लॉस एंजलिस : भारतीय वंशाचे योगगुरु बिक्रम चौधरी यांना अमेरिकेच्या एका न्यायालयाने लैंगिक शोषणप्रकरणी सहा कोटी 78 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका वकिलाचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बिक्रम चौधरी यांच्यावर आहे. मात्र बिक्रम चौधरींनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
बिक्रम चौधरी यांनी वकील मीनाक्षी जफा-बोड्डे यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. वकिलाने याचिकेत आरोप केला होता की, “चौधरी यांच्यासाठी काम करताना मला लिंगभेद, चुकीच्या पद्धतीने निलंबन आणि लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला.”
लॉस एंजलिस ज्युरींनी सोमवारी यावर चर्चा केली आणि मीनाक्षी जफा-बोड्डेच्या बाजूने निकाल दिला. योगगुरु बिक्रम चौधरी यांनी सर्व आरोप फेटाळत निर्दोष असल्याचा दावा केला. गैरवर्तन आणि शोषणाचे आरोप चुकीचे असल्याचं त्यांनी सांगितलं.
बिक्रम चौधरी म्हणाले की, “मीनाक्षीकडे अमेरिकेत वकिली करण्याचा परवाना नसल्याने तिला 2013मध्ये निलंबित केलं होतं. मात्र चौधरींनी द्वेष आणि फसवणूक केल्याचं ज्युरींच्या चौकशीत स्पष्ट झालं. त्यामुळे मीनाक्षीला नुकसानभरपाई मिळाली.”
“माझी वकील म्हणून काम करण्यासाठी तू भारतात जा, असं योगगुरु बिक्रम चौधरींनी मला 2011 मध्ये सांगितलं होतं. नोकरीदरम्यान बिक्रम चौधरींनी माझं लैंगिक शोषण केलं. तसंच अश्लील टिप्पणीही केली होती,” असा आरोप मीनाक्षी जफा-बोड्डेने केला आहे. दरम्यान बिक्रम चौधरी यांच्यावर बलात्काराचाही आरोप आहे.

No comments:
Post a Comment