Tuesday, 12 January 2016

नमस्कार लाईव्ह १२-०१-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- इस्तंबुलमध्ये पर्यटनस्थळी झालेल्या स्फोटात १० जण ठार तर १५ जण जखमी 
२- लंडन; शिक्षिकेने ठेवले मुलीच्या वर्गमित्रासोबत शारीरिक संबंध 

             ३५ वर्षीय सारा मूर या शिक्षिकेने मुलीच्या वर्गमित्रासोबतच शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोघांमध्ये फोनवरून संभाषण होत होतं. हे मेसेज जेव्हा मुलाच्या आई-वडिलांनी पाहिले तेव्हा त्यांनी मुलाला याबाबत विचारले. मुलाच्या बेडरुममध्ये आईला कंडोम्स सापडल्यानंतर अजून दोघांमध्ये काय झालं याबाबतची मुलाला विचारणा करण्यात आली. त्यानंतर मुलाने मैत्रीनीच्या आईसोबत शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली पालकांना दिली आणि तिच्यावर गुन्हा दाखल करु नये अशी विनंती पालकांना केली. अल्पवयीन मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवणे हा गुन्हा असल्याने या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाची वेसण, बंदी कायम 

       राज्यात यंदाही बैलगाडी शर्यतीचा धुराळा उडणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडी शर्यतीवरची बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या बैलगाडी शर्यतींचं भवितव्यही पुन्हा एकदा अंधारात गेलं आहे. बैलगाडी शर्यतीप्रमाणे तामिळनाडूतील जलकट्टू प्रथेवरही सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकास जावडेकर यांनी बैलगाडी शर्यतींवरची बंदी उठवली होती. पण केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा स्थगिती दिली गेले काही दिवस राज्यात शर्यतींचा धुराळा उडावा यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजप नेत्यांसाठी मात्र हा निर्णय धक्कादायक मानला जातो आहे.

४- परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज १७-१८ जानेवारीला पॅलेस्टाइन आणि इजराइल दौऱ्यावर जाणार 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
५- घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाची लॉटरी, जाहिरात प्रसिद्ध 

      मुंबई आणि मुंबईलगतच्या परिसरात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने सुखद बातमी दिली आहे. म्हाडाच्या कोकण विभागीय मंडळाने 4 हजार 275 घरांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ठाणे, मीरा रोड, विरार, सिंधुदुर्ग या शहरांमध्ये घर घेऊ पाहणाऱ्यांचे स्वप्न साकार होणार आहे. 13 जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणीही सुरु होणार आहे. सर्व घरांसाठी अर्जांचं शुल्क 300 रुपये असणार आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी याबाबत माहिती दिली.
कुठे किती घरं?
विरार – 3,755 घरं
बाळकुम (ठाणे) – 19 घरं
कावेसर (ठाणे) – 164 घरं
मीरा रोड – 310 घरं
वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) – 27 घरं

६- राज्य सरकारकडून UPSC च्या विद्यार्थ्यांना खुशखबर 

        राज्य सरकारने यूपीएससीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना खुशखबर दिली आहे.  जर एखादा विद्यार्थी आयएएस किंवा आयपीएसच्या मुख्य परीक्षेत नापास झाला, तरीही त्याचा पुढील वर्षीच्या मुख्य परीक्षेपर्यंतचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यानुसार संबंधित विद्यार्थ्याचा शैक्षणिक तसंच निवासी खर्च राज्य सरकार करेल. विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी फडणवीस सरकारने हे पाऊल उचललं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील भावी IAS, IPS अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

७- नाशिक सुधारगृहातून पळालेल्या मुलांनी टाकला दरोडा 

         नाशिकमधल्या सुधारगृहातून 12 मुलांनी पळ काढण्याची घटना सोमवारी उजेडात आली. सुधारगृहातून पळून गेलेल्या मुलांनी चक्क दरोडा टाकल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. चोपडा लॉनपासून या मुलांनी गोदावरी नदीचा पूल पार केल्यानंतर त्यांनी एका दुकानात हा दरोडाही टाकला. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही हाती आलंय. या मुलांनी एका दुकानाचं शटरवर करून हा दरोडा टाकला. पण पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन आल्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला. या दरोड्यात त्यांच्या हाती अवघे 1200 रुपये लागले. दरम्यान, पळून गेलेल्या 12 मुलांपैकी दोन मुलांना निगडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या मुलांच्या शोधासाठी चार टीम तैनात करण्यात आल्या होत्या. आज आणखी चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
८- नालासोपाऱ्यातील आणखी एक कुटुंब बेपत्ता 

            नालासोपारातील आणखी एक कुटुंब 5 जानेवारीपासून बेपत्ता आहे. नालासोपाऱ्यामधीलच दहा महिने उलटून गेल्यानंतरही इगवे कुंटुंबाचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. त्यातच आता पाच जणांचं चौबे कुटुंब मागील सहा दिवसांपासून गायब आहे. अमित चौबे, पत्नी रीता चौबे, 10 वर्षांची मुलगी खुशी, 7 वर्षांचा मुलगा मनोज आणि 5 वर्षांची मुलगी नैनशी हे पाच जणांचं कुंटुंब बेपत्ता आहे. अमित चौबे यांच्या भाईंदरला राहणाऱ्या भावाने तुळींज पोलिस ठाण्यात कुटुंब बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. अमित खाजगी कंपनीत काम करतो आणि वडापाव विक्रीचा व्यवसाय ही करतो. संपूर्ण कुंटुंबच बेपत्ता होत असल्याने, नालासोपाऱ्यात आता हा चिंतेचा विषय बनला आहे.

९- उमरेड कारंडला अभयारण्यातल्या जिप्सी चालक आणि गाईडचं निलंबन 

         उमरेड कारंडला अभयारण्यातल्या एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. पर्यंटकांच्या जिप्सी गाडीजवळ एक वाघ आला होता, आणि खूप वेळ तो पर्यटकांजवळ उभा होता. यासाठी वनविभागानं आता गाईड आणि जिप्सी चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. व्याघ्रदर्शनाचे नियम मोडणे आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या एका परिवारासोबत अभयारण्याची सफर करताना दोन वाघ जिप्सीच्या अगदी जवळ आले होते. त्याचं चित्रिकरण या कुटुंबानं आपल्या मोबाईलमध्ये केलं. पण ही घटना हे नियमांचं उल्लंघन असल्याचा दावा करत वनविभागानं या दोघांनाही निलंबित केलं आहे. निर्धारित काळापेक्षा जास्त म्हणजे 20 ते 25 मिनीटे गाडी थांबवणं, दोन वाहनांमधील अंतर किमान 50 मीटर असायला हवं, ते नव्हतं, तसंच वाघ जेव्हा जिप्सीजवळ आला, तेव्हा ड्रायव्हर जागेवर नव्हता, या आरोपांखाली त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

१०- पिंपरी-चिंचवड - हिंजवडी परीसरात चार अज्ञातांनी गोविंद देशमुख या गुंडावर गोळीबार केल्याचं वृत 

११- अहमदनगरमध्ये हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन, शनिशिंगणापूर येथे २६ जानेवारी रोजी होणारे भूमाता ब्रिगेडचे आंदोलन प्रशासनाने रोखण्याची केली मागणी 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१२- बच्चन कुटुंबातील सूनेने हे काय केलं....तेही सर्वांच्या समोर 

           अभिनेत्री ऐश्वर्या राय  बच्चनने असं काही केलं की सर्वजण चकीत झालेत. लोकांचे सोडा खुद्द अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनीही असा काही विचार स्वप्नातही केला नसेल. ऐश्वर्याने स्टेजवर असं केलं की सर्वांना धक्का बसला. स्टारडस्ट पुरस्काराच्यावेळी ऐश्वर्या राय बच्चनला सिनेमा 'जज्बा' तील कमबॅकबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार अभिनेत्री रेखा हिच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावर सर्व काही ठिक होतं. मात्र, ऐश्वर्याने सर्वांना एक धक्का दिला. ज्यावेळी रेखाला तिने आई (मॉं) म्हणून हाक मारली. ऐश्वर्याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हणाली, आईच्या हाताने पुरस्कार मिळणे ही मोठी गोष्ट आहे. त्यानंतर रेखा म्हणाली, मला आशा आहे की, यापुढेही मी पुरस्कार देण्यासाठी पुढे येईन. ज्यावेळी रेखा आणि ऐश्वर्या यांचे बोलणे सुरु होते त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन ऑडिशनमध्ये बसलेले होते. रेखा सोबत बच्चन कुटुंबीयांचे कसे नाते आहे, हे आपण सर्वजण जाणता. ऐश्वर्य़ाने रेखाला आई म्हटले. मात्र, ते जया बच्चन यांना आवडले नसेल. मात्र, ती त्यांची जुनी जखम आहे.

१३- 'पर्थ'वर रोहितची खेळी 'व्यर्थ', ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून विजय 

        पर्थ वन डेत ऑस्ट्रेलियानं भारतावर पाच विकेट्स राखून दणदणीत मात करुन पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतानं दिलेल्या 310 धावांच्या लक्ष्याचा ऑस्ट्रेलियानं यशस्वी पाठलाग केला. जॉर्ज बेली आणि स्टीव्हन स्मिथच्या शतकी खेळींमुळं कांगारूंना विजय साजरा करता आला. कॅप्टन्स इनिंग खेळणारा स्मिथ 149 धावांवर बाद झाला. पण तोवर त्याने आपल्या संघाचा विजय निश्चित केला होता. बेलीने देखील दमदार शतक झळकावत विजयात मोलाचा वाटा उचलला. फिंच आणि वॉर्नर झटपट बाद झाल्यानंतर स्मिथ आणि बेलीनं संयमी फलंदाजी करीत डाव सावरला. जॉर्ज बेली आणि स्टीव्हन स्मिथच्या शतकी खेळींमुळं कांगारूंना विजय साजरा करता आला.

१४- माध्यमसम्राट रुपर्ट मरडॉक 84 व्या वर्षी चौथ्यांदा बोहल्यावर चढणार 

           ‘माध्यम जगताचा सम्राट’ अशी ओळख असणाऱ्या 84 वर्षीय रुपर्ट मरडॉक हे चौथ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहेत. अमेरिकन मॉडेल जेरी हॉल हिच्यासोबत रुपर्ट मरडॉक लवकरच लग्न करणार आहेत. स्वत:च्याच मालकीच्या ‘द टाईम्स’ या वृत्तपत्रात जाहिरात देऊन मरडॉक यांनी लग्नाबाबत घोषणा केली. 84 वर्षीय रुपर्ट मरडॉक यांचं याआधी तीन लग्न झाले आहेत. त्यांना सहा मुलं आहेत, तर 59 वर्षीय जेरी हॉल हिला 4 मुलं आहेत. जेरी हॉल जवळपास 23 वर्षे गायक मिक जॅगरसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. जॅगरपासूनच तिला 4 मुलं आहेत. 1999 मध्ये दोघांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झालं आणि ते वेगळे झाले. सध्या अमेरिकेत राहणारे ऑस्ट्रेलियन वंशाचे रुपर्ट मरडॉक हे त्यांची तिसरी पत्नी वेन्डी डेंग हिच्यापासून 2013 मध्येच वेगळे झाले होते. रुपर्ट मरडॉक आणि जेरी हॉल हे दोघेही पहिल्यांदा लंडमधील ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड रग्बी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यादरम्यान एकत्र दिसले होते. गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातही जेरी आणि मरडॉक एकत्र दिसले होते.

१५- सलमानच्या फूटपाथ अपघात प्रकरणात 16 चुका झाल्या, पोलिसांची कबुली 

             फूटपाथ अपघात प्रकरणी आपल्याकडून 16 चुका झाल्याचं मुंबई पोलिसांनी कबूल केलंय. कोणत्याही गुन्ह्याच्या केसमध्ये प्रत्येक प्रोसिजर पाळली जाते, मात्र फूटपाथ प्रकरणात हे काही अंशी झालं नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यात सलमानच्या केसमध्ये कमाल खान हा मुख्य साक्षीदार असूनही त्याच्या राहत्या पत्यावर पोलिसंानी त्याला समन्स पाठवले नाहीत. तर आरोपींच्या रक्ताच्या नमुन्यांची हेळसांड झाल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान पोलिसांनी ही कबुली दिली आहे.फूटपाथ अपघात प्रकरणात प्रॉसिक्यूशन पक्ष कोणताच आरोप सिद्ध करू शकला नसल्याने सलमानला निर्दोष सोडलं जात असल्याचं हायकोर्टाने म्हटलं होतं. तसंच, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवरून मुंबई हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं होतं. दरम्यान, या चुकातून धडा घेत मुंबईतील अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी एक नवी नियमावलीही जारी केली आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१६- डॉ. विभूते यांना उत्कृष्ट वैद्यकीय अधिकारी या पुरस्काराने सन्मानित
http://goo.gl/ulcmYW
~~~~~~~~~~~~~~~
१७- मुक्रमाबाद येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न
http://goo.gl/VCcRQd
~~~~~~~~~~~~~~~
१८- मुक्रमाबाद ग्रामपंचायत सदस्याकडून पत्रकार कार्यालयासाठी जागेची मागणी
http://goo.gl/pjtavp
~~~~~~~~~~~~~~~
१९- देशभर शिवप्रेमींच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन
http://goo.gl/uIISUP
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
अडचणीत असताना पळून जाणे म्हणजे अजून अडचणीत जाणे
[सौरभ शुक्ला, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: