Wednesday, 6 January 2016

फ्लावर एन फ्लावर्स विषयी मी अभिमानाने बोलू शकतो - शाम जाजू, भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष








 भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा दिल्ली राज्याचे प्रभारी श्री. शाम जाजू ह्यांच्या हस्ते फ्लावर एन फ्लावर्स या कंपनीच्या वेबसाईट अनावरण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि फ्लावर एन फ्लावर्स या कंपनीची सेवा, सचोटी व तत्परता हि वाखाणण्याजोगी आहे याचा लाभ मी दिल्ली येथेही घेत असतो व मी त्यावर संतुष्ट आहे.  
      या कंपनीचे श्रीकांत बाहेती यांना मी पंचवीस वर्षापासून ओळखतो. कुठल्याही कामात झोकून देवून दिवसरात्र मेहनत करण्याची व सतत नाविण्यतेच्या शोधात असण्याची त्यांची सवयच आहे. या कंपनीचे पुढे भरभराट व्हावी असे सुयश त्यांनी चिंतले. या प्रसंगी श्री विनोद सेठ झंवर, संतोष सेठ झंवर, डॉ. धनाजीराव देशमुख, शीतल खांडिल, ब्रिजेश धूत, गौरव भारतीया, मनोज भारतीया, संतोष मानधने, जगदीश धूत, आदी हजारो मान्यवर होते या कार्यक्रमाचे संचालन श्री शिवप्रसाद राठी यांनी केले. 

No comments: