पती पत्नीच्या वादातून निर्घुण खून"
मुखेड तालुक्यातील केरुर येथील घटना
मुखेड :-शेख बबलु मुल्ला
तालुक्यातील मौजे केरुर शिवारात तुरीची रास करुन तुर घरी घेवुन या असे म्हणणा-या पत्नीस पतीने चाकुने भोसकुन खुन केल्याची घटना दि.11 जानेवारी सकाळी 9:10 रोजी घडली.
पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मौजे केरुर येथील रहिवाशी आरोपी पती शेख पाशामियाँ गफुरसाब यास त्याची पत्नीने शेतात तुरीची रास करुन तुरी घरी घेवुन या असे म्हणल्याने तुरी विकु न दिल्यामूळे आरोपीने चिडुन आपल्या पत्नीचा सुरीने पोटात भोसकुन ठार मारल्याची घटना आज घटली. याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात पो.हे.काँ. व्यंकट गीतेच्या फिर्यादीवरुन गु.र.न. 5/2016 भादवी कलम 302 अन्वये आरोपी पती शेख पाशामियाँच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी देगलुर यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणाचा पुढिल तपास वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन इंद्राळे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment