देशातील व्यापारी हे चोर नसून अर्थव्यवस्थेला बळकटी आणणारे महत्वाचा घटक आहे, पण आजपर्यंत या
कडे चोराच्या नजरेने पहिल्याने अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झालेले असून कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण
झालेले आहे. ते सोडवणूक करण्यासाठी GST विधेयक राज्यसभेत पारित होणे फार गरजेचे आहे. यामुळे अनावश्यक इणीसपेक्टरराज संपुष्ठात येईल. यासाठी काँग्रेस जाणून बुजून अडथळे आणत आहे. भारतीय जनता पक्ष हा शब्दाला जगणारा असून LBT रद्द करणे हे या सर्वांचे एक उदाहरण म्हणून पाहता येईल. केंद्र सरकार व्यापाऱ्यांना महत्व देत असल्यामुळे परदेश दौऱ्यावर नरेंद्र मोदीसोबत जात आहेत. लवकरच देशामध्ये सर्व व्यवहार बँकामार्फत करावेत व त्यावरआधारित कर रचना असावी यावर अभ्यास चालू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या विविध समस्या मा. जाजुजी यांच्या समोर मांडल्या. हा कार्यक्रम कुसुम सभाग्रहात संपन्न झाला.

No comments:
Post a Comment