Wednesday, 6 January 2016

मुखेड येथे दर्पण दिनानिमित्य आजी-माजी आमदार तर्फे पत्रकारांचा सन्मान



                 मुखेड :- 
      दर्पण दिनानिमित्य शहरात आजी-माजी आमदारांकडुन पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. 
मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पण'कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस 'दर्पण दिन म्हणुन दरवर्षी 6 जानेवारी रोजी साजरा केला जाते. दर्पण दिनानिमित्य आज दुपारी 12 वाजता आमदार राठोड यांच्या संपर्क कार्यालयात शहरातील पत्रकारांचा छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व त्यानंतर उपस्थित पत्रकारांना डायरी, पेन व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटराव पाटील चांडोळकर हे होते तर प्रमुख उपस्थित भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव अण्णा साठे, तालुका अध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, डाँ माधव उच्चेकर, पं स सदस्य राजु घोडके, माजी उपनगराध्यक्ष जगदीश बियाणी, शिवाजी गेडेवाड, शिवाजी राठोड, केशव राठोड, शिवाजी खतगावकर, ज्ञानेश्वर डोईजड आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचलन दिगंबर सोनटक्के यांनी केले तर आभार शेख जाकिर यांनी मानले.
शासकिय विश्रामगृह येथे मुखेड शहर काँग्रेस कमेटी च्यावतीने पत्रकार बांधवांचा दर्पण दिनी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर हे होते. तर शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, प्रवक्ते दिलीप कोडगीरे, खाजा धुंदी, रामेश्वर इंगोले, शिवकुमार बंडे, वलीयोद्दीन शेख, मोहन तुरटवाड, बाळु आकुलवाड, बालाजी बाभळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते पत्रकारांना पेन व गुलाबपुष्प देवुन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तालुका सरचिटणीस श्रावण रँपनवाड यांनी केले. तर पत्रकार संघातर्फे रियाज शेख यांनी आयोजकांचे आभार मानले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष डाँ.व्यंकटराव सुभेदार भोसले यांच्या तर्फे पत्रकार बांधवांचा सम्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शेख रियाज, अँड.मिलिंद कांबळे, शेख महेताब, नवनाथ भद्रे, बबलु मुल्ला, संदिप पिल्लेवाड, के.एन.कांबळे, सुर्यकांत भोईवाडे, संजय पिल्लेवाड, कैलास मादसवाड आदींची उपस्थिती होती.

No comments: