Wednesday, 13 January 2016

नमस्कार लाईव्ह १३-०१-२०१६ सकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय]
१- भारत-पाक चर्चा काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता 

                      भारत आणि पाकिस्तान दरम्यान 15 जानेवारी रोजी होणारी परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा काही दिवसांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. पाकिस्तानची चर्चा करायची की नाही याबाबत मोदी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे पठाणकोट हल्ल्याचा परिणाम थेट भारत-पाकिस्तान चर्चेवर होण्याची चिन्हं आहेत. पाकिस्तानने एकीकडे पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाचे आदेश दिले तर दुसरीकडे भारतीय तपाल यंत्रणांनी दिलेले पुरावे नाकारले आहे. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात भारताने दिलेले फोन नंबर आणि जैश-ए-मोहम्मदच्या भूमिकेचा पाकिस्तानने इन्कार केला आहे. आता फिंगर प्रिंट्स, आवाजाचे नमुने, दहशतवाद्यांच्या फोटोंची मागणी पाकिस्तान भारताकडे करत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानला दोन दिवसांची मुदत दिली आहे. पाकिस्तानने दोन दिवसांत कारवाई न केल्यास 15 तारखेला होणारी चर्चा रद्द होऊ शकते.

२- अफगाणमधील भारतीय दुतावासावरील हल्ल्यामागे पाकिस्तान 

                      अफगाणिस्तानच्या मझार ए शरीफ शहरातील भारतीय दूतावासावर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानी सैन्याचा हात असल्याचा दावा बल्ख प्रांताचे पोलिस प्रमुख सय्यद कमाल सदात यांनी केला आहे.हल्लेखोर पाकिस्तानातून आलेले प्रशिक्षित सैनिक होते. ते दरी किंवा पश्तो या अफगाण भाषांमध्ये नाही तर उर्दूत बोलत होते, 99 टक्के ते पाकिस्तानी होते, असा दावा सदात यांनी स्थानिक मीडियाशी बोलताना केला आहे.तीन जानेवारीला रात्री भारतीय दूतावासावर हल्ला झाला होता. अफगाण पोलीस आणि सुरक्षादलानं खात्मा करेपर्यंत हल्लेखोर दूतावासासमोरील इमारतीत पुढचे 25 तास तळ ठोकून होते.

३- पाकिस्तान अतिरेक्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान - ओबामा 

                     पाकिस्तान, अफगाणिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये पुढची काही दशके अस्थिरता कायम राहील. अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश नव्या दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रय स्थाने ठरु शकतात  असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बुधवारी म्हणाले. राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेला उद्देशून केलेल्या शेवटच्या भाषणात त्यांनी दहशतवादापासून अमेरिकेला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधले. आज अमेरिकेला इसिस आणि अलकायदा या दोन अतिरेकी संघटनांपासून थेट धोका आहे. आजच्या जगात दहशतवाद्यांसाठी मानवी जीवनाचे अजिबात मूल्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आपले परराष्ट्र धोरण इसिस आणि अलकायदा यांना रोखण्याच्या दिशेने असले पाहिजे. इसिस संघटना नसती तरी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मिडल इस्ट आणि अन्य काही देशांमध्ये अस्थिरता कायम राहिली असती.

४- पाकिस्तानच्या क्वेटामध्ये पोलियो सेंटरजवळ बॉम्बस्फोट; मृतांचा आकडा  १४  

५- फॉर्च्यूनच्या मुखपृष्ठावर अॅमेझॉनच्या सीईओच्या विष्णूरुपातील छायाचित्रावरुन वाद 

                  प्रसिध्द फॉर्च्यून नियतकालिकाने अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांचे विष्णूरूपातील चित्र मुखपृष्ठावर प्रसिध्द करुन नवा वाद निर्माण केला आहे. फॉर्च्यूनच्या या कृत्याने अनेकांच्या भावना दुखावल्या असून, अमेरिकेतील भारतीयांनी याबद्दल संताप व्यक्त केलाआहे. फॉर्च्यूनने अॅमेझॉनच्या भारतातील विस्तारासंबंधी वृत्त प्रसिध्द केले होते. त्यासाठी त्यांनी जानेवारीच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीमध्ये बेझोस यांचा विष्णूरुपातील फोटो प्रसिध्द केला. फॉर्च्यूनच्या या चित्रामध्ये बेझोस यांच्या एका हातात कमळ आणि दुस-या हाताच्या तळव्यावर अॅमेझॉनचा लोगो दाखवला आहे. फॉर्च्यूनच्या जानेवारीच्या आवृत्तीतील हा फोटो आहे. व्यावसायिक अनिल दाश यांनी या वादग्रस्त मुखपृष्ठाकडे लक्ष वेधले. भारतात आणि अमेरिकेत रहाणारे भारतीयही भगवान विष्णूंची पूजा करतात. सोशल मीडियावरुनही अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेत भारतीय देवतांचा अपमान होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अमेरिकेत भारतीय देवतांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला आहे. 

६- अफगाणिस्तानच्या जलालाबाद येथे झालेल्या स्फोटात तीन स्थानिक पोलिसांचा मृत्यू. 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- ड्रोन, मोबाईलमॅपिंग, नव्या पीकविमा धोरणाकडे देशाचं लक्ष

                  केंद्रीय कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत शेतीसंदर्भातल्या एका अत्यंत महत्वाच्या निर्णयाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. नव्या पीकविमा धोरणावर आज कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या नव्या धोरणानुसार पीकविम्याचा प्रीमियम लक्षणीयरित्या कमी करण्याचा, तसंच नुकसानीच्या पाहणीसाठी ड्रोन, मोबाईलमॅपिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मानस आहे. दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक संकटांत शेतकऱ्यांना सर्वाधिक दिलासा खरंतर या पीकविम्याचाच असतो. मात्र धोरणातल्या, सरकारी कारभारातल्या अनेक त्रुटींमुळे पीकविम्याचे पैसे अनेकदा शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाहीत. 

८- डोंबिवलीत सेनेला अन गावी भाजपाला मत : दानवे 

                    ‘शहरात राहणारे मतदान शिवसेनेला मतदान करतात आणि परत गावाला जाऊन भाजपलाही मतदान करतात.’ असं धक्कादायक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. दानवेंनी भाजप सेनेच्या यशाचं गमक सांगितल्याची चर्चा रंगली आहे. डोंबिवलीत मराठवाडा विदर्भ सेवा समितीतच्या वतीनं आयोजित जिजाऊ जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांनी हे वक्तव्य केल्यानं एकच खळबळ माजली आहे.  या वक्तव्यानंतर दानवेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘मला तसं म्हणायचं नव्हतं, पवारांचं वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होतं. माझं वक्तव्य निवड़णूक नसतानाच आहे.’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंनी म्हटलं आहे.

९- राहुल गांधींच्या दौऱ्याआधी काँग्रेसमधली गटबाजी चव्हाट्यावर, बैठकीत निरुपम आणि गुरुदास कामत समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी 

१०- ‘ते’ महात्मा फुलेंचे वारसदारच नाहीत 

                     महात्मा फुले यांचे वारसदार म्हणून संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पथसंचलन करून संघ ही वैश्विक संघटना आहे असा सांगणार्‍यांचा आणि संघाचा ढोंगीपणा आता उघड झाला आहे. महात्मा फुले यांचे वारस असल्याचं सांगणारे नितीन फुले आणि दत्तात्रय फुले हे प्रत्यक्षात महात्मा फुले यांचे भाऊ राजाराम फुले यांचे वारस असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आधी आंबेडकरांना कब्जात घेणारा संघ महात्मा फुलेंनाही बुद्धिभेद करून ताब्यात घेत असल्याची टीका होत आहे. पुण्यातल्या शिवशक्ती संगमात महात्मा फुले यांचे खापर पणतू दत्तात्रय फुले आणि नितीन फुले यांनी सहभाग घेतला आणि या दोघांनी पथसंचलनही केलं होतं. संघ बहुजनवादी होतोय हे दाखवण्यासाठी संघानं जाणीवपूर्वक ही बाब सगळ्यांसमोर आणली. संघ यातून महात्मा फुलेंच्या विचारांवर गदा आणण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप सत्यशोधक कार्यकर्ते करताहेत. तर दुसरीकडे दत्तात्रय फुले यांना संघाच्या समरसतेचे विचार पटताना दिसत आहेत. 

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर 

                     राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भाजप सरकारने भुजबळांविरोधात चौकशी सुरु केली आहे. पण सा.बांधकाम खात्याने कोणताही घोटाळा न झाल्याचा अहवाल मध्यंतरी दिला होता. भाजप सरकार आकसापोटी आपल्यावर कारवाई करत असल्याचा आरोप भुजबळांनी केला होता. त्यातच शिवसेनेनेही या घोटाळ्यात छगन भुजबळांना आश्चर्यकारकरित्या क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा स्वगृही परतणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्रानं नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे.  या विषयावर कोणत्याही राजकीय दृष्टीकोनातून पाहू नका असं भुजबळांनी म्हणलं असलं तरीही त्यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे राज्यभरात शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलेलं आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू स्पष्ट करणार आहेत.

१२- नगरपालिकांचे निकाल भाजपची 'काशी' करणारे - उद्धव ठाकरे 

                  केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत असूनही भाजपवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. नुकत्याच लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर राजकीय वार करण्याची संधी साधली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत भारतीय जनता पक्षाचा अतिदारुण पराभव व्हावा ही सगळ्यांसाठीच चिंतेची बाब आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांत हा धक्का बसला आहे. वाराणसी म्हणजे काशी. काशीतील राजकीय निकालाने उत्तर प्रदेशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते दिसते, पण महाराष्ट्रातील ज्या १९ नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याचे सर्व निकालही भाजपची ‘काशी’ करणारेच आहेत. बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश व आता महाराष्ट्रात अशी ‘काशी’ व ‘गोची’ का होत आहे, यावर वेळीच चिंता व मंथन केले नाही तर काशीची गंगा जास्त गढूळ झाल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे.

१३- बारबाहेर अल्को बूथ, दारुमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पाऊल 

                  दारुच्या नशेत होणारे अपघात रोखण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी बारच्या दारावरच अल्को बूथ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतल्या अनेक बारबाहेर हे अल्कोबूथ बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अल्को बूथचं अनावरण करण्यात आलं. बारमधून बाहेर पडल्यानंतर स्टेअरिंगवर बसण्याआधी अल्को मीटरवर तपासणी करण्यात येईल. त्याच्या रिझल्टनुसार संबंधित व्यक्ती गाडी चालवण्यास समर्थ आहे की नाही, हे ठरवण्यात येईल. गाडी चालवण्यास ती व्यक्ती असमर्थ आहे, असं अल्कोबूथने निदर्शित केल्यास कॅब बोलवण्याची सुविधा एका क्लिकसरशी अल्को बूथवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

१४- मुंबईतील 16 ठिकाणं लवकरच 'नो सेल्फी झोन' 

                  सेल्फी घेताना पाय घसरुन समुद्रात बुडल्यानंतर, शहरातील 16 ठिकाणं ‘नो सेल्फी झोन’ जाहीर करण्याचा विचार मुंबई पोलिस करत आहेत. या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असेल. शहरातील अशी धोकादायक ठिकाणं शोधण्याचं काम सुरु असून तिथे सेल्फी घेण्याला परवानगी नसेल, असं माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. मुंबईत बॅण्डस्टॅण्डजवळ सेल्फी काढणाऱ्या तीन मुली पाय घसल्याने समुद्रात बुडाल्या. रमेश वाळुंज यांनी त्यापैकी दोघींना वाचवलं. मात्र, तिसऱ्या मुलीला वाचवताना तिच्यासह त्यांचाही बुडून मृत्यू झाला. अखेर काल माहीमच्या खाडीत रमेश वाळुंज यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी आता धोकादायक सेल्फी घेणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ठिकाणं सुंदर असली तरी धोकादायक आहेत. त्यामुळे त्यांना ‘नो सेल्फी झोन’ जाहीर करण्यात येणार आहे.

१५- रेसकोर्सची जागा मुंबईकरांसाठी खुली होणार : आदित्य ठाकरे 

                      ग्रीन पार्कसाठी महालक्ष्मी रेसकोर्सची जागा लवकरच खुली करण्यात येणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे. जुहू एअरड्रोमची सुरक्षा आणि महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेसंदर्भात आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.जुहू एअरड्रोमला अपुरी सुरक्षा असून या एअरड्रोमची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडे अधिक सुरक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही आदित्य यांनी सांगितलं आहे.2013 मध्ये महालक्ष्मी रेसकोर्सची लीझ संपली असून 226 एकर जागेवर मुंबईकरांसाठी ग्रीन पार्क म्हणून विकसित करता येईल. मुंबईकरांसाठी ही जागा खुली करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यांना देखील हा प्रस्ताव आवडल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

१६- परमार प्रकरणी राष्ट्रवादीत धुसफूस, नगरसेवकांचं पवारांना पत्र 

                        ठाण्यातल्या सूरज परमार प्रकरणी राष्ट्रवादीतली धुसफूस चव्हाट्यावर आलीये. ठाण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गुप्त बैठक झाली. त्यामध्ये पक्षश्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. या नाराज नगरसेवकांनी अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केलीये.सुरज परमार हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि हनमंत जगदाळे अजूनही तुरुंगात आहेत. त्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्याची नगरसेवकांची भावना आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी वाढली आहे. राष्ट्रवादी नगरसेवकांनी शरद पवारांना पत्र लिहिले आहे. वरिष्ठ नेते लक्ष देत नसल्याची तक्रार त्यांनी या पत्रातून केली आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या कार्यक्रमाला नाराज 24 नगरसेवकांनी दांडी मारलीये. नजीब मुल्ला, हनमंत जगदाळे जेलमध्येच असल्याने सत्ताधारांच्या राजकारणामुळे दोघांचा बळी गेल्याची भावना आहे. मंगळवारी ठाण्यातील राष्ट्रवादी नगरसेवकांची झालेल्या गुप्त बैठकीमध्ये पक्ष श्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सुरज परमार आत्महत्या प्रकरणी नगरसेवक नजीब मुल्ला आणि हनमंत जगदाळे यांना सापत्नपणाची वागणूक दिली जात असल्यामूळे नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी कोणतीही पावलं उचलली नसल्याचे पत्रच नाराज नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना लिहिले. शरद पवारांच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठाण्यामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्याला उपस्थित होते. तरीही एकूण 34 नगरसेवकांपैकी 23 जण गैरहजर राहिले. त्यामुळे हा संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१७- मुंबईत दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांना बसणार चाप 
                      मुंबईत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन पोलिसांनी आता एक नविनच उपाय शोधून काढालाय. एका खासगी संस्थेच्या मदतीनं प्रत्येक बारच्या बाहेर अल्को बुथ लावून ग्राहकानं  किती दारू सेवन केलीय याचा शोध लागणार आहे. तुम्ही किती दारू प्यायलात हे तपासण्यासाठी अल्को बुथमध्ये असणाऱ्या यंत्रणाला फक्त १० सेकंद लागतात.  त्यामुळे तुम्ही गाडी चालवण्यायोग्य स्थितीत आहात का याचही माहिती याच बुथमध्ये लगेच दाखवली जाते. रक्तात ३० मिलीग्रॅम ते १०० मिलीग्रॅमपर्यंत अल्कोहोल आढळलं आणि तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवण्याआधीच लोक पकडले जातील, असा पोलिसांना विश्वास आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- लखनौ; लग्न करण्यास नकार, गर्लफ्रेण्डचा बॉयफ्रेण्डवर अॅसिड हल्ला 

                     उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये झालेल्या अॅसिड हल्ल्याने खळबळ माजली आहे. लग्न करण्यास नकार दिल्याने एका तरुणीने तरुणावर अॅसिड फेकलं. या हल्ल्यात तरुण गंभीर झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बिजनौर जिल्ह्यातील गजरौला शिव गावात राहाणाऱ्या सूरने दुसऱ्या धर्म मानणाऱ्या प्रेयसीसोबत लग्न करण्यात नकार प्रेयसीने सूरजला वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं होतं. मित्र अर्जुनसह सूरज प्रेयसीच्या घरी गेला. पार्टीत त्याने प्रेयसीच्या कुटुंबियांसोबत जेवण केलं. पण तो घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा तरुणीने त्याच्यावर अॅसिड फेकलं.“आम्हाला माहित नव्हतं की, सूरजची प्रेयसी अॅसिड घेऊन बसली आहे. तिने अचानकपणे सूरजवर अॅसिड फेकलं,” असं सूरजचा मित्र अर्जुनने सांगितलं.पोलिसांच्या माहितीनुसार, “दोघांमध्ये मागील दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण सूरजचा विवाह दुसऱ्या मुलीशी ठरल्याने प्रेयसी नाराज होती. तरुणीविरोधात गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरु आहे.”“तरुणीच्या हल्ल्यात सूरजचा चेहरा आणि शरीर 50 टक्के भाजलं आहे,” असं डॉक्टरांनी सांगितलं. केंद्र सरकारने अॅसिड हल्ल्यातील दोषीला जन्मठेप किंवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणाची सुनावणी भारतीय दंडविधान कलम 376A अंतर्गत 60 दिवसात पूर्ण करणं बंधनकारक आहे.

१९- बीड; अंबाजोगाईतील ११ वर्षीय मुलाचा मृत्यू; टीव्हीत पाहून फाशीची नक्कल करताना मुलाला गळफास 

२०- मुंबईत चार जणांकडून 70 लाखांचे परदेशी चलन जप्त 

                  मुंबईत रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 4 जणांकडून तब्बल 70 लाख रुपये रोख सापडले आहेत. हे पैसे साडे 39 हजार डॉलर्स आणि 500 युरोच्या स्वरुपात होते. रोहित कोटवानी ,टिकंमदास खेमचंदानी, नविन कुमार कलिनानी,प्रकाश कालरा अशी या आरोपींची नावं असून चारही आरोपी कल्याणजवळच्या उल्हासनगरचे आहेत. कुर्ला रेल्वे पोलिसांनी 61 हजार अमेरिकन डॉलर आणि 39 हजार 500 युरो असे परकीय चलन 4 संशयितांकडून जप्त केले आहे. 

२१- ठाण्याचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांची मुंबईत बदली 

                    ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक, प्रशासन विभागाची जबाबदारी आता त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयपीएस अधिकारी आशुतोष डुंबरे यांची ठाण्याचे सप पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. लक्ष्मीनारायण हे अतिशय प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी म्हणून ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी झालेल्या सत्यम घोटाळ्याचा तपास त्यांनी केली होती.

२२- जळगाव; १२ वीतील विद्यार्थ्याचा खून, खूनानंतर मृतदेह जाळला 

                   जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात १२ वीत शिकणाऱ्या नीलेश बेटोदे या विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री या गावात हा प्रकार आहे.  नीलेश हा फत्तेपुर येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी होता. धारदार शस्त्राने त्याचा खून केल्यानंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडलाय. सोमवारी शाळेतून परत आल्यानंतर रात्री कोण्याच्या तरी बोलवण्यावर नीलेश घराबाहेर गेला. तो परत आलाच नाही. शोधाशोध केल्यानंतर सकाळी एका शेताजवळ नीलेशचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. खून कशा मुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.

२३- दिवा; एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वे विस्कळीत 

                   दिवा रेल्वे स्थानकाजवळ उद्योगनगरी एक्सप्रेस गाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे जलद मार्गावरील मुंबई सीएसटीच्या दिशेने येणा-या गाडया काही मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन कामावर निघण्याच्यावेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने नोकरदार प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील या बिघाडामुळे नोकरदार प्रवाशांना नियोजित वेळेत कार्यालय गाठताना अनंत अडचणींचा सामना करावा लागणार असून, कदाचित आज लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. काल मंगळवारी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले होते.

~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२४- भाजप शहर जिल्हाध्यक्षांची आज निवड 

२५- कारखाने बंद करणाऱ्यांना दूरच ठेवा - खा, अशोकराव चव्हाण 

२६- निवासी आश्रम शाळेतील शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; मनाठा ठाण्यात दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल 

२७- इसापूर प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा शिल्लक 
२८- तरोड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उद्यान उभारण्याची मागणी 

२९- नायगाव; वसतिगृहातील मुलांचा आहार, आरोग्य अन्य सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आठ वसतिगृहांना दंड 
~~~~~~~~~~~~~~~
चांगले विचार आचरणात आणतांना कष्ट पडतातच...असे विचार प्रसंगी कटूही वाटतात...परंतु हेच विचार आपले जीवन "वैभवशाली" करतात 
[संघशील भद्रे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
विलास बकाल, राजेंद्र बियाणी, गिरीश चालीन्द्रवार, प्रशांत कौटीकवार, बालाजी तिडके, रवी कावळे, निवृत्ती वाघ, राजू ल्ल्तेपवार, दत्ता इंगोले, प्रमोद देशपांडे, अनिल शेखर, अनोज श्रीमाळ, वैष्णवी बोद्दुल्ला 
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस. 
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स 
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स 
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी 
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला 
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड. 
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट 
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध 
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५०० 
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत 
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क 
बाहेती- 9423785456, 
गायकवाड- 8975495656
१५००  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: