Tuesday, 12 January 2016

...हि तर मनपाची बळ 'जबरी-कर' वसुली, आयुक्ताच्या हिटलरशाहीने सामान्यांची होणार मुस्कटदाबी...

...हि तर मनपाची बळ 'जबरी-कर' वसुली,
आयुक्ताच्या हिटलरशाहीने सामान्यांची होणार मुस्कटदाबी...

विकासाच्या गोंडस नावाखाली सामान्यांची घरपट्टी व पाणीपट्टीचे कर दहा-बारा पटीने वाढवुन विकास करणार-करणार म्हणुन सामान्य नागरीकांना गंडविणा-या मनपाने जनतेच्या पैश्यांचा सातत्याने दुरुपयोग करत उधळपट्टी आणी प्रचंड भ्रष्टाचार केल्याची 'पोलखोल' होत असल्यामुळे मनपाच्या सत्ताधारी आणी प्रशासनाला 'भकास' शहरातील गल्ली बोळातल्या जागरुक होत असलेल्या मालमत्ता धारकांकडुन कर वसुली पुर्वी सारखी सहजा-सहजी होणे शक्य होणार नाही ही बाब लक्षात आली असावी म्हणुनच मनपाने नागरीकांची मुस्कटदाबी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिड लाखाचे मोबाईल व कार्यालयातील संडासवर तिन लाखाची दुरुस्ती, बीएसयुपीच्या झोपडीत एक दिवसाला एक लाख रुपये खर्च करुन मनपाची तिजोरी रिकामी करणा-या आयुक्तांना निकडीची गरज असलेल्या जन्म-मृत्यु प्रमाणपत्रासाठी सर्व सामान्य नागरीकांना या पध्दतीने त्रास देऊन मनपाची तिजोरी भरण्याचा काय नैतीक अधीकार आहे असा प्रश्न समोर येत आहे...

एकीकडे केंद्र व राज्य शासन जन्म-मृत्यु नोंदणी करुन प्रमाणपत्र घ्या म्हणुन कोट्यावधी रुपये जाहीरातीवर खर्च करत आहे दुसरीकडे मनपा आयुक्त 'तुगलकी फरमान' काढुन जन्म-मृत्यु प्रमाण पत्र मिळवण्यासाठी संपुर्ण कर भरल्याची पावती दाखवल्या शिवाय प्रमाणपत्र देऊ नये असा फतवा काढत आहेत.

ऐन नर्सरी व शाळेत प्रवेशाची धावपड सुरु होत असताना पालकांना सहज व सोप्या पध्दतीने जन्मप्रमाणपत्र देण्याचे सोडुण त्यांची अडवणुक करण्याची पुर्ण तयारी आयुक्तांनी केलेली दिसत आहे.

'आप'च्या वतीने आयुक्त आणी एकुणच मनपाच्या सर्व घोटाळ्यांची 'पोलखोल' करुन जनतेच्या पैश्यांचा होणारा गैरवापर उघड करण्याची मोहीम अशीच सुरु राहील तरी जनतेने आपल्या गल्लीतील विकास कामे सुरु झाल्या शिवाय कोणत्याही दबावाला बळी न पडता 'कर' भरु नये संगठीत होऊण या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करुन मनपा प्रशासनाला किमाण ड्रेनज, नाल्या, रस्ते व पाण्याची सोय करावयास भाग पाडावे अन्यथा कर न देता लढले पाहीजे... आम्ही जनतेवर होणारा कोणताही अतिरेक सहन करणार नाही इतकच प्रशासनाला ठनकावुन सांगायचे आहे.
...हाक तुमची, साथ 'आप'ची.
-फारुक अहमद
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा 

No comments: