Wednesday, 27 January 2016

दहशतवाद्याच्याच बंदुकीने दहशतवाद्याचा खात्मा करणारा शूर


नवी दिल्ली : मरणोत्तर सन्मान करण्यात आलेल्या शहीद जवानांपैकी एक आहेत जगदीश चंद्र. पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान जगदीश चंद्र यांच्याकडे कोणतेही शस्त्र नसताना त्यांनी दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. 
केवळ कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण देशाला शहीद जगदीश चंद्र यांचा अभिमान आहे. जगदीश चंद्र यांना मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 
पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी हल्ल्यादरम्यान जगदीश चंद्र हे मेसमध्ये होते. ज्यावेळी त्यांना एक दहशतवादी दिसला, त्यावेळी त्यांनी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता, दहशतवाद्याचा त्याच्याच बंदुकीने खात्मा केला. मात्र, दहशतवाद्याच्या गोळीनेच जगदीश चंद्र शहीद झाले. 
शहीद जगदीश चंद्र यांचं मूळ गाव हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात आहे. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे.

No comments: