नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सर्व
मंत्र्यांकडून कार्याचा अहवाल मागवला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच्या 19 महिन्यांच्या कालावधीत मंत्र्याच्या कार्याचा आढावा घेण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे.
मंत्र्यांकडून कार्याचा अहवाल मागवला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच्या 19 महिन्यांच्या कालावधीत मंत्र्याच्या कार्याचा आढावा घेण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे.
आज संध्याकाळी सर्व मंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत 25 कॅबिनेट, 13 स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आणि 25 राज्यमंत्री अशा एकूण 63 मंत्र्यांच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे.
यावेळी प्रत्येक केंद्रीय मंत्र्याकडून संबंधित मंत्रालयाचा रिपोर्ट मागितला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कामगिरीचा आढावा घेणारी अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे.

No comments:
Post a Comment