[अंतरराष्ट्रीय]
१- इटलीतील एक असं शहर, जिथे तब्बल 28 वर्षांनंतर मूल जन्माला आलं!
२- यूपीच्या मुलाची फ्रेण्ड रिक्वेस्ट अमेरिकन आईने स्वीकारली, आणि...!
३- 4G च्या 40 पट वेगवान इंटरनेट, 5G ड्रोन्सची गुगलची चाचणी
४- आयसिससाठी काम करणार्या 3 भारतियांची मध्य आशियातून हकालपट्टी
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- मोदींचे सल्लागार ‘महान’ आहेत, शॉटगन शत्रुघ्न सिन्हांची टीका
६- संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी रोजी सुरू होण्याची शक्यता
७- BSNL च्या कर्मचाऱ्यांना झटका, नफा नाही, तर पगारवाढ नाही!
८- पनवेलमध्ये नथुराम गोडसेला मानवंदना, बंदुकीचीही पुजा
९- हिंदू आहे असं सांगायलाही भीती वाटते - अनुपम खेर
१०- कोकण; हापूस आंब्याच्या चार डझनाच्या पहिल्या पेटीला लिलावात तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा भाव
११- पेट्रोल १ रूपया प्रति लिटर, तर डिझेवर दीड रूपया प्रति लिटर वाढ
१२- कोलकाता; दोन वर्षापूर्वी झालेल्या २१ वर्षांच्या तरुणीवरील सामूहिक बलात्कार व हत्येप्रकरणी तिघांना फाशी तर तिघांना जन्मठेप
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- महाराष्ट्रात मुली नव्हे, मुलं चढतात कमी वयात बोहल्यावर- एक सर्वेक्षण
१४- वर्ध्यात धूम स्टाईल चोरी करणारे हरियाणात जेरबंद, स्कॉर्पिओसह लाखोचा मुद्देमाल जप्त
१५- देवनारमध्ये धुराचं साम्राज्य, नागरिकांनी काळा चष्मा-रुमाल वापरावा
१६- मुंबईत वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली : सर्व्हे
१७- नागपूर ; युग चांडक अपहरण-हत्या : आरोपींवरील गुन्हा सिद्ध
१८- महिलांना शनीदर्शन का नाही ?, औरंगाबाद खंडपीठाची जिल्हाधिकार्यांना नोटीस
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- मुक्रमाबाद; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
२०- मुखेडमध्ये पाण्याचा दुरुपयोग करणा-यांचे नळ कनेक्शन बंद
२१- औरंगाबादेत अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर, तिघांना जीवनदान
२२- शिर्डीत कचरागाडीतून रुग्णालयात नेलेल्या वृद्धाची ओळख पटली
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद, सेरेनावर मात
२४- दाऊद इब्राहिम - छोटा राजनच्या वैमनस्यावर आधारीत येतोय राम गोपाल वर्माचा गव्हर्नमेंट
~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
(पंकज सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
मुखेड मध्ये पाण्याचा दुरुपयोग करणा-यांचे नळ कनेक्शन बंद
" न.प.ची धडक कार्यवाही "
मुखेड :- रियाज शेख
शहराला पाणीपुरवठा करणा-या कुंद्राळ प्रकल्पात अत्यल्प कमी पाणीसाठा असल्यामुळे पाण्याची बचत व्हावी यासाठी नगर परिषद मुखेड च्यावतीने शहरातील नळधारकांना तोट्या बसवुन पाणी बचत करण्याचे आवाहण करण्यात आले होते. परंतु नेहमीप्रमाणे काही नळधारकांनी याकडे कानाडोळा करत नळाला तोट्या न बसवीता पाण्याचा दुरुपयोग करणा-या नळधारकां विरोधात दि.28 व 29 जानेवारी रोजी मुख्याधिकारी डाँ.अमितकुमार सोंडगे यांच्या उपस्थिती मध्ये कर्मचा-यांनी धडक कार्यवाही करत पाण्याचा दुरुपयोग करणा-या नळधारकांचे नळ कनेक्शन बंद केले. सदर कार्यवाही शिवाजीनगर भागात करण्यात आली. बहुतेक नळधारकांनी नळाचे पाणी चक्क शौच्छालय, बाथरूम मध्ये सोडले होते. एकीकडे ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी मैलभर भटकंती करावी लागत आहे. तर शहरात नळाचे पाणी चक्क बाथरुम, शौच्छालय, गाडी धुणे, नाली व रस्त्यावर वाया जाऊ देत आहेत. येणा-या काळात मुखेडकरांना भिषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. म्हणुन नागरिकांनी आपले कर्तव्य समजुन पाणी बचत करण्याची गरज आहे.
गेल्या तीन वर्षापासुन सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणा-या कुंद्राळ धरणात केवळ 7.1 टक्काच पाणीसाठा शिल्लक असुन येणा-या काळात मुखेडकरांना भिषण दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. सद्या शहरात सहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना पाणीबचतीचे आवाहण करण्यात आले आहे. शहरात 3000 तीन हजाराहुन अधिक अधिकृत नळजोडण्या असुन दररोज 20 लाख लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. पाण्याची वाढती मागणी, पाणीपुरवठा करणा-या जलवाहिनीतुन मोठ्याप्रमाणात पाणीगळती होत आहे. तसेच शहरातील बहुतेक नळधारकांनी नळाला तोट्या न बसविल्यामुळे रोज हजारों लिटर पाणी वाया जात आहे. येणा-या काळात मुखेडकरांना भिषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार असल्यामुळे नगर परिषदेच्यावतीने पाण्याचा दुरुपयोग करणा-या नळधारकांविरुध्द विशेष मोहिम हाती घेतली आहे. शहरातील शिवाजीनगर भागात मुख्याधिकारी डाँ सोंडगे यांच्या समक्ष न.प.ने कोणत्याही दबावाला न जुमानता पाण्याचा दुरुपयोग करणा-या नळधारकांवर कार्यवाही करत नळास लाकडी खुट्या मारुन नळ कनेक्शन बंद केले.
यावेळी न.प.चे कर्मचारी भारत गझलवाड, भिमराव चिंतलवाड, हाफिज सय्यद, व्यंकट मामीलवाड, मारोती डोंगरे, संतोष गोणारकर, लक्ष्मण बनसोडे, शिवाजी मामीलवाड, गौरव जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.
=================================================
मुक्रमाबाद; बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
शिवसेना प्रमुख , हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात ९१ युवकांनी केले रक्तदान .......!
या शिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी केले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर स.पो.नि. बालाजी कुकडे , यूवासेना जिल्हाप्रमुख लखन साबणे , डाँ.अनिल पंदिलवार , डाँ.भाटापुरकर डाँ.नरहरे डाँ.सुवर्णकार यांच्यासह अनेकांची उपस्थीती होती...
शिबिराचे रक्तसंक्रमण करण्यासाठी उदगिरचे नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेची उपस्थिती होती .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसैनिक , भाऊसाहेब बनबरे, बालाजी पसरगे, मनोज जाधव, राजरत्न गुमडे, विजय शिंदे, अतुल सुनेवाड, आदिंनी परीश्रम घेतले ....

९१ युवकांनी केले रक्तदान#
मुक्रमाबाद :- रज्जाक कुरेशी शिवसेना प्रमुख , हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात ९१ युवकांनी केले रक्तदान .......!
या शिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी केले.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते व्यंकटराव पाटील गोजेगावकर स.पो.नि. बालाजी कुकडे , यूवासेना जिल्हाप्रमुख लखन साबणे , डाँ.अनिल पंदिलवार , डाँ.भाटापुरकर डाँ.नरहरे डाँ.सुवर्णकार यांच्यासह अनेकांची उपस्थीती होती...
शिबिराचे रक्तसंक्रमण करण्यासाठी उदगिरचे नागप्पा अंबरखाने ब्लड बँकेची उपस्थिती होती .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसैनिक , भाऊसाहेब बनबरे, बालाजी पसरगे, मनोज जाधव, राजरत्न गुमडे, विजय शिंदे, अतुल सुनेवाड, आदिंनी परीश्रम घेतले ....
=================================================
जर्मनीच्या अँजेलिक कर्बरला ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद, सेरेनावर मात
सिडनी : जर्मनीची टेनिसपटू अँजेलिक कर्बर ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीची नवी विजेती ठरली आहे. अँजेलिकने गतविजेत्या सेरेना विल्यम्सचा संघर्ष 6-4, 3-6, 6-4 असा मोडून काढत ऑस्ट्रेलिया ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.
सेरेना विल्यम्सनं आजवरच्या कारकीर्दीत सहावेळा ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. तिच्या नावावर 21 ग्रँड स्लॅम विजेतेपदं जमा आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सला फेव्हरिट मानण्यात येत होतं. पण सर्व्हिस, ताकद, परतीचे फटके, लवचिकता, चापल्य आदी प्रत्येक आघाडीवर अँजेलिकनं सेरेनाला कडवी टक्कर दिली.
मोक्याच्या क्षणी अँजेलिकनं सरस कामगिरी बजावून निर्णायक गुण खिशात घातले. याच कामगिरीनं अखेर ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचं विजेतेपद अँजेलिक कर्बरच्या नावावर जमा झालं.
===============================================
===============================================
===============================================
औरंगाबादेत अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर, तिघांना जीवनदान
औरंगाबाद : औरंगाबादमधील वैद्यकीय क्षेत्रामध्ये अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ब्रेन डेड झालेल्या एका रुग्णाचे हृदय, लिव्हर आणि दोन किडन्या प्रत्यारोपण करण्यासाठी आज सकाळपासूनच तयारी सुरु आहे.
तरुणाच्या शरीरातील हृदय मुंबई, तर लिव्हर पुण्याला 250 किलोमीटरचा प्रवास करुन पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने हृदय, लिव्हर आणि किडनीचा प्रवास होणार आहे. पुणे आणि औरंगाबादला अॅम्ब्युलन्सद्वारे तर हृदय एअर अॅम्ब्युलन्सद्वारे औरंगाबादच्या विमानतळावरुन पाठवण्यात येणार आहे.
पाच दिवसांपूर्वी सुनील बुधवंत या व्यक्तीच्या मेंदूतुन रक्तस्त्राव होत होता. तपासणीमध्ये त्यांचा ब्रेन डेड झाला. त्यानंतर डॉक्टरांनी समुपदेशन केल्यानंतर बुधवंत कुटुंबियांनी अवयवदानाला परवानगी दिली.
15 दिवसांपूर्वी राम मगरचे ब्रेनडेड झाल्यानंतर त्याच्या आईने धाडसाचा निर्णय घेऊन तीन जणांचे प्राण वाचवले होते. त्याचीच पुनरावृत्ती सुनील बुधवंत यांच्या कुटुंबाने केली आहे.
===============================================शिर्डीत कचरागाडीतून रुग्णालयात नेलेल्या वृद्धाची ओळख पटली
शिर्डी : कचऱ्याच्या गाडीतून वृद्धाला रुग्णालयात नेल्या प्रकरणी सहा कंत्राटी कामगारांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान वृद्धाची ओळख पटली असून त्यांच्या नातेवाईकांचा शोधही लागल्याची माहिती आहे.
कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यांचं नाव ज्ञानेश्वर मंडलिक असं होतं. ते मूळ ठाण्याचे रहिवाशी असून शिर्डीत कसे आला याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे.
एक वृद्ध रुग्ण पिंपळवाडी रोडवर दोन दिवसांपासून असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांनी चक्क कचऱ्याच्या गाडीचा वापर केला होता. मात्र अखेर त्यांचा मृत्यू ओढवला.
भक्तांच्या कोट्यवधींच्या दानाने साई संस्थानाची भरभराट झाली. मोठमोठाली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स सुरु झाली. शंभरहून अँब्युलन्स आल्या. पैशाची श्रीमंती बक्कळ आली. पण एका रुग्णाला उपचारासाठी नेताना प्रशासनाला एकही रुग्णवाहिका मिळू नये याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्दयी कारभारावर सध्या सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.
===============================================वर्ध्यात धूम स्टाईल चोरी करणारे हरियाणात जेरबंद, स्कॉर्पिओसह लाखोचा मुद्देमाल जप्त
वर्धा : धूम फिल्ममधला या चोऱ्या प्रत्यक्षात शक्य आहेत, असं म्हटलं तर तुम्ही समोरच्याला वेड्यात काढाल. पण हरियाणाच्या आसिफ उर्फ जाकीर हुसेनच्या टोळीनं हा पराक्रम केला आहे. त्याची मोडस ऑपरेंडीही धूम-3 स्टाईलची होती.
नोव्हेंबर महिन्यात बीड आणि वर्ध्यातील एटीएम फोडण्यात आली. 33 लाखाची रोकड लंपास झाली. पोलिसांनी शोध सुरु केला. पण हाती काहीच लागत नव्हतं.
संध्याकाळच्या सुमारास ही टोळी शहरात यायची. जिथं सुरक्षा रक्षक नाहीत, अशी एटीएम हेरायची. पहाटे 2 ते 3 च्या सुमारास चोरी करायची आणि त्यानंतर धूम स्टाईलनंच 1300 किलोमीटरचं अंतर पार करुन एका रात्रीत पुन्हा हरियाणात जायचे.
टोळीचा म्होरक्या आरीफ अजूनही फरार आहे. पेशानं तो मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याच्या शोधासाठी वर्धा पोलिसांची एक टीम अजूनही हरियाणात आहे. आपण कुणाच्या हाताला लागणार नाही, अशा तोऱ्यात असलेल्या चोरट्यांना कानून के हात बहोत लंबे होते है, याचा प्रत्यय वर्धा पोलिसांनी दिला आहे आणि ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
===============================================मोदींचे सल्लागार ‘महान’ आहेत, शॉटगन शत्रुघ्न सिन्हांची टीका
नवी दिल्ली : भाजपचे खासदार शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीवरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याआधी केंद्र सरकारने किमान सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहिली असती, तर काही आकाश कोसळलं नसतं”, अशा शब्दात शत्रुघ्न सिन्हांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘महान’ सल्लागारांवरही तोफ डागली आहे. जर सुप्रीम कोर्टाने अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीविरोधात निर्णय दिला तर काय उत्तर देणार आहात, असा सवाल सिन्हा यांनी विचारला आहे.
भाजपचे खासदार असूनही अनेक मुद्द्यांवर भाजपविरोधी भूमिका घेण्यासही मागे-पुढे न पाहणारे म्हणून शत्रुघ्न सिन्हा ओळखले जातात. अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीवरुन त्यांनी केंद्राला चांगलंच धारेवर धरलेलं दिसतं आहे.
“जेव्हा एखादं प्रकरण सुप्रीम कोर्टात असतं, त्यावेळी अधिक सतर्क राहण्याची गरज असते. मला तर वाटतं की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहिली असती, तर काही आकाश कोसळलं नसतं. जेणेकरुन वादापासून वाचू शकलो असतो.”, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “नरेंद्र मोदी अत्यंत चांगले पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांचे महान सल्लागार जे सल्ले देतात, ते अनेकवेळा चूक ठरतात आणि राजकीय निर्णय चूक ठरू शकतात. यामुळे हे सल्ले पक्ष आणि सरकारला अडचणीत आणू शकतात.”
“देश, पक्षाबद्दल मी नेहमीच नम्रपणे विचार मांडले आहेत. मात्र मी नेहमी सत्य बोलतो. त्यामुळे माझी अनेक मतं लोकांना पटत नाहीत. मात्र, देश आणि पक्षासाठी माझ्या मनात कायम चांगला हेतू आहे.”, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले.
===============================================इटलीतील एक असं शहर, जिथे तब्बल 28 वर्षांनंतर मूल जन्माला आलं!
रोम : ओसटाना हे उत्तर इटलीमधील एक छोटंसं शहर. ओसटाना या छोट्या शहराची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. निमित्तही चर्चा होण्यासारखंच आहे. गेल्या आठवड्यात ओसटाना शहरातील तुरिन हॉस्पिटलमध्ये एक मूल जन्माला आलं.
आता मुल जन्माला येणं, यात नवीन काय? किंवा जगभर सेकंदाला अनेक मुलं जन्माला येतात, मग इथे असं नवीन काय घडलं? असे तुम्हाला प्रश्न पडू शकतात. ते स्वाभाविकही आहे. मात्र, ओसटानामधील या मुलाचा जन्म ही सर्वसाधारण घटना नाहीय. कारण इथे तब्बल 28 वर्षांनी म्हणजे 1987 सालानंतर पहिल्यांदाच मूल जन्माला आलं आहे.
पाब्लो असं या मुलाचं नाव आहे. याच्या जन्मानंतर अख्ख्या ओसटाना शहरात जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. एखाद्या सण-उत्सवासारखं या मुलाचा जन्म साजरा केला जातो आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर करकोचा पक्षाची प्रतिकृती तयार करुन लावण्यात आली आहे. ज्या
पाईडमांटच्या डोंगररांगांमध्ये ओसटाना शहर वसलं आहे. या शहराचे महापौर गियाकॉमा लॉमबारडोही पाब्लोच्या जन्मानंतर प्रचंड आनंदी आहेत. डोंगररांगांमधील या छोट्याशा शहरात या मुलाचा जन्म म्हणजे एखाद्या स्वप्नासारखं आहे, अशा भावना गियाकॉमा लॉमबारडोही यांनी व्यक्त केल्या.
गेल्या शतकभरापासून ओसटाना शहराची लोकसंख्या कमालीची घटत चालली आहे. पाब्लोच्या जन्मानंतर या शहराची संख्या 85 वर पोहोचली आहे. या लोकसंख्येतीलही अर्धीच लोकसंख्या कायमस्वरुपी ओसटानामध्ये राहते.
महापौर लॉमबारडो सांगतात, “19 व्या शतकच्या सुरुवातीला ओसटाना शहर एकूण एक हजार लोकसंख्येची वस्ती होती.”
दुसऱ्या महायुद्धानंतर ओसटानामधील जन्मदर कमी होत गेला. 1975 नतंर ओसटानातील जन्मदर कमालीचा कमी झाला. 1976 ते 1987 या वर्षांदरम्यान 17 मुलांचा जन्म झाला. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी म्हणजे आता 2016 साली पाब्लोचा जन्म झाला आहे.
लोकसंख्येशी लढण्यासाठी ओसटानाने नव-नव्या योजना आणल्या. मात्र, त्यांचा फारसा परिणाम झालेला दिसला नाही.
पाब्लो ज्यांच्या घरी जन्माला आला, तेही पाच वर्षांपूर्वी परदेशात जाण्याच्या विचारात होते. मात्र, जवळच्या डोंगरांमध्ये राहण्याची सुविधा मिळाली आणि ते तिथेच थांबले.
द नेशनल यूनियन ऑफ माऊंटेन टॉउन्स अँड कॉम्युनिटिजचे मारको बसॉने यांनी सांगितले, “पाब्लो ज्यांच्या घरात जन्माला आला, त्या घराचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याचा जन्म हे याच गोष्टीचे संकेत आहेत.”
ओसटाना हे एकमेव शहर नाही, इटलीमध्ये अशी अनेक शहरं आहेत, जिथे कमी लोकसंख्या आहे. येथील अधिकाधिक तरुणवर्ग नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होऊ लागला आहे. स्थलांतराला रोखण्यासाठी मोफत घरं देण्यासही येथील अनेक लोक तयार आहेत. मात्र, स्थलांतर थांबता थांबत नाही आणि पर्यायाने कमी लोकसंख्येचा मुद्दा भेडसावत आहे.
===============================================देवनारमध्ये धुराचं साम्राज्य, नागरिकांनी काळा चष्मा-रुमाल वापरावा
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आटोक्यात आली आहे. मात्र या आगीचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. परिसरात धुराचं साम्राज्य असल्यामुळे परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अग्निशमन दलाच्या वतीनं जेट कूल सोल्युशन या नव्या पद्धतीचा वापर करण्यात आला. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग अग्निशमन दलाद्वारे करण्यात आला. कचऱ्यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला गेला.
अग्निशमन दलाच्या वतीनं जेट कूल सोल्युशन या नव्या पद्धतीचा वापर करण्यात आला. अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग अग्निशमन दलाद्वारे करण्यात आला. कचऱ्यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला गेला.
===============================================
BSNL च्या कर्मचाऱ्यांना झटका, नफा नाही, तर पगारवाढ नाही!
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. बीएसएनएल कंपनीला यंदा नफा न झाल्यास पुढील वर्षी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली जाणार नाही, असे बीएसएनएलचे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक अनुपम श्रीवास्तव यांनी माहिती दिली.
श्रीवास्तव यांनी सांगितले, “यंदाचं वर्ष बीएसएनएलच्या इतिहासात सर्वात महत्त्वाचं असणार आहे. कारण वेतन समीक्षा समितीनुसार 2017 साली पगारवाढ दिली जाणार आहे. मात्र, कंपनीला जोपर्यंत नफा होत नाही, तोपर्यंत पगारवाढ दिली जाणार नाही.”
कर्नाटकमध्ये हाय स्पीड मोबाईल डेटा ऑफलोड सेवा सुरु केली आहे. ही सेवेमुळे नफा वाढला तरच बीएसएनएल कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. एकंदरीत काय तर, कर्नाटकमधील ऑफलोड सेवेवर कर्मचाऱ्यांची पगारवाढ अवलंबून आहे. अन्यथा पगारवाढीला कर्मचारी मुकणार आहेत.
===============================================मुंबईत वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली : सर्व्हे
मुंबई : राजधानी दिल्लीच्या पावलावर पाऊल टाकत मुंबईतही प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईतल्या वायूप्रदूषणाची पातळी 325 एअर क्वॉलिटी इन्डेक्स (एक्यूआय) तर संध्याकाळी 341 एक्यूआयवर पोहचली होती.
दिल्लीतल्या प्रदूषणानंही 341 चा आकडा पार केला होता. सफर प्रकल्पाअंतर्गत नऊ उपनगरांमध्ये लावलेल्या प्रदूषणमापकात झालेल्या नोंदीनुसार पहिल्यांदाच मुंबईची हवा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदुषित झाली आहे.
तापमानातील बदल आणि देवनार कचरा डेपोला लागलेली आग यामुळे प्रदूषणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मालाडध्ये हीच पातळी सर्वाधिक म्हणजे 432 एवढी आहे. त्यानंतर चेंबूरमध्ये 391, अंधेरीत 366, भांडूपमध्ये 349, बोरीवलीत 340, बीकेसीत 322 तर कुलाब्यात 311 एवढी आहे.
सर्वात कमी प्रदूषण वरळीत असून तिथं ही पातळी 211 एवढी आहे. वायूप्रदूषणाची पातळी 200 च्या वर गेल्यास ती हवा मानवी शरीरासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे या प्रदूषणाला आळा घालणं गरजेचं झालं आहे.
===============================================यूपीच्या मुलाची फ्रेण्ड रिक्वेस्ट अमेरिकन आईने स्वीकारली, आणि...!
मुंबई/लखनऊ : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर मनोरंजनासाठी किंवा टाईमपास म्हणून वेळ घालवत असल्याचं आपण अनेकांना पाहिलं आहे. मात्र या फेसबुकने अनेकांना अनेक वर्षांनी एकत्र आणल्याची किस्सेही आपण ऐकले आहेत. तसाच काहिसा अनुभव उत्तर प्रदेशातील तरुणाला आहे.
फेसबुकमुळे भारतीय मुलाच्या लग्नाला अमेरिकन आईने हजेरी लावली.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील कृष्णमोहन त्रिपाठी या तरुणाला फेसबुकवर नव-नवे मित्र करण्याचा छंद. कृष्णमोहन हा डॉक्टर राममनोहर लोहिया विश्वविद्यालयात एम कॉम करतो. फेसबुकवर सर्फिंग करताना त्याची ओळख अमेरिकेच्या 60 वर्षीय डिबरा एन मिलर या महिलेशी झाली.
मग फेसबुकवर हाय-बाय करता करता या दोघांमध्ये एक घट्ट नातं तयार झालं. ते नातं होतं माय-लेकराचं.
कृष्णमोहनला मुलगा मानलं
चॅटिंगदरम्यान डिबरा यांनी आपल्याला अपत्य नसल्याचं एकदा कृष्णमोहनला सांगितलं. त्यावेळी मी तुम्हाला मुलाप्रमाणे आणि तुम्ही मला आईप्रमाणेच असल्याचं कृष्णमोहनने डिबरा यांना सांगितलं. त्यावर डिबरा यांनीही कृष्णमोहनला मुलाप्रमाणेच मानलं.
डिबरा यांचे पती स्पेस इंजिनिअर होते. ते आता निवृत्त झाले आहेत. तर डिबरा स्वत: अमेरिकेत वैद्यकीय व्यवसायशी संबंधित आहे.
कृष्णमोहनच्या लग्नाला डिबरांची हजेरी
कृष्णमोहन आपल्या अमेरिकेतील आईला म्हणजेच डिबरा यांना लग्न ठरल्याचं चॅटिंगवरूनच सांगितलं. तसंच लग्नाला उपस्थित राहण्याची विनंती केली. कृष्णमोहनचं 29 जानेवारीला गोरखपूरमध्ये लग्न होतं. मात्र डिबरा यांनी कृष्णमोहनचं निमंत्रण स्वीकारुन 25 जानेवारीलाच हजेरी लावली.
आपल्या अमेरिकेच्या मानलेल्या आईने थेट लग्नाला हजेरी लावल्याने, कृष्णनोहनचे कुटुंबीय भारावून गेले.
लिलावात घेतलेली 125 वर्षी जुनी अंगठी भेट
डिबरा यांनी लग्नात धमाल मस्ती केली. पोटच्या मुलाचं लग्न असल्याचा आनंद, डिबरा यांच्या चेहऱ्यावर होता. डिबरा यांनी कृष्णमोहनचं भारतीय परंपरेचं लग्न जवळून पाहिलं. स्वत:ही भारतीय पोषाखातच लग्नाला हजेरी लावली.
यावेळी डिबरा यांनी आपल्या लेकाच्या लग्नात सुनेला एक अंगठी भेट दिली. ही अंगठी साधी-सुधी नव्हती, तर डिबरा यांनी यासाठी लिलावात बोली लावून खरेदी केली होती. ही अंगठी तब्बल 125 वर्ष जुनी आहे.
अंगठीचं हे रहस्य ऐकून कृष्णमोहनसह उपस्थितांना धक्काच बसला.
===============================================नागपूर ; युग चांडक अपहरण-हत्या : आरोपींवरील गुन्हा सिद्ध
नागपूर : दोन वर्षापूर्वी 8 वर्षीय युग चांडकच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्हा सिद्ध झाला आहे. आता याप्रकरणी नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालय 3 फेब्रुवारीला शिक्षेची सुनावणी करणार आहे.
राजेश डावरे आणि अरविंद सिंग यांच्यावर युगचं अपहरण करून हत्या केल्याचा आरोप होता. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचं न्यायालयाने आजच्या सुनावणीत म्हटलं आहे.
शाळेतून परतलेल्या युगचं अपहरण
एक सप्टेंबर 2014 रोजी युगचे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापरू नगर भागातील गुरु वंदन अपार्टमेंट समोरून अपहरण करण्यात आले होते. युगचे वडील मुकेश चांडक हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. युग शाळेतून परतला आणि आपल्या राहत्या गुरुवंदन अपार्टमेंटमधील वॉचमेनकडेच आपली बेग ठेऊन, लगेच बाहेर धावत गेला.
इमारतीच्यासमोर एका दुचाकीवर दोघे जण उभे होते. त्यांच्यासोबत युग काही क्षण बोलला आणि त्यानंतर त्यांच्याच सोबत दुचाकीवर बसून निघून गेला. उशिरापर्यंत तो न परतल्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले.
दरम्यान, ज्या पद्धतीने युग शांततेने दोन्ही अपहरणकर्त्यांसह गेला होता, त्याचा विचार करता कोणीतरी ओळखीच्याच व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे नागपूर पोलिसांची अनेक पथक नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात युगचा शोध घेत होती.
4G च्या 40 पट वेगवान इंटरनेट, 5G ड्रोन्सची गुगलची चाचणी
न्यूयॉर्क : सौरऊर्जेवर चालणाऱ्या ड्रोनची चाचणी गुगल घेत असल्याचं वृत्त ‘दि गार्डियन’ने दिलं आहे. या ड्रोनमुळे सध्याच्या 4G इंटरनेटच्या चाळीस पट जलद असा 5G स्पीड मिळवण्यासाठी ही चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे.
स्कायब्लेंडर असं या प्रकल्पाचं कोडनेम आहे. त्याच्या ट्रान्समिशनची फ्रिक्वेन्सी 28GHz आणि रेंज कमी असूनही सध्याच्या 4G च्या तुलनेत 5G प्रचंड वेगवान असण्याचा दावा केला जात आहे.
उंचावरील ड्रोनकडून मिलीमीटर व्हेव तंत्रज्ञानाचा अवलंब करणं, हे एक आव्हान असलं तरी गुगल यावर मात करण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. सध्या हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्यास वेळ आहे. स्कायब्लेंडर हा गुगलच्या हाय स्पीड इंटरनेट मिळवण्यासाठी प्रयोग करणाऱ्या प्रोजेक्ट लून या प्रकल्पाचा एक भाग आहे.
गुगलने एफसीसी म्हणजेच फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन या रेडियो, टीव्ही, वायर, उपग्रहांचं आंतरराष्ट्रीय पातळीवर नियंत्रण करणाऱ्या संस्थेकडून जुलैपर्यंत चाचणी करण्याची परवानगी घेतली आहे.
=========================================================
महिलांना शनीदर्शन का नाही ?, औरंगाबाद खंडपीठाची जिल्हाधिकार्यांना नोटीस
औरंगाबाद – 30 जानेवारी : शनी शिंगणापूर प्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अहमदनगर जिल्हाधिकार्यांना नोटीस बजावली आहे. शनी शिंगनापूर प्रकरणी चार आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला ही नोटीस प्राप्त झालीये.
डॉक्टर वसुधा पवार यांनी शनीच्या चौथर्यावर पुरुषांसह महिलांनाही प्रवेश मिळावा आणि पूजेचा समान आधिकार मिळाला पाहिजे, या संदर्भात औरंगाबाद खंडपीठत जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांसह पोलीस अधीक्षक, मुंबई धर्मादाय आयुक्त आणि राज्याचे विधि-न्याय खात्याचे मुख्य सचिवाना नोटीस बजावली आहे. शनी मंदिरात महिलांना प्रवेश का दिला जात नाही याबद्दल या नोटिसीमध्ये विचारणा करण्यात आली आहे. याबद्दल जिल्ह्याधिकार्यांना चार आठवड्यात खुलासा द्यायचा आहे.
=========================================================
पनवेलमध्ये नथुराम गोडसेला मानवंदना, बंदुकीचीही पुजा
=========================================================
कोकण; हापूस आंब्याच्या चार डझनाच्या पहिल्या पेटीला लिलावात तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा भाव
पनवेल – 30 जानेवारी : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्या बंदुकीने नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या त्या बंदुकीची पनवेलमध्ये पुजा करण्यात आली. एवढंच नाहीतर नथुराम गोडसेला मानवंदनाही देण्यात आली.पनवेल मध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने नथुराम गोडसे यांच्या फोटोस आणि त्यांनी ज्या बंदुकीने गांधी यांची हत्या केली त्या बंदुकीच्या फोटोचे देखील पूजन करण्यात आले. महाराणा प्रताप बटालियन या हिंदू संघटनेद्वारे नथुराम गोडसे यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नथुराम गोडसे देशासाठी शहीद झाले. त्यांनी आपले प्राणअर्पित केले. कारण, महात्मा गांधी यांच्यामुळे देशाची फाळणी झाली आणि त्यानंतर ज्या कत्तली घडल्या त्याला गांधी जबाबदार आहे. गांधी हे भारताचे राष्ट्रपिता नाहीच आणि आम्ही त्यांना मानत नाही असं महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांचं म्हणणंय. तसंच नथुराम गोडसेने ज्या शस्त्राने गांधींची हत्या केली. त्या शस्त्राची 2008 पासून आम्ही पूजा करतोय असंही सेंगर यांनी सांगितलं.
=========================================================
आयसिससाठी काम करणार्या 3 भारतियांची मध्य आशियातून हकालपट्टी
30 जानेवारी : मध्य आशियामधून दहशतवादी संघटना आयसिससाठी काम करणार्या तीन भारतीयांना परत पाठवण्यात आलंय. या तिघांना एनआयएने अटक केली आहे.त्यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि भारताविरोधात युद्ध छेडण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्य आशियात ते आयसिससाठी निधी जमा करणे आणि जहाल साहित्य पसरवण्याचे उद्योग करत होते असं कळतंय. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून कसून चौकशी सुरू आहे.
=========================================================हिंदू आहे असं सांगायलाही भीती वाटते - अनुपम खेर
मुंबई, दि. ३० - मी हिंदू आहे, असं सांगायला मी घाबरतो असं सांगत अनुपम खेर यांनी भारतातल्या मानसिकतेवर वेगळा प्रकाश टाकला आहे. जर मी सांगितलं की मी हिंदू आहे आणि मी कपाळाला तिलक लावलं, तर माझ्यावर लोक RSS चा असल्याचा शिक्का मारून लोक मोकळे होतील अशी व्यथा खेर यांनी सीएनएन आयबीएनच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
देशामध्ये दादरीची चर्चा होते, जी अत्यंत दुर्दैवी घटना होती. परंतु मालदाचं काय काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचं काय असा सवालही खेर यांनी विचारला आहे.
भारतीय सिनेजगत राजकारणापासून दूर होतं, परंतु २०१४ पासून परिस्थिती बदलल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेने नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ नये म्हणून काहींनी पत्रक काढलं, ज्यावर अनेकांनी सह्या केल्या आणि तेच मोदी प्रचंड मतांनी निवडून आले, त्यामुळे अनेकांची अडचण झाल्याचे खेर म्हणाले.
२०१० मध्ये पद्म पुरस्कारांचा दर्जा घसरल्याची, कुणालाही पुरस्कार दिले जातात अशी टिप्पणी केलेल्या खेर यांनी आता मात्र, पद्मभूषण मिळाल्यावर आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा सन्मान असल्याचं मत व्यक्त केलं आणि त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. परंतु खेर यांनी आपली बाजू मांडताना, २०१० मध्ये अनेक गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तिला पद्म पुरस्कार दिल्याचा निषेध म्हणून तसे ट्विट केल्याचे सांगितले. या व्यक्तिला देशाबाहेर जायची बंदी होती, त्याला पद्म पुरस्कार कसा दिला जातो, असे सांगत त्यामुळे आपण तशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे खेर म्हणाले.
=========================================================
कोकण; हापूस आंब्याच्या चार डझनाच्या पहिल्या पेटीला लिलावात तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा भाव
यंदाच्या मोसमातील पहिल्या आंब्यानं आज कोल्हापूरच्या बाजारात हजेरी लावली. विक्रीसाठी कोकणातून घाटमाथ्यावर आलेल्या हापूस आंब्याच्या चार डझनाच्या पहिल्या पेटीला लिलावात तब्बल ११ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला. याचा अर्थ डझनाचा भाव २,८७५ रुपये पडला असून प्रति आंब्याचा भाव २४० रुपये आहे.
कोकणचा राजा अपेक्षेपेक्षा कितीतरी आधी अवतरल्यानं करवीरच्या बाजारात उत्साहाचे वारे संचारले. पहिली पेटी सोलापूरचे प्रसिद्ध व्यापारी सौदागर बोचडे यांनी खरेदी केली. त्यामुळं हा एक नंबरचा पहिला आंबा कोल्हापूरकर नव्हे, तर सोलापूरकर चाखणार आहेत.
पावसचे सलीम काझी आणि देवगडचे उमेश तेली यांच्या बागेतला आंबा विक्रीसाठी एम.डी. बागवान यांच्याकडे विक्रीला आले होते. सहकार उपनिबंधक अरुण काकडे यांनी हापूसच्या आणखी दोन पेट्यांचाही लिलाव केला. दोन नंबर आंब्याची पाच डझनाची पेटी सात हजारांना तर त्या खालोखाल चार डझनाची पेटी साडे पाच हजारांना गेली. या दोन्ही पेट्यांचे ग्राहक कोल्हापुरातीलच आहेत.
=========================================================दाऊद इब्राहिम - छोटा राजनच्या वैमनस्यावर आधारीत येतोय राम गोपाल वर्माचा गव्हर्नमेंट
मुंबईच्या अंडरवर्ल्डला रंगीत पडद्यावर आणण्यासाठी मशहूर असलेला राम गोपाल वर्मा आपला पुढचा सिनेमा दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या वैमनस्यावर आधारीत बनवत आहे. स्वत: रामूनेच ट्विटरच्या माध्यमातून आज ही बातमी दिली असून चक्क गुगल डॉक्समध्ये सविस्तर माहितीच शेअर केली आहे.
गव्हर्नमेंट असं नाव असलेल्या या सिनेमामध्ये दाऊद व राजन वेगळे झाल्यानंतरच्या अंडरवर्ल्डचं चित्रण असेल. रामू सांगतो, दोघं एकत्र होते, तो पर्यंत मुंबई शांत होती, परंतु दोघे वेगळे जाल्यानंतर, काँट्रॅक्ट किलिंग वाढलं, अनेक छोट्या मोठ्या गँग्ज उदयाला आल्या आणि खंडणीचं नवं पर्व सुरू झालं. दाऊदने दहशतवादी नी आएएसआयशीही दोस्ती केली आणि अखेर सरकारनं राजनला हाताशी धरलं.
दाऊद व छोटा राजनखेरीज या चित्रपटामध्ये अनीस इब्राहीम, छोटा राजनची पत्नी सुजाता, मोलिका बेदी, अबू सालेम, मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे आणि अरूण गवळी यांच्याही व्यक्तिरेखा असणार आहेत.
याआधी सत्या, कंपनीसारखे अंडरवर्ल्डवरचे सिनेमे रामगोपाल वर्माने बनवले आहेत. परंतु हा नवा चित्रपट गव्हर्नमेंट सत्यकथेच्या जास्त जवळ असेल असा दावा रामूने केला आहे. गुन्हेगारी संघटना आणि सरकारी संस्था यांच्यातल्या संबंधावरही या चित्रपटात भाष्य असेल असं सांगताना छोटा राजनच्या अटकेतून या सगळ्या बाबी समोर आल्याचं रामूनं म्हटलं आहे.
==================================================
महाराष्ट्रात मुली नव्हे, मुलं चढतात कमी वयात बोहल्यावर- एक सर्वेक्षण
कमी वयातच मुलींचे होणारे लग्न हा देशभरात चिंतेचा विषय असला तरी महाराष्ट्रात मात्र ही परिस्थिती अगदी उलट असून याबाबतीत मुलांची संख्या मुलींपेक्षा अधिक आहे. राज्यात प्रत्येक दहावा मुलगा आणि प्रत्येक ९वी मुलगी कमी वयात बोहल्यावर चढते, अशी माहिती केंद्र सरकारच्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. तसेच आजच्या काळातही १५ ते १९ या वयोगटात माता बनणा-या मुलींचे राज्यातील प्रमाण ५ टक्के इतके आहे.
नीति आयोगाच्या आकड्यांनुसार, कमी वयातच मुलांची लग्नं होण्याचे सर्वाधिक प्रमाण औरंगाबादमध्ये आहे, तेथे ३० टक्क्यांहून अधिक मुलांचे लग्न कायदेशीर मान्यता असणा-या २१ वर्षांच्या आतच केले जाते. त्यानंतर जालना (२७.६ टक्के), बीड (२४.७ टक्के), सोलापूर (२२.५) नांदेड (२१.१ टक्के), हिंगोली (२०.७ टक्के) आणि अहमदनगर (२०.५ टक्के) यांचा नंबर लागतो. तर १८ वर्षांच्या आतच मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण हिंगोलीत (१७.६ टक्के) सर्वाधिक असून त्यानंतर नांदेड (१७.५ टक्के), परभणीमध्ये (१७.५) हे प्रमाण अधिक आहे.
दरम्यान मुलींनी कमी वयातच आई बनण्याचे सर्वाधिक प्रमाण औरंगाबादमध्ये (१० टक्के) आहे. त्याव्यतिरिक्त सांगलीत ८.७ टक्के, उस्मानाबाद ८.१ टक्के आणि बीडमध्ये ७.५ टक्के मुलींनी कमी वयातच बाळाला जन्म दिल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये मुलींच्या लग्नाचे वय २५ तर मुलांच्या लग्नाचे वय २५-२६ इतके असते. तर मायानगरी मुंबईत मुलांच्या लग्नाचे वय सुमारे २७ तर मुलींचे वय सुमारे २४ असते.

No comments:
Post a Comment