जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून लावणी या कलेला राजाश्रय मिळावा यासाठी माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आज मंगळवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या महोत्सवाला सुरुवात होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगावात आयोजित लावणी महोत्सवात लावण्यखणी सुरेखा पुणेकर यांची हजेरी लागणार आहे. आज होणा-या लावणी महोत्सवात सुरेखा पुणेकरसह रुपा परभणीकर मोडणीम, श्यामल सुनिता लखनगावकर मोडणीमकर, वैशाली वाखडकर, गणेश देशमुख पुणे यांचा तुमच्यासाठी काय पण... तसेच विद्या काळे साई कला केंद्र भोकर फाटा व अनुराधा तुपटाळेकर वारंगाफाटा, अशा सात पाटर्या लावणी महोत्सवात सहभागी होऊन सादरीकरण करणार आहे.
या लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी माळेगाव यात्रेत भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. प्रेक्षकांना लावणी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी भव्य स्क्रीन लावण्यात येणार आहे. लावणी ही पारंपारीक कला जोपासण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषदेने अकलूजच्या धर्तीवर लावणी महोत्सव भरवित आहे.

No comments:
Post a Comment