प्लॅटफॉर्मवरुन पडून एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

शफीउद्दीन अब्दुल गनी दादर रेल्वे स्टेशनवर सकाळी 6 च्या सुमारास आपल्या कुटुंबासोबत लोकल पकडत होते. पायऱ्या उतरुन शफीउद्दीन प्लॅटफॉर्म आले आणि चढणार तोच लोकल सुटली. मात्र कसंबसं त्यांनी आपली पत्नी आणि मुलीला लोकलमध्ये चढवलं. मात्र स्वतः चढण्यापूर्वीच लोकलने वेग घेतला. ते धावत लोकलसह जात असतानाच प्लॅटफॉर्म संपला आणि ते पोकळीत कोसळले.

ट्रेनमुळे कापलं गेल्याने शफीउद्दीन यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज हाती आलं आहे. प्लॅटफॉर्म संपतो त्याठिकाणी बॅरिकेट लावले असते, तर त्यांचा जीव वाचला असता, असं म्हटलं जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर धावत्या एक्स्प्रेसमधून उतरताना एका महिलेचा पडून मृत्यू झाला होता. रेल्वे अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
================================================
वसतिगृहात विद्यार्थीनींना दिली जाते सडकली फळं !


हिंगोली – 30 जानेवारी : शहरातील अकोला बायपास भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींना निकृष्ट जेवण देण्यात येत असून कच्च्या चपात्या, सडलेली फळं दिली जात आहेत. शिवाय कर्मचार्‍याकडून अतिशय हीन दर्जाची वागणूक देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विद्यार्थिनींनी वसतिगृहातच आंदोलन सुरू केलंय.
विद्यार्थिनीच्या आंदोलनाची दाखल घेत वसतिगृहाला आमदार तानाजी मुटकुळे आणि समाज कल्याण उपयुक्त छाया कुलाल यांनी भेट देऊन मुलींच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुलींनी वसतिगृहात मिळत असलेल्या वागणुकीचा व निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रार केली. काही कर्मचारी मुलींना अश्लील भाषेत आणि जातीवाचक शिवीगाळ करीत असल्याचा आरोप मुलींनी केला. त्या ठिकाणी मुलींचे दोन गट निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. काही मुली सुविधा मिळत असून कर्मचारी चांगले असल्याचे सांगत होत्या तर जास्त संख्या असलेल्या गटातील मुली व्यथा मांडत होत्या. मुलींना देण्यात येत असलेले सडके सफरचंदही मुलींनी दाखविले.
मुलींना चांगल शिक्षण,चांगल आरोग्य येईल शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली.
================================================
रोहित वेमुला हा दलित नव्हताच – सुषमा स्वराज


गेल्या काही दिवसापासून रोहितच्या आत्महत्या प्रकरणामुळे केंद्रातील राजकारण प्रभावित झाले आहे. त्यात आता हैदराबाद विद्यापीठात शिकणारा विद्यार्थी, रोहित वेमुला हा दलित नव्हताच असा दावा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे. ‘या प्रकरणात जे तथ्य समोर आले आहे आणि जी माहिती मला मिळाली आहे, त्यानुसार रोहित हा दलित नव्हताच. मात्र काही जणांनी त्याला दलित म्हणून या संपूर्ण प्रकरणाला सांप्रदायिक रंग दिला आहे. दलित प्रकरणावरून या विषयावर जी काही चर्चा सुरू आहे त्याला काही महत्वच नाही’ असे स्वराज यांनी म्हटले आहे. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाला आता आक्रमक पवित्रा आला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांनी देखील रोहितच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थित करत आपला देश कुठे चालला आहे असे विचारले आहे. शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे एक दिवसाच्या उपोषणावर बसले होते. त्यांच्या या दौऱ्याला अभाविपने विरोध केला होता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ठेवत रोहितसह पाच दलित विद्यार्थ्यांवर ऑगस्ट २०१५ मध्ये कारवाई करण्यात आली होती. त्याच नैराश्यातून रोहितने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. रोहितच्या आत्महत्येपासून दोषींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरु आहे. 
================================================

पठाणकोट हल्ल्यामुळे भारत-पाक चर्चेला खीळ - नवाज शरीफ


इस्लामाबाद : पठाणकोट येथील हल्ल्याने भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चेवर विपरीत परिणाम झाल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी दिली. शरीफ यांचे हे वक्तव्य पाकिस्तानी लष्कराला आणि त्यातही लष्करप्रमुख राहील शरीफ यांना संदेश म्हणून मानले जात आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शांतता चर्चा व्हावी यासाठी नवाज शरीफ प्रयत्नशील होते; पण लष्कर अशा चर्चेला अनुकूल नव्हते. त्याचवेळी पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेचा इन्कारही केला जात नाही.
पठाणकोट हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना नवाज शरीफ म्हणाले की, भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. या हल्ल्यामागील सूत्रधार
आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची मागणी भारत करीत आहे. या पार्श्वभूमीवर शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे.
पठाणकोट हल्ल्यामागे मसूदच्या असलेल्या भूमिकेचा पुरावा भारताने पाकिस्तानला दिला आहे; पण तीन आठवडे होऊनही पाकिस्तानने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांतील विदेश सचिवांची चर्चाही लटकली आहे. पाकिस्तानने ठोस कारवाई केल्यानंतरच चर्चा सुरू केल्याचे संकेत भारत सरकारने दिले आहेत. लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना शरीफ पुढे म्हणाले की, पठाणकोट हल्ल्याची चौकशी लवकरच पूर्ण होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकस्मिकरीत्या पाकिस्तानला भेट दिल्यानंतर उभय देशांतील संबंध योग्य दिशेने जात होते; पण पठाणकोट हल्ल्याने ही प्रक्रिया थांबली. परंतु आता दहशतवादी पराभूत झाले असून, ते निराश झाले आहेत. आपली उपस्थिती दाखविण्यासाठीच ते अशा घटना घडवून आणत आहेत.
भारतासोबत चर्चेची प्रक्रिया पुढे मार्गक्रमण करीत होती; पण पठाणकोट हल्ल्याने त्यावर परिणाम झाला. पठाणकोट हल्ल्यासाठी आमच्या जमिनीचा वापर करण्यात आला काय? हे शोधून काढण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही ते काम करू .
================================================

पुढील निवडणुकीत जनता मोदींना धूळ चारेल - यशवंत सिन्हा



जनतेसोबत संवादाच्या अभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारसारखी स्थिती होईल, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी केली आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील निवडणुकीत भारतीय जनता त्यांना धूळ चारेल, असा टोलाही त्यांनी मोदींचे नाव न घेता लगावला. पणजी येथील एका महाविद्यालयात आयोजित ‘डिफिकल्ट डायलॉग‘ या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी मोदींचा उल्लेख न करता सरकारवर टीकास्त्र सोडले. 
' जनतेशी संवाद साधणे, ही भारतीय लोकशाहीची मोठी ताकद आहे. पण, सध्या तसे होताना दिसत नाही... संवाद बिलकूल राहिलेला नाही. थोड्याफार चुका होऊ शकतात, पण सध्याची स्थिती बघता काळजी वाटते' असे सिन्हा म्हणाले. ' भारतीय समाज सगळं लक्षात ठेवतो आणि याच गोष्टीचा भविष्यात फटका बसू शकतो. संवादावर विश्वास नसणा-यांना भारतातील नागरिक पुढील निवडणुकांमध्ये धूळ चारतील. इंदिराजींच्या काळातही अशीच डोळेझाक केली होती आणि त्यावेळी सरकार फक्त १९ महिनेच टिकू शकले होते,' याची आठवणही सिन्हा यांनी करून दिली.
================================================

व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले


 एअर इंडियाच्या अधिका-यांनी आपल्याशी गैरवर्तन करत फ्लाईटमधून खेचून बाहेर काढल्याचा आरोप एका अपंग महिलेने लावला आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीत असोसिएट प्रोफेसर असणा-या अनित घई यांच्या सांगण्यानुसार, एअर इंडियाने त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था तर केली नाहीच आणि त्याबद्दल विचारणा केली असता अधिका-यांनी त्यांना विमानाच्या बाहेर काढले. मात्र एअर इंडियाच्या अधिका-यांनी हे आरोप फेटाळून लावत घई यांना व्हील चेअर देण्यात आली होती, असा दावा केला आहे. 
काय आहे प्रकरण? 
अनिता शुक्रवारी संध्याकाळी एअर इंडियाच्या 'अलायन्स एअर' फ्लाइटने चार सहका-यांसह डेहराडून येथून दिल्लीला परत येत होत्या. विमान इंदिरा गांधी एअरपोर्टवर उतरल्यानंतर अनिता यांनी फ्लाइट कमांडरकडे व्हील चेअरची मागणी केली, मात्र अर्धआ तास उलटून गेल्यावरही व्हील चेअर मिळाली नाही. अनिता यांनी या संदर्भात पुन्हा पुन्हा मागणी केली असता सुरक्षेचे कारण देत त्यांना व्हील चेअर देण्यास नकार देण्यात आला. आणि अखेर तासाभरानंतर अनिता यांना विमानातून खेचून बाहेर काढण्यात आले. 
एअर इंडियाच्या अधिका-यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून आम्ही आमच्या प्रवाशांची व्यवस्थित काळजी घेतो असे स्पष्ट केले. त्यादिवशी विमान थोड्या लांब अंतरावर उतरवण्यात आल्याने व्हील चेअर आणण्यास वेळ लागला. मात्र अनिता यांनी सांगितल्यानुसार कोणतीही घटना घडलेली नाही, उलट आमच्या कर्मचा-यांनी त्यांना उतरण्यास मदतच केली, असे अधिका-यांनी नमूद केले. 
================================================
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या भावनांची कदर करण्यासाठी इटलीमध्ये सौंदर्याचे उत्कृष्ट नमुने म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नग्न पुतळ्यांना झाकून ठेवले

इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांच्या भावनांची कदर करण्यासाठी इटलीमध्ये सौंदर्याचे उत्कृष्ट नमुने म्हणून पाहिल्या जाणाऱ्या नग्न पुतळ्यांना झाकून ठेवले गेले, पण यात अब्रू गेली, ती कलासक्त रोम शहराचीच.
आपल्या घरात जर कुणी पाहुणे येणार असतील, तर साहजिकच आपण घर आवरतो. नीटनेटके दिसेल, इतपत घराची झटपट रचना करतो. घरात येणाऱ्या पाहुण्याच्या मनात आपण गबाळे नाहीत, अशी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हे स्वाभाविकही आहे. तीच गोष्ट देशात येणाऱ्या पाहुण्यांची असते. एखाद्या देशाचा पंतप्रधान अथवा राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे येणार असेल, तर आपणही रस्ते झाडून साफ करतो. पाहुण्यांपुढे आपल्या देशाची प्रतिष्ठा कमी होणार नाही, याची काळजी घेतो. पाहुण्यांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवतो. आपल्या देशाच्या कला-संस्कृतीचे प्रदर्शनही या निमित्ताने घडवतो. कलेच्या माध्यमातून देशाच्या महान परंपरेचा संदेशही देतो. आपल्या देशाला कलेचा उत्तम वारसा कसा लाभलेला आहे, याची साग्रसंगीत माहिती पाहुण्यांना देत असतो. हे झालं सार्वत्रिक चित्र, पण तिकडे इटलीमध्ये वेगळेच घडले.
इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी तब्बल १७ वर्षांनंतर प्रथमच इटलीच्या दौऱ्यावर गेले. इटलीची राजधानी रोममध्ये पंतप्रधान मतेओ रेन्झी यांच्याशी व्यापारी करारही केला. इराण रूढीप्रिय मुस्लीम राष्ट्र असल्याने, त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना अप्रतिष्ठित वाटू नये याची काळजी इटलीने घेतली होती. खरं तर रोमन साम्राज्याची जगाला मोठी देणगी आहेच. ग्रीक शिल्पाकृतीची तर जगभर चर्चा होतच असते. जगाच्या कलाजगताचा अभ्यास करताना रोमच्या कलाकृतींशिवाय अभ्यास पुढे सरकत नाही. ग्रीक शिल्प असो, चित्र असो, त्यांच्या आखीव-रेखीव इमारती असो, या साऱ्यांमध्ये इटलीने एके काळी जगाचे नेतृत्व केले होते, हा इतिहास आहे. ग्रीक थिंकर असो वा पीळदार पुष्ठ स्नायूंचे नग्न पुतळे असो, या कलाकृतींनी जगभर भुरळ पाडली. जगभरचे कलासक्त रसिक रोमची आणि अलीकडच्या काळात पॅरिसची सफर केल्याशिवाय राहत नाहीत, हे तितकेच खरे आहे. इटलीच्या नग्न शिल्पाकृतीचा त्या देशालाही तितकाच अभिमान आहे. जगातील सर्वात जुने शहर असलेल्या रोमने शेकडो लढाया होऊनही शिल्पाकृतींचा वारसा मोठ्या ममत्वाने जपला आहे.
जगाच्या पुरोगामी विचारांची लढाई जिंकणाऱ्या इटलीला परवाच्या घटनेने थोडा कलंक लागला आहे हे मात्र नक्की. इराणचे राष्ट्राध्यक्ष रोहानी आणि इटलीचे पंतप्रधान रेन्झी यांची संयुक्त पत्रकार परिषद रोमच्या कॅपिटोलाइन म्युझियममध्ये ठेवण्यात आली होती. या म्युझियममध्ये प्रवेशाच्या वेळी देखणे नग्न पुतळे होते. रूढीप्रिय रोहानी यांना कदाचित या नग्न पुतळ्यांमुळे अप्रतिष्ठित वाटू शकते, अशी शक्यता लक्षात घेऊन, तिथल्या सांस्कृतिक विभागाने हे नग्न पुतळेच झाकून ठेवले. इराणबरोबर पूर्वी इटलीचे व्यापारी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या इराणवर आर्थिक निर्बंध टाकण्यात आले होते. गेल्याच महिन्यात हे निर्बंध उठविण्यात आले. इराण हा व्यापारासाठी प्रचंड सक्षम असलेला प्रदेश असल्याने, युरोपियन राष्ट्रांनी इराणसाठी पायघड्या घातल्या. त्याची पहिली सुरुवात इटलीच्या दौऱ्यातून झाली. इटलीबरोबर इराणने तब्बल १७०० दशलक्ष युरोचा व्यापारी करार केला. हा करार व्हावा, म्हणून इटलीची धडपड सुरू होती. त्यासाठी कोणतीही तडजोड करण्याची तयारी होती. त्याचाच परिणाम म्हणून नग्न शिल्पाकृतीही झाकून ठेवण्यात आल्या, परंतु या घटनेची युरोपात नव्हे, तर जगभर दखल घेतली गेली. सोशल मीडियावर इटलीची खिल्ली उडविण्यात आली.
नग्नतेमध्ये सौंदर्य पहायचे की लैंगिकता, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लैंगिकता ही आदिम भावना आहे. जिथे-तिथे ती दाबण्याचा प्रयत्न झाला. तिथल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली, हा इतिहास सांगतो. या आदिम भावनेला ग्रीक कलाकारांनी सौंदर्याचे अप्रतिम वळण दिले आणि जगानेही त्याचे स्वागत केले. त्या पुढारलेल्या ग्रीकला हे नग्न पुतळे झाकण्याची वेळ का यावी? इतकी व्यापारी हतबलता इटलीवर यावी? या घटनेची जगभरच्या माध्यमांनी नोंद घेतल्यानंतर, दोन्ही देशांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. इटलीच्या पंतप्रधान कार्यालयातून या घटनेचा दुरान्वयानेही संबंध नसल्याने पत्रकच काढण्यात आले. इटलीच्या सांस्कृतिक मंत्र्यांनीही अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलून दिली. इटलीच्या रोहानींचा त्यानंतर फ्रान्सचा दौरा झाला. त्या वेळीही सांस्कृतिक संघर्षांची ठिणगी पडली. फ्रान्सचे पंतप्रधान ओलांद यांनी रोहानी यांच्या आगमनानिमित्त मेजवानी ठेवली होती. त्या भोजनाच्या यादीत फ्रान्सची प्रसिद्ध वाइनही होती. इराणच्या अधिकाऱ्यांनी वाइनला आक्षेप घेतला. फ्रान्सने ती मेजवानीच रद्द केली. या घटनेचीही जगभर दखल घेतली गेली.
फ्रान्सचाही इराणबरोबर व्यापारी करार झाला, पण फ्रान्सने इराणपुढे लाळघोटेपणा केला नाही. त्या पार्श्वभूमीवर इटलीची घटना अधिक गडद झाली. टीकेचा चौफेर मारा झाला. नग्न पुतळे झाकण्याची गरज नव्हती, उलट ते झाकल्यामुळे अधिक अब्रू गेली. इटलीच्या त्या अधिकाऱ्यांवर आता कारवाईची भाषा सुरू झाली आहे, पण ‘हौदसे गई वो बुंदसे नही आती’. कारण इटलीने नग्न सौंदर्य शिल्पे झाकून ‘नंगे को खुदा भी डरता है’ या म्हणीचा जणू प्रत्ययच दिला. इटलीला ज्याचा अभिमान होता, तीच त्यांच्या लज्जेची गोष्ट बनली. यावरून प्रागतिक देशाची अधोगती मात्र झाली, हे म्हणण्याला जागा उरली हेही तितकेच खरे. या घटनेच्या निमित्ताने मानवी श्लील-अश्लीलतेच्या विचारांचे नग्न दर्शन पहायला मिळाले.

Saturday, 30 January 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- इटलीतील एक असं शहर, जिथे तब्बल 28 वर्षांनंतर मूल जन्माला आलं! 
२- यूपीच्या मुलाची फ्रेण्ड रिक्वेस्ट अमेरिकन आईने स्वीकारली, आणि...! 
३- 4G च्या 40 पट वेगवान इंटरनेट, 5G ड्रोन्सची गुगलची चाचणी 
४- आयसिससाठी काम करणार्‍या 3 भारतियांची मध्य आशियातून हकालपट्टी 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- मोदींचे सल्लागार ‘महान’ आहेत, शॉटगन शत्रुघ्न सिन्हांची टीका 
६- संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी रोजी सुरू होण्याची शक्यता 
७- BSNL च्या कर्मचाऱ्यांना झटका, नफा नाही, तर पगारवाढ नाही! 
८- पनवेलमध्ये नथुराम गोडसेला मानवंदना, बंदुकीचीही पुजा 
९- हिंदू आहे असं सांगायलाही भीती वाटते - अनुपम खेर 
१०- कोकण; हापूस आंब्याच्या चार डझनाच्या पहिल्या पेटीला लिलावात तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा भाव 
११- पेट्रोल १ रूपया प्रति लिटर, तर डिझेवर दीड रूपया प्रति लिटर वाढ 
१२- कोलकाता; दोन वर्षापूर्वी झालेल्या २१ वर्षांच्या तरुणीवरील सामूहिक बलात्कार व हत्येप्रकरणी तिघांना फाशी तर तिघांना जन्मठेप 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१३- महाराष्ट्रात मुली नव्हे, मुलं चढतात कमी वयात बोहल्यावर- एक सर्वेक्षण  
१४- वर्ध्यात धूम स्टाईल चोरी करणारे हरियाणात जेरबंद, स्कॉर्पिओसह लाखोचा मुद्देमाल जप्त 
१५- देवनारमध्ये धुराचं साम्राज्य, नागरिकांनी काळा चष्मा-रुमाल वापरावा 
१६- मुंबईत वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली : सर्व्हे 
१७- नागपूर ; युग चांडक अपहरण-हत्या : आरोपींवरील गुन्हा सिद्ध 
१८- महिलांना शनीदर्शन का नाही ?, औरंगाबाद खंडपीठाची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- मुक्रमाबाद; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
२०- मुखेडमध्ये पाण्याचा दुरुपयोग करणा-यांचे नळ कनेक्शन बंद 
२१- औरंगाबादेत अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर, तिघांना जीवनदान 
२२- शिर्डीत कचरागाडीतून रुग्णालयात नेलेल्या वृद्धाची ओळख पटली 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद, सेरेनावर मात 
२४- दाऊद इब्राहिम - छोटा राजनच्या वैमनस्यावर आधारीत येतोय राम गोपाल वर्माचा गव्हर्नमेंट 
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
(पंकज सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

http://goo.gl/uS8DX4

मुखेड मध्ये पाण्याचा दुरुपयोग करणा-यांचे नळ कनेक्शन बंद

" न.प.ची धडक कार्यवाही "
मुखेड :- रियाज शेख
      शहराला पाणीपुरवठा करणा-या कुंद्राळ प्रकल्पात अत्यल्प कमी पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची बचत व्हावी यासाठी नगर परिषद मुखेड च्यावतीने शहरातील नळधारकांना तोट्या बसवुन पाणी बचत करण्याचे आवाहण करण्यात आले होते. परंतु नेहमीप्रमाणे काही नळधारकांनी याकडे कानाडोळा करत नळाला तोट्या न बसवीता पाण्याचा दुरुपयोग करणा-या नळधारकां विरोधात दि.28 व 29 जानेवारी रोजी मुख्याधिकारी डाँ.अमितकुमार सोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये कर्मचा-यांनी धडक कार्यवाही करत पाण्याचा दुरुपयोग करणा-या नळधारकांचे नळ कनेक्शन बंद केले. सदर कार्यवाही शिवाजीनगर भागात करण्यात आली. बहुतेक नळधारकांनी नळाचे पाणी चक्क शौच्छालय, बाथरूम मध्ये सोडले होते. एकीकडे ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी मैलभर भटकंती करावी लागत आहे. तर शहरात नळाचे पाणी चक्क बाथरुम, शौच्छालय, गाडी धुणे, नाली व रस्त्यावर वाया जाऊ देत आहेत. येणा-या काळात मुखेडकरांना भिषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. म्हणुन नागरिकांनी आपले कर्तव्य समजुन पाणी बचत करण्याची गरज आहे.
      गेल्या तीन वर्षापासुन सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणा-या कुंद्राळ धरणात केवळ 7.1 टक्काच पाणीसाठा शिल्लक असुन येणा-या काळात मुखेडकरांना भिषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. सद्या शहरात सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना पाणीबचतीचे आवाहण करण्यात आले आहे. शहरात 3000 तीन हजाराहुन अधिक अधिकृत नळजोडण्या असुन दररोज 20 लाख लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्याची वाढती मागणी, पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीतुन मोठ्याप्रमाणात पाणीगळती होत आहे. तसेच शहरातील बहुतेक नळधारकांनी नळाला तोट्या न बसविल्यामुळे रोज हजारों लिटर पाणी वाया जात आहे. येणा-या काळात मुखेडकरांना भिषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार असल्यामुळे नगर परिषदेच्यावतीने पाण्याचा दुरुपयोग करणा-या नळधारकांविरुध्द विशेष मोहिम हाती घेतली आहे. शहरातील शिवाजीनगर भागात मुख्याधिकारी डाँ सोंडगे यांच्या समक्ष न.प.ने कोणत्याही दबावाला न जुमानता पाण्याचा दुरुपयोग करणा-या नळधारकांवर कार्यवाही करत नळास लाकडी खुट्या मारुन नळ कनेक्शन बंद केले.
   यावेळी न.प.चे कर्मचारी भारत गझलवाड, भिमराव चिंतलवाड, हाफिज सय्यद, व्यंकट मामीलवाड, मारोती डोंगरे, संतोष गोणारकर, लक्ष्मण बनसोडे, शिवाजी मामीलवाड, गौरव जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.
=================================================
मुक्रमाबाद; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

९१ युवकांनी केले रक्तदान#
मुक्रमाबाद :- रज्जाक कुरेशी 
शिवसेना प्रमुख , हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात ९१ युवकांनी केले रक्तदान .......!
या शिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी केले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर स.पो.नि. बालाजी कुकडे , यूवासेना जिल्हाप्रमुख लखन साबणे , डाँ.अनिल पंदिलवार , डाँ.भाटापुरकर डाँ.नरहरे डाँ.सुवर्णकार यांच्यासह अनेकांची उपस्थीती होती...
शिबिराचे रक्तसंक्रमण करण्यासाठी उदगिरचे नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेची उपस्थिती होती .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसैनिक , भाऊसाहेब बनबरे, बालाजी पसरगे, मनोज जाधव, राजरत्न गुमडे, विजय शिंदे, अतुल सुनेवाड, आदिंनी परीश्रम घेतले ....

=================================================


जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद, सेरेनावर मात


सिडनी : जर्मनीची टेनिसपटू अँजेलिक कर्बर ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीची नवी विजेती ठरली आहे. अँजेलिकने गतविजेत्या सेरेना विल्यम्सचा संघर्ष 6-4, 3-6, 6-4 असा मोडून काढत ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
सेरेना विल्यम्सनं आजवरच्या कारकीर्दीत सहावेळा ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. तिच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम विजेतेपदं जमा आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सला फेव्हरिट मानण्यात येत होतं. पण सर्व्हिस, ताकद, परतीचे फटके, लवचिकता, चापल्य आदी प्रत्येक आघाडीवर अँजेलिकनं सेरेनाला कडवी टक्कर दिली.
मोक्याच्या क्षणी अँजेलिकनं सरस कामगिरी बजावून निर्णायक गुण खिशात घातले. याच कामगिरीनं अखेर ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद अँजेलिक कर्बरच्या नावावर जमा झालं.
===============================================

औरंगाबादेत अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर, तिघांना जीवनदान


औरंगाबाद : औरंगाबादमधील वैद्यकीय क्षेत्रामध्ये अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ब्रेन डेड झालेल्या एका रुग्णाचे हृदय, लिव्हर आणि दोन किडन्या प्रत्यारोपण करण्यासाठी आज सकाळपासूनच तयारी सुरु आहे.
तरुणाच्या शरीरातील हृदय मुंबई, तर लिव्हर पुण्याला 250 किलोमीटरचा प्रवास करुन पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने हृदय, लिव्हर आणि किडनीचा प्रवास होणार आहे. पुणे आणि औरंगाबादला अॅम्ब्युलन्सद्वारे तर हृदय एअर अॅम्ब्युलन्सद्वारे औरंगाबादच्या विमानतळावरुन पाठवण्यात येणार आहे.
पाच दिवसांपूर्वी सुनील बुधवंत या व्यक्तीच्या मेंदूतुन रक्तस्त्राव होत होता. तपासणीमध्ये त्यांचा ब्रेन डेड झाला. त्यानंतर डॉक्टरांनी समुपदेशन केल्यानंतर बुधवंत कुटुंबियांनी अवयवदानाला परवानगी दिली.
15 दिवसांपूर्वी राम मगरचे ब्रेनडेड झाल्यानंतर त्याच्या आईने धाडसाचा निर्णय घेऊन तीन जणांचे प्राण वाचवले होते. त्याचीच पुनरावृत्ती सुनील बुधवंत यांच्या कुटुंबाने केली आहे.
===============================================

शिर्डीत कचरागाडीतून रुग्णालयात नेलेल्या वृद्धाची ओळख पटली

शिर्डी : कचऱ्याच्या गाडीतून वृद्धाला रुग्णालयात नेल्या प्रकरणी सहा कंत्राटी कामगारांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान वृद्धाची ओळख पटली असून त्यांच्या नातेवाईकांचा शोधही लागल्याची माहिती आहे.
कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांचं नाव ज्ञानेश्वर मंडलिक असं होतं. ते मूळ ठाण्याचे रहिवाशी असून शिर्डीत कसे आला याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.
एक वृद्ध रुग्ण पिंपळवाडी रोडवर दोन दिवसांपासून असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांनी चक्क कचऱ्याच्या गाडीचा वापर केला होता. मात्र अखेर त्यांचा मृत्यू ओढवला.
भक्तांच्या कोट्यवधींच्या दानाने साई संस्थानाची भरभराट झाली. मोठमोठाली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स सुरु झाली. शंभरहून अँब्युलन्स आल्या. पैशाची श्रीमंती बक्कळ आली. पण एका रुग्णाला उपचारासाठी नेताना प्रशासनाला एकही रुग्णवाहिका मिळू नये याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्दयी कारभारावर सध्या सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.
===============================================

वर्ध्यात धूम स्टाईल चोरी करणारे हरियाणात जेरबंद, स्कॉर्पिओसह लाखोचा मुद्देमाल जप्त


वर्धा धूम फिल्ममधला या चोऱ्या प्रत्यक्षात शक्य आहेत, असं म्हटलं तर तुम्ही समोरच्याला वेड्यात काढाल. पण हरियाणाच्या आसिफ उर्फ जाकीर हुसेनच्या टोळीनं हा पराक्रम केला आहे. त्याची मोडस ऑपरेंडीही धूम-3 स्टाईलची होती.
नोव्हेंबर महिन्यात बीड आणि वर्ध्यातील एटीएम फोडण्यात आली. 33 लाखाची रोकड लंपास झाली. पोलिसांनी शोध सुरु केला. पण हाती काहीच लागत नव्हतं.
संध्याकाळच्या सुमारास ही टोळी शहरात यायची. जिथं सुरक्षा रक्षक नाहीत, अशी एटीएम हेरायची. पहाटे 2 ते 3 च्या सुमारास चोरी करायची आणि त्यानंतर धूम स्टाईलनंच 1300 किलोमीटरचं अंतर पार करुन एका रात्रीत पुन्हा हरियाणात जायचे.
टोळीचा म्होरक्या आरीफ अजूनही फरार आहे. पेशानं तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याच्या शोधासाठी वर्धा पोलिसांची एक टीम अजूनही हरियाणात आहे. आपण कुणाच्या हाताला लागणार नाही, अशा तोऱ्यात असलेल्या चोरट्यांना कानून के हात बहोत लंबे होते है, याचा प्रत्यय वर्धा पोलिसांनी दिला आहे आणि ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
===============================================

मोदींचे सल्लागार ‘महान’ आहेत, शॉटगन शत्रुघ्न सिन्हांची टीका


नवी दिल्ली भाजपचे खासदार शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीवरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याआधी केंद्र सरकारने किमान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहिली असती, तर काही आकाश कोसळलं नसतं”, अशा शब्दात शत्रुघ्न सिन्हांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘महान’ सल्लागारांवरही तोफ डागली आहे. जर सुप्रीम कोर्टाने अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीविरोधात निर्णय दिला तर काय उत्तर देणार आहात, असा सवाल सिन्हा यांनी विचारला आहे.
भाजपचे खासदार असूनही अनेक मुद्द्यांवर भाजपविरोधी भूमिका घेण्यासही मागे-पुढे न पाहणारे म्हणून शत्रुघ्न सिन्हा ओळखले जातात. अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीवरुन त्यांनी केंद्राला चांगलंच धारेवर धरलेलं दिसतं आहे.
“जेव्हा एखादं प्रकरण सुप्रीम कोर्टात असतं, त्यावेळी अधिक सतर्क राहण्याची गरज असते. मला तर वाटतं की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहिली असती, तर काही आकाश कोसळलं नसतं. जेणेकरुन वादापासून वाचू शकलो असतो.”, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “नरेंद्र मोदी अत्यंत चांगले पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांचे महान सल्लागार जे सल्ले देतात, ते अनेकवेळा चूक ठरतात आणि राजकीय निर्णय चूक ठरू शकतात. यामुळे हे सल्ले पक्ष आणि सरकारला अडचणीत आणू शकतात.”
“देश, पक्षाबद्दल मी नेहमीच नम्रपणे विचार मांडले आहेत. मात्र मी नेहमी सत्य बोलतो. त्यामुळे माझी अनेक मतं लोकांना पटत नाहीत. मात्र, देश आणि पक्षासाठी माझ्या मनात कायम चांगला हेतू आहे.”, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.
===============================================

इटलीतील एक असं शहर, जिथे तब्बल 28 वर्षांनंतर मूल जन्माला आलं!


रोम ओसटाना हे उत्तर इटलीमधील एक छोटंसं शहर. ओसटाना या छोट्या शहराची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. निमित्तही चर्चा होण्यासारखंच आहे. गेल्या आठवड्यात ओसटाना शहरातील तुरिन हॉस्पिटलमध्ये एक मूल जन्माला आलं.
आता मुल जन्माला येणं, यात नवीन काय? किंवा जगभर सेकंदाला अनेक मुलं जन्माला येतात, मग इथे असं नवीन काय घडलं? असे तुम्हाला प्रश्न पडू शकतात. ते स्वाभाविकही आहे. मात्र, ओसटानामधील या मुलाचा जन्म ही सर्वसाधारण घटना नाहीय. कारण इथे तब्बल 28 वर्षांनी म्हणजे 1987 सालानंतर पहिल्यांदाच मूल जन्माला आलं आहे.
पाब्लो असं या मुलाचं नाव आहे. याच्या जन्मानंतर अख्ख्या ओसटाना शहरात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. एखाद्या सण-उत्सवासारखं या मुलाचा जन्म साजरा केला जातो आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर करकोचा पक्षाची प्रतिकृती तयार करुन लावण्यात आली आहे. ज्या
पाईडमांटच्या डोंगररांगांमध्ये ओसटाना शहर वसलं आहे. या शहराचे महापौर गियाकॉमा लॉमबारडोही पाब्लोच्या जन्मानंतर प्रचंड आनंदी आहेत. डोंगररांगांमधील या छोट्याशा शहरात या मुलाचा जन्म म्हणजे एखाद्या स्वप्नासारखं आहे, अशा भावना गियाकॉमा लॉमबारडोही यांनी व्यक्त केल्या.
गेल्या शतकभरापासून ओसटाना शहराची लोकसंख्या कमालीची घटत चालली आहे. पाब्लोच्या जन्मानंतर या शहराची संख्या 85 वर पोहोचली आहे. या लोकसंख्येतीलही अर्धीच लोकसंख्या कायमस्वरुपी ओसटानामध्ये राहते.
महापौर लॉमबारडो सांगतात, “19 व्या शतकच्या सुरुवातीला ओसटाना शहर एकूण एक हजार लोकसंख्येची वस्ती होती.”
दुसऱ्या महायुद्धानंतर ओसटानामधील जन्मदर कमी होत गेला. 1975 नतंर ओसटानातील जन्मदर कमालीचा कमी झाला. 1976 ते 1987 या वर्षांदरम्यान 17 मुलांचा जन्म झाला. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी म्हणजे आता 2016 साली पाब्लोचा जन्म झाला आहे.
लोकसंख्येशी लढण्यासाठी ओसटानाने नव-नव्या योजना आणल्या. मात्र, त्यांचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही.
पाब्लो ज्यांच्या घरी जन्माला आला, तेही पाच वर्षांपूर्वी परदेशात जाण्याच्या विचारात होते. मात्र, जवळच्या डोंगरांमध्ये राहण्याची सुविधा मिळाली आणि ते तिथेच थांबले.
द नेशनल यूनियन ऑफ माऊंटेन टॉउन्स अँड कॉम्युनिटिजचे मारको बसॉने यांनी सांगितले, “पाब्लो ज्यांच्या घरात जन्माला आला, त्या घराचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याचा जन्म हे याच गोष्टीचे संकेत आहेत.”
ओसटाना हे एकमेव शहर नाही, इटलीमध्ये अशी अनेक शहरं आहेत, जिथे कमी लोकसंख्या आहे. येथील अधिकाधिक तरुणवर्ग नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होऊ लागला आहे. स्थलांतराला रोखण्यासाठी मोफत घरं देण्यासही येथील अनेक लोक तयार आहेत. मात्र, स्थलांतर थांबता थांबत नाही आणि पर्यायाने कमी लोकसंख्येचा मुद्दा भेडसावत आहे.
===============================================

देवनारमध्ये धुराचं साम्राज्य, नागरिकांनी काळा चष्मा-रुमाल वापरावा


मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आटोक्यात आली आहे. मात्र या आगीचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. परिसरात धुराचं साम्राज्य असल्यामुळे परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अग्निशमन दलाच्या वतीनं जेट कूल सोल्युशन या नव्या पद्धतीचा वापर करण्यात आला. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग अग्निशमन दलाद्वारे करण्यात आला. कचऱ्यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला गेला.

===============================================

BSNL च्या कर्मचाऱ्यांना झटका, नफा नाही, तर पगारवाढ नाही!


नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. बीएसएनएल कंपनीला यंदा नफा न झाल्यास पुढील वर्षी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली जाणार नाही, असे बीएसएनएलचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक अनुपम श्रीवास्तव यांनी माहिती दिली.
श्रीवास्तव यांनी सांगितले, “यंदाचं वर्ष बीएसएनएलच्या इतिहासात सर्वात महत्त्वाचं असणार आहे. कारण वेतन समीक्षा समितीनुसार 2017 साली पगारवाढ दिली जाणार आहे. मात्र, कंपनीला जोपर्यंत नफा होत नाही, तोपर्यंत पगारवाढ दिली जाणार नाही.”

कर्नाटकमध्ये हाय स्पीड मोबाईल डेटा ऑफलोड सेवा सुरु केली आहे. ही सेवेमुळे नफा वाढला तरच बीएसएनएल कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. एकंदरीत काय तर, कर्नाटकमधील ऑफलोड सेवेवर कर्मचाऱ्यांची पगारवाढ अवलंबून आहे. अन्यथा पगारवाढीला कर्मचारी मुकणार आहेत.
===============================================

मुंबईत वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली : सर्व्हे

मुंबई : राजधानी दिल्लीच्या पावलावर पाऊल टाकत मुंबईतही प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईतल्या वायूप्रदूषणाची पातळी 325 एअर क्वॉलिटी इन्डेक्स (एक्यूआय) तर संध्याकाळी 341 एक्यूआयवर पोहचली होती.
दिल्लीतल्या प्रदूषणानंही 341 चा आकडा पार केला होता. सफर प्रकल्पाअंतर्गत नऊ उपनगरांमध्ये लावलेल्या प्रदूषणमापकात झालेल्या नोंदीनुसार पहिल्यांदाच मुंबईची हवा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाली आहे.
तापमानातील बदल आणि देवनार कचरा डेपोला लागलेली आग यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मालाडध्ये हीच पातळी सर्वाधिक म्हणजे 432 एवढी आहे. त्यानंतर चेंबूरमध्ये 391, अंधेरीत 366, भांडूपमध्ये 349, बोरीवलीत 340, बीकेसीत 322 तर कुलाब्यात 311 एवढी आहे.
सर्वात कमी प्रदूषण वरळीत असून तिथं ही पातळी 211 एवढी आहे. वायूप्रदूषणाची पातळी 200 च्या वर गेल्यास ती हवा मानवी शरीरासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे या प्रदूषणाला आळा घालणं गरजेचं झालं आहे.
===============================================

यूपीच्या मुलाची फ्रेण्ड रिक्वेस्ट अमेरिकन आईने स्वीकारली, आणि...!


मुंबई/लखनऊ : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर मनोरंजनासाठी किंवा टाईमपास म्हणून वेळ घालवत असल्याचं आपण अनेकांना पाहिलं आहे. मात्र या फेसबुकने अनेकांना अनेक वर्षांनी एकत्र आणल्याची किस्सेही आपण ऐकले आहेत. तसाच काहिसा अनुभव उत्तर प्रदेशातील तरुणाला आहे.
फेसबुकमुळे भारतीय मुलाच्या लग्नाला अमेरिकन आईने हजेरी लावली.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील कृष्णमोहन त्रिपाठी या तरुणाला फेसबुकवर नव-नवे मित्र करण्याचा छंद. कृष्णमोहन हा डॉक्टर राममनोहर लोहिया विश्वविद्यालयात एम कॉम करतो. फेसबुकवर सर्फिंग करताना त्याची ओळख अमेरिकेच्या 60 वर्षीय डिबरा एन मिलर या महिलेशी झाली.
मग फेसबुकवर हाय-बाय करता करता या दोघांमध्ये एक घट्ट नातं तयार झालं. ते नातं होतं माय-लेकराचं.
कृष्णमोहनला मुलगा मानलं
चॅटिंगदरम्यान डिबरा यांनी आपल्याला अपत्य नसल्याचं एकदा कृष्णमोहनला सांगितलं. त्यावेळी मी तुम्हाला मुलाप्रमाणे आणि तुम्ही मला आईप्रमाणेच असल्याचं कृष्णमोहनने डिबरा यांना सांगितलं. त्यावर डिबरा यांनीही कृष्णमोहनला मुलाप्रमाणेच मानलं.
डिबरा यांचे पती स्पेस इंजिनिअर होते. ते आता निवृत्त झाले आहेत. तर डिबरा स्वत: अमेरिकेत वैद्यकीय व्यवसायशी संबंधित आहे.
कृष्णमोहनच्या लग्नाला डिबरांची हजेरी
कृष्णमोहन आपल्या अमेरिकेतील आईला म्हणजेच डिबरा यांना लग्न ठरल्याचं चॅटिंगवरूनच सांगितलं. तसंच लग्नाला उपस्थित राहण्याची विनंती केली. कृष्णमोहनचं 29 जानेवारीला गोरखपूरमध्ये लग्न होतं. मात्र डिबरा यांनी कृष्णमोहनचं निमंत्रण स्वीकारुन 25 जानेवारीलाच हजेरी लावली.
आपल्या अमेरिकेच्या मानलेल्या आईने थेट लग्नाला हजेरी लावल्याने, कृष्णनोहनचे कुटुंबीय भारावून गेले.
लिलावात घेतलेली 125 वर्षी जुनी अंगठी भेट
डिबरा यांनी लग्नात धमाल मस्ती केली. पोटच्या मुलाचं लग्न असल्याचा आनंद, डिबरा यांच्या चेहऱ्यावर होता. डिबरा यांनी कृष्णमोहनचं भारतीय परंपरेचं लग्न जवळून पाहिलं. स्वत:ही भारतीय पोषाखातच लग्नाला हजेरी लावली.
यावेळी डिबरा यांनी आपल्या लेकाच्या लग्नात सुनेला एक अंगठी भेट दिली. ही अंगठी साधी-सुधी नव्हती, तर डिबरा यांनी यासाठी लिलावात बोली लावून खरेदी केली होती. ही अंगठी तब्बल 125 वर्ष जुनी आहे.

अंगठीचं हे रहस्य ऐकून कृष्णमोहनसह उपस्थितांना धक्काच बसला.
===============================================

नागपूर ; युग चांडक अपहरण-हत्या : आरोपींवरील गुन्हा सिद्ध

नागपूर : दोन वर्षापूर्वी 8 वर्षीय युग चांडकच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा सिद्ध झाला आहे. आता याप्रकरणी नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालय  3 फेब्रुवारीला शिक्षेची सुनावणी करणार आहे.
राजेश डावरे आणि अरविंद सिंग यांच्यावर युगचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप होता. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचं न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हटलं आहे.
शाळेतून परतलेल्या युगचं अपहरण
एक सप्टेंबर 2014 रोजी युगचे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि आपल्या राहत्या गुरुवंदन अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बेग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला.
इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले.
दरम्यान, ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे नागपूर पोलिसांची अनेक पथक नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होती.
===============================================

4G च्या 40 पट वेगवान इंटरनेट, 5G ड्रोन्सची गुगलची चाचणी


न्यूयॉर्क : सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्रोनची चाचणी गुगल घेत असल्याचं वृत्त ‘दि गार्डियन’ने दिलं आहे. या ड्रोनमुळे सध्याच्या 4G इंटरनेटच्या चाळीस पट जलद असा 5G स्पीड मिळवण्यासाठी ही चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे.
स्कायब्लेंडर असं या प्रकल्पाचं कोडनेम आहे. त्याच्या ट्रान्समिशनची फ्रिक्वेन्सी 28GHz आणि रेंज कमी असूनही सध्याच्या 4G च्या तुलनेत 5G प्रचंड वेगवान असण्याचा दावा केला जात आहे.
उंचावरील ड्रोनकडून मिलीमीटर व्हेव तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, हे एक आव्हान असलं तरी गुगल यावर मात करण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. सध्या हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्यास वेळ आहे. स्कायब्लेंडर हा गुगलच्या हाय स्पीड इंटरनेट मिळवण्यासाठी प्रयोग करणाऱ्या प्रोजेक्ट लून या प्रकल्पाचा एक भाग आहे.
गुगलने एफसीसी म्हणजेच फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन या रेडियो, टीव्ही, वायर, उपग्रहांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नियंत्रण करणाऱ्या संस्थेकडून जुलैपर्यंत चाचणी करण्याची परवानगी घेतली आहे.
=========================================================
महिलांना शनीदर्शन का नाही ?, औरंगाबाद खंडपीठाची जिल्हाधिकार्‍यांना नोटीस
औरंगाबाद – 30 जानेवारी : शनी शिंगणापूर प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अहमदनगर जिल्हाधिकार्‍यांना नोटीस बजावली आहे. शनी शिंगनापूर प्रकरणी चार आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला ही नोटीस प्राप्त झालीये.
डॉक्टर वसुधा पवार यांनी शनीच्या चौथर्‍यावर पुरुषांसह महिलांनाही प्रवेश मिळावा आणि पूजेचा समान आधिकार मिळाला पाहिजे, या संदर्भात औरंगाबाद खंडपीठत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षक, मुंबई धर्मादाय आयुक्त आणि राज्याचे विधि-न्याय खात्याचे मुख्य सचिवाना नोटीस बजावली आहे. शनी मंदिरात महिलांना प्रवेश का दिला जात नाही याबद्दल या नोटिसीमध्ये विचारणा करण्यात आली आहे. याबद्दल जिल्ह्याधिकार्‍यांना चार आठवड्यात खुलासा द्यायचा आहे.
=========================================================
पनवेलमध्ये नथुराम गोडसेला मानवंदना, बंदुकीचीही पुजा



पनवेल – 30 जानेवारी : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्या बंदुकीने नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या त्या बंदुकीची पनवेलमध्ये पुजा करण्यात आली. एवढंच नाहीतर नथुराम गोडसेला मानवंदनाही देण्यात आली.पनवेल मध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नथुराम गोडसे यांच्या फोटोस आणि त्यांनी ज्या बंदुकीने गांधी यांची हत्या केली त्या बंदुकीच्या फोटोचे देखील पूजन करण्यात आले. महाराणा प्रताप बटालियन या हिंदू संघटनेद्वारे नथुराम गोडसे यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नथुराम गोडसे देशासाठी शहीद झाले. त्यांनी आपले प्राणअर्पित केले. कारण, महात्मा गांधी यांच्यामुळे देशाची फाळणी झाली आणि त्यानंतर ज्या कत्तली घडल्या त्याला गांधी जबाबदार आहे. गांधी हे भारताचे राष्ट्रपिता नाहीच आणि आम्ही त्यांना मानत नाही असं महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांचं म्हणणंय. तसंच नथुराम गोडसेने ज्या शस्त्राने गांधींची हत्या केली. त्या शस्त्राची 2008 पासून आम्ही पूजा करतोय असंही सेंगर यांनी सांगितलं.
=========================================================
आयसिससाठी काम करणार्‍या 3 भारतियांची मध्य आशियातून हकालपट्टी

30 जानेवारी : मध्य आशियामधून दहशतवादी संघटना आयसिससाठी काम करणार्‍या तीन भारतीयांना परत पाठवण्यात आलंय. या तिघांना एनआयएने अटक केली आहे.त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि भारताविरोधात युद्ध छेडण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्य आशियात ते आयसिससाठी निधी जमा करणे आणि जहाल साहित्य पसरवण्याचे उद्योग करत होते असं कळतंय. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून कसून चौकशी सुरू आहे.
=========================================================

हिंदू आहे असं सांगायलाही भीती वाटते - अनुपम खेर


मुंबई, दि. ३० - मी हिंदू आहे, असं सांगायला मी घाबरतो असं सांगत अनुपम खेर यांनी भारतातल्या मानसिकतेवर वेगळा प्रकाश टाकला आहे. जर मी सांगितलं की मी हिंदू आहे आणि मी कपाळाला तिलक लावलं, तर माझ्यावर लोक RSS चा असल्याचा शिक्का मारून लोक मोकळे होतील अशी व्यथा खेर यांनी सीएनएन आयबीएनच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
देशामध्ये दादरीची चर्चा होते, जी अत्यंत दुर्दैवी घटना होती. परंतु मालदाचं काय काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचं काय असा सवालही खेर यांनी विचारला आहे.
भारतीय सिनेजगत राजकारणापासून दूर होतं, परंतु २०१४ पासून परिस्थिती बदलल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेने नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ नये म्हणून काहींनी पत्रक काढलं, ज्यावर अनेकांनी सह्या केल्या आणि तेच मोदी प्रचंड मतांनी निवडून आले, त्यामुळे अनेकांची अडचण झाल्याचे खेर म्हणाले.
२०१० मध्ये पद्म पुरस्कारांचा दर्जा घसरल्याची, कुणालाही पुरस्कार दिले जातात अशी टिप्पणी केलेल्या खेर यांनी आता मात्र, पद्मभूषण मिळाल्यावर आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा सन्मान असल्याचं मत व्यक्त केलं आणि त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. परंतु खेर यांनी आपली बाजू मांडताना, २०१० मध्ये अनेक गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तिला पद्म पुरस्कार दिल्याचा निषेध म्हणून तसे ट्विट केल्याचे सांगितले. या व्यक्तिला देशाबाहेर जायची बंदी होती, त्याला पद्म पुरस्कार कसा दिला जातो, असे सांगत त्यामुळे आपण तशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे खेर म्हणाले.

=========================================================
कोकण; हापूस आंब्याच्या चार डझनाच्या पहिल्या पेटीला लिलावात तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा भाव


यंदाच्या मोसमातील पहिल्या आंब्यानं आज कोल्हापूरच्या बाजारात हजेरी लावली. विक्रीसाठी कोकणातून घाटमाथ्यावर आलेल्या हापूस आंब्याच्या चार डझनाच्या पहिल्या पेटीला लिलावात तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. याचा अर्थ डझनाचा भाव २,८७५ रुपये पडला असून प्रति आंब्याचा भाव २४० रुपये आहे.
कोकणचा राजा अपेक्षेपेक्षा कितीतरी आधी अवतरल्यानं करवीरच्या बाजारात उत्साहाचे वारे संचारले. पहिली पेटी सोलापूरचे प्रसिद्ध व्यापारी सौदागर बोचडे यांनी खरेदी केली. त्यामुळं हा एक नंबरचा पहिला आंबा कोल्हापूरकर नव्हे, तर सोलापूरकर चाखणार आहेत. 

पावसचे सलीम काझी आणि देवगडचे उमेश तेली यांच्या बागेतला आंबा विक्रीसाठी एम.डी. बागवान यांच्याकडे विक्रीला आले होते. सहकार उपनिबंधक अरुण काकडे यांनी हापूसच्या आणखी दोन पेट्यांचाही लिलाव केला. दोन नंबर आंब्याची पाच डझनाची पेटी सात हजारांना तर त्या खालोखाल चार डझनाची पेटी साडे पाच हजारांना गेली. या दोन्ही पेट्यांचे ग्राहक कोल्हापुरातीलच आहेत. 
=========================================================

दाऊद इब्राहिम - छोटा राजनच्या वैमनस्यावर आधारीत येतोय राम गोपाल वर्माचा गव्हर्नमेंट


मुंबईच्या अंडरवर्ल्डला रंगीत पडद्यावर आणण्यासाठी मशहूर असलेला राम गोपाल वर्मा आपला पुढचा सिनेमा दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या वैमनस्यावर आधारीत बनवत आहे. स्वत: रामूनेच ट्विटरच्या माध्यमातून आज ही बातमी दिली असून चक्क गुगल डॉक्समध्ये सविस्तर माहितीच शेअर केली आहे.
गव्हर्नमेंट असं नाव असलेल्या या सिनेमामध्ये दाऊद व राजन वेगळे झाल्यानंतरच्या अंडरवर्ल्डचं चित्रण असेल. रामू सांगतो, दोघं एकत्र होते, तो पर्यंत मुंबई शांत होती, परंतु दोघे वेगळे जाल्यानंतर, काँट्रॅक्ट किलिंग वाढलं, अनेक छोट्या मोठ्या गँग्ज उदयाला आल्या आणि खंडणीचं नवं पर्व सुरू झालं. दाऊदने दहशतवादी नी आएएसआयशीही दोस्ती केली आणि अखेर सरकारनं राजनला हाताशी धरलं.
दाऊद व छोटा राजनखेरीज या चित्रपटामध्ये अनीस इब्राहीम, छोटा राजनची पत्नी सुजाता, मोलिका बेदी, अबू सालेम, मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे आणि अरूण गवळी यांच्याही व्यक्तिरेखा असणार आहेत. 
याआधी सत्या, कंपनीसारखे अंडरवर्ल्डवरचे सिनेमे रामगोपाल वर्माने बनवले आहेत. परंतु हा नवा चित्रपट गव्हर्नमेंट सत्यकथेच्या जास्त जवळ असेल असा दावा रामूने केला आहे. गुन्हेगारी संघटना आणि सरकारी संस्था यांच्यातल्या संबंधावरही या चित्रपटात भाष्य असेल असं सांगताना छोटा राजनच्या अटकेतून या सगळ्या बाबी समोर आल्याचं रामूनं म्हटलं आहे.
==================================================

महाराष्ट्रात मुली नव्हे, मुलं चढतात कमी वयात बोहल्यावर- एक सर्वेक्षण 


कमी वयातच मुलींचे होणारे लग्न हा देशभरात चिंतेचा विषय असला तरी महाराष्ट्रात मात्र ही परिस्थिती अगदी उलट असून याबाबतीत मुलांची संख्या मुलींपेक्षा अधिक आहे. राज्यात प्रत्येक दहावा मुलगा आणि प्रत्येक ९वी मुलगी कमी वयात बोहल्यावर चढते, अशी माहिती केंद्र सरकारच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. तसेच आजच्या काळातही १५ ते १९ या वयोगटात माता बनणा-या मुलींचे राज्यातील प्रमाण ५ टक्के इतके आहे. 
नीति आयोगाच्या आकड्यांनुसार, कमी वयातच मुलांची लग्नं होण्याचे सर्वाधिक प्रमाण औरंगाबादमध्ये आहे, तेथे ३० टक्क्यांहून अधिक मुलांचे लग्न कायदेशीर मान्यता असणा-या २१ वर्षांच्या आतच केले जाते. त्यानंतर जालना (२७.६ टक्के), बीड (२४.७ टक्के), सोलापूर (२२.५) नांदेड (२१.१ टक्के), हिंगोली (२०.७ टक्के) आणि अहमदनगर (२०.५ टक्के) यांचा नंबर लागतो. तर १८ वर्षांच्या आतच मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण हिंगोलीत (१७.६ टक्के) सर्वाधिक असून त्यानंतर नांदेड (१७.५ टक्के), परभणीमध्ये (१७.५) हे प्रमाण अधिक आहे. 
दरम्यान मुलींनी कमी वयातच आई बनण्याचे सर्वाधिक प्रमाण औरंगाबादमध्ये (१० टक्के) आहे. त्याव्यतिरिक्त सांगलीत ८.७ टक्के, उस्मानाबाद ८.१ टक्के आणि बीडमध्ये ७.५ टक्के मुलींनी कमी वयातच बाळाला जन्म दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये मुलींच्या लग्नाचे वय २५ तर मुलांच्या लग्नाचे वय २५-२६ इतके असते. तर मायानगरी मुंबईत मुलांच्या लग्नाचे वय सुमारे २७ तर मुलींचे वय सुमारे २४ असते.