प्रजासत्ताक दिनाच्या समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्ह २६-०१-२०१६चे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- तहरिक-ए-तालिबानचा म्होरक्या फजुल्लाह ड्रोन हल्ल्यात झाला ठार?
२- अटारी सीमेवर बीएसएफ जवानांनी पाकिस्तानी जवानांना दिली मिठाई.
३- सीरिया - अलेप्पो शहारात झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २३ जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- अहमदनगर : भूमाता ब्रिगेडचे स्वागत करू, परंतु त्यांना शनी चौथऱ्यावर जाऊ देणार नाही- देवस्थान अध्यक्ष अनिता शेटे
५- हिंसा, असहिष्णू वृत्तींपासून स्वत:चं रक्षण करायला हवं - राष्ट्रपती
नवी दिल्ली : भारताचा 67 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त राजपथावर भारताची ताकद आणि संस्कृतीची झलक पहायला मिळेल. यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात सहभागी होतील. सुरुवातीला राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे सन्मान देण्याचा प्रमुख कार्यक्रम असतो. राष्ट्रपती संचलनाची पाहणी करुन सलामी स्वीकारतील. भारतीय लष्कराच्या तीन दलांचं शक्तीप्रदर्शन हे या सोहळ्याचं खास वैशिष्ट्य असतं. भारतीय नौदलाला पथसंचलनाच्या नेतृत्त्वाचा मान मिळाला आहे. दरवर्षी जवळपास 2 तास ही परेड सुरु असते, मात्र यंदा त्याचा कालावधी 15 मिनिटांनी कमी करण्यात आला आहे. हे संचलन भारताचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा, विज्ञान, प्रगती अशा विविध क्षेत्रांचं प्रदर्शन करते. तसेच यावेळी विविध राज्यांच्या चित्ररथांच्या माध्यमातून आपापल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, तर 26 जाने 1950 रोजी राज्यघटना अमलात आणली गेली. हाच दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राजपथावरील संचलन.
६- सैन्याच्या श्वानपथकाचं 25 वर्षांनी राजपथावर संचलन
पंचवीस वर्षानंतर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय सैन्यातील श्वानपथकाचा समावेश होणार आहे. यांना माणसांची भाषा समजत नाही. पण आपल्या प्रशिक्षकाचा प्रत्येक आदेशाचं ते पालन करतात. या श्वानांना आपली भाषा समजत नसली, तरी केव्हा काय करायचं याचा त्यांना चांगलाच सराव आहे.म्हणूनच एक शिटी वाजवताच ते उठून उभे राहतात आणि दुसऱ्यांदा शिटी वाजवताच, ते सावधान देखीलहोतात.जवानांसोबत पथसंचलनात सहभागी होणाऱ्या या डॉग स्कॉडमध्ये एकूण 36 श्वान आहेत. यात 24 लॅब्रडॉर तर उर्वरीत 12 जर्मन शेफर्ड जातीचे आहेत. राजपथावरील परेडमध्ये सहभागी होण्याच्या इच्छेनं हे
श्वान आणि त्यांचे प्रशिक्षक गेल्या चार महिन्यांपासून सराव करत होते. दररोज तीन वेळा त्यांचा हा सराव सुरु होता.या श्वानांना प्रजासत्ताक दिनाच्या वातावरणाशी सुसंगत करण्याचे प्रयत्नही करण्यात आले. जेणेकरुन
प्रत्यक्ष परेडच्या वेळेस असणारा जनसमुदाय पाहून त्यांचं लक्ष विचलित होऊ नये. परेडच्या वेळी प्रत्येक श्वानासोबत त्यांचं एक-एक हँडलर हजर असतो. हे श्वानपथक परेडमध्ये सहभागी होणार असलं, तरी राजपथवर ते कुठलंही सादरीकरण करणार नाहीत. हे श्वान आपल्या हँडलरच्या इशाऱ्यावरच कृती करतात. ज्याप्रमाणे हँडलर सावधान-विश्राम होतात, अगदी तशीच कृती हे श्वानही करतात.
७- ‘झिरो बजेट शेती’चं तंत्र सांगणाऱ्या सुभाष पाळेकरांना ‘पद्मश्री’
ज्याला आज पाळेकर तंत्र म्हणून ओळखतो ते तंत्र पाळेकरांनी सुरुवातीला आपल्या शेतीत काही वर्ष वापरुन पाहिले, त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यावरच त्यांनी त्याचा देशभर प्रसार सुरु केला. पुस्तक, व्याख्याने आणि शिबिराच्या माध्यमातून त्यांनी या झिरो बजेट शेतीचा प्रसार केला. आज देश-विदेशात या तंत्राचा वापर केला जातो. देशात ४० लाख शेतकरी झिरो बजेट शेती करतात असे ते सांगतात. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम शेतकरी तसेच कृषी-शास्त्रज्ञांच्याही लक्षात आले आहेत. त्यामुळे केंद्रीय स्तरावरूनच सेंद्रीय शेतीला पाठबळ दिले जात आहे. मात्र त्याचे चांगले परिणाम दिसायला बराच काळ जाऊ शकतो. अशावेळी झिरो बजेट शेतीतून फायदा मिळवणारे ४० लाख शेतकरी या तंत्राचा यश दाखवून देत आहेत. कर्नाटक,आंध्रप्रदेश,केरळ या राज्यात झिरो बजेट शेती करणारे जास्त शेतकरी आहेत. ज्या महाराष्ट्रात या झिरो बजेट शेतीचा जन्म झाला त्याच राज्यात पाळेकर तंत्र काहीसे उपेक्षित राहिले याची थोडीसी खंत पाळेकरांना वाटते. अर्थात यात पाळेकरांइतकाच तोटा इथल्या छोट्या कोरडवाहू शेतकऱ्याचाही झालाय यात शंका नाही.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मुंबई सीएसटी आणि महापालिका इमारत तिरंग्यात
राजधानी नवी दिल्लीप्रमाणे मुंबईतही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेच्या इमारती तिरंग्यात न्हाऊन निघाल्या. मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या या दोन्ही वास्तू हजारो दिव्यांनी उजळून गेल्या. तिरंगी रोषणाई पाहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोर अनेकांनी गर्दी केली होती. या नयनरम्य दृष्याला काहींनी डोळ्यात साठवलं तर काहींनी आपल्या कॅमेऱ्यात हे चित्र कैद केलं. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली आहे. गेल्या काही दिवसात आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन काहींना तपासयंत्रणांनी अटक केलं होती. त्यामुळे आजच्या दिवशी शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे.
९- भारताची शान आयएनएस विक्रांतचं कायमस्वरुपी स्मारक
मुंबई : भारताची पहिली वहिली लढाऊ विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतच्या रुपाने भारताच्या इतिहासाला भंगारात काढण्याची नामुष्की टळली आहे. भारताच्या 67 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच आयएनएस विक्रांतचं कायमस्वरुपी स्मारक करण्याचं निश्चित झालं आहे. विक्रांत भंगारात काढण्याचं वृत्त सुमारे 15 महिन्यांपूर्वी आलं आणि भारताची शान वाचवण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होऊ लागले. दक्षिण मुंबईतील नेव्हल डॉकयार्डजवळील लायन गेटसमोर स्मारकाचं उद्धाटन करण्यात आलं. वाईस अॅडमिरल एस.पी.एस चीमा, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आयएनएस विक्रांत ही केवळ युद्धवाहू नौका नसून भारतीय नौदलाच्या कर्तृत्वाचा जिवंत इतिहास असल्याचं म्हटलं जातं. आयएनएस विक्रमादित्यचा पाया रचताना आयएनएस विक्रांतवरुन युद्ध लढताना गिरवलेले धडे उपयोगी पडल्याचंही नौदल अधिकारी सांगतात. आयएनएस विक्रांत 1961 मध्ये सर्वप्रथम युद्धभूमीत उतरली. 36 वर्षांच्या सेवेनंतर 1997 मध्ये विक्रांतचा वापर थांबवला. 2014 मध्ये अनेक कारणांमुळे, मुख्यत्वे आर्थिक, विक्रांत भंगारात काढण्याच्या हालचालींना वेग आला होता.
१०- आमीर म्हणतो, भारत देश कधीच असहिष्णु नव्हता
मुंबई : भारत असहिष्णू असल्याचं वक्तव्य मी कधीच केलं नाही, असं म्हणत बॉलिवूड अभिनेता आमीर खानने घुमजाव केलं आहे. ‘रंग दे बसंती’ चित्रपटाला दहा वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो बोलत होता. “भारत असहिष्णु आहे, असं वक्तव्य मी केल्याचं प्रसारमाध्यमांनी सांगितलं. पण मी ते विधान कधीच केलं नाही आणि करणारही नाही. माझा देश मला प्रिय आहे आणि त्यामुळे देश सोडण्याचा प्रश्नच नाही,” असं सांगयलाही आमीर विसरला नाही. गोयंका पुरस्कार वितरण सोहळ्यात आमीर खाननं देश असहिष्णू असल्याची टीका केली होती. आमीर म्हणाला होता की, “किरण आणि मी आजवरचं संपूर्ण आयुष्य भारतात घालवलं आहे. पण किरण पहिल्यांदाच विचारलं की आपण भारत सोडून जाऊया का? किरणचं ते वक्तव्य खूपच धक्कादायक होतं. तिला आमच्या मुलांची काळजी वाटते.”
११- पुण्यात 1 कोटी किंमतीचे हेरोईन जप्त
पुणे – 26 जानेवारी : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी शनिवारवाड्याजवळ तब्बल एक किलो 100 ग्राम हेरोइन विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना अटक केलीये. हे दोघेही मुंबईचे राहणारे असून पुण्यात समीर नावाच्या व्यक्तीला या हेरोइनची डिलिव्हरी देण्यासाठी ते शनिवारवाड्याजवळ थांबले होते. पोलिसांनी जप्त केलेल्या हेरोइन ची किंमत ही आंतराष्ट्रीय बाजारामध्ये सुमारे एक कोटी रुपये इतकी आहे. अमली पदार्थाची किती मोठ्या प्रमाणावर मागणी पुण्यात होतेय हे यावरून स्पष्ट होतंय.
१२- शरद जोशींच्या मुलीनं सविनय नाकारला पद्म पुरस्कार
25 जानेवारी : 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्काराची घोषणा झाली. शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांना मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या कुंटुबियांकडे विचारणा झाली. मात्र त्यांच्या मुलीन हा पुरस्कार नाकारलाय. पुरस्कारापेक्षा माझ्या वडिलाचं काम खूप मोठ आहे. त्यामुळे हा पुरस्कार सविनय नाकारल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. शरद जोशींचे सहकारी अनंत देशपांडे, सुरेशचंद्र म्हात्रे यांनी सुद्धा पुरस्कार नाकारण्याच्या या भूमिकेच समर्थन केलंय. सरकार ही एक समस्या आहे असं म्हणणारे शरद जोशी कधीच सरकारी पुरस्काराचे लोभी नव्हते, यापुर्वीही त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. त्यांच्या कामाला साजेसा हा पुरस्कार नसल्याचं सुरेशचंद्र म्हात्रे यांनी म्हटलंय.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सांगलीतील 45 तृतीयपंथीयांना मतदान ओळपत्रांचं वाटप
१४- शनि शिंगणापूर ग्रामस्थांच्या ग्रामसभेत निषेध ठराव मंजूर
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेण्टी-20 चा थरार
अॅडलेड : वन डे सामन्यांची मालिका गमावल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची टीम इंडिया आजपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेत उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेण्टी-20 मालिकेतील पहिला सामाना आज अॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुरु होईल.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१६- दुष्काळनिवारणात समन्वय ठेवा, पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
१७- लोहा सहसील कार्यालयात आज भरणार 'गुराखी' संमेलन
१८- आसना पुलावरून ट्रक कोसळून एक ठार
१९- देगलूर; नेत्रशस्त्रक्रिया करून दोन गावे अंधत्वमुक्त, दीड हजारावर
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
माधवराव पाटील जवळगावकर, सचिन राठोड, सारड जाधव, उज्वल मिड, अक्षय वाटमवार, असद बल्खी, क्रांती कुमार, अनिल दोनेराव, सुदर्शन अल्लडवाड, प्रवीण बियाणी, बाळू भुरे, विशाल नागले, बालाजी कमलावार, रोहिदास पौळ, वीरेंदर मचाणवार, प्रांजली कपूर, गोविंद धांगे, संतोष खैरे, शिवम वर्मा, मुजीब सय्यद
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांणा उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो...
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे चारित्र्य आणि माणुसकी......
(गजानन दवे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

लाहोर, दि. २६ - गेल्या वर्षी पेशावरमधील लष्करी शाळा आणि मागच्याच आठवड्यात बाचा खान युनिव्हर्सिटीवर झालेल्या दहशतवादी जबाबदारी स्वीकारणा-या 'तहरिक-ए-तालिबान' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजुल्लाहचा ड्रोन हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये मृत्यू झाल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे. या वृत्ताला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फजुल्लाहच्या अफगाणिस्तानातील घरावर पाकिस्तानी लष्कर व अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या ड्रोन हल्ल्यात फजुल्लाह, त्याची पत्नी, मुलगा यांच्यासह एकूण ५ जण ठार झाले आहेत. दरम्यान यापूर्वीही अनेकवेळा फजुल्लाहच्या मृत्यूच्या वावड्या उठल्या होत्या, मात्र तहरिक-ए-तालिबानने त्या सर्व वृत्तांचे खंडन करत फजुल्लाह जिवंत असल्याचा दावा केला होता.

आयुष्यभर समाजातून दुर्लक्षित राहून आणि समाजाकडून हीन वागणूक मिळणाऱ्या सांगलीतील तृतीयपंथीयांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पाश्वभूमीवर सांगलीतील 45 तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्राचं वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष अशी रचना आहे. मात्र तृतीयपंथ समाजाचा घटक असूनही हा वर्ग तसा वाळीत टाकलेलाच म्हणता येईल. भारताच्या घटनेत या वर्गाची कुठेही नोंद नसल्याने या समाजाला देशाचे नागरिक म्हणून काहीही सोयीसुविधा, सेवा मिळत नाहीत. त्यामुळे तृतीयपंथीयांना मतदान ओळखपत्र मिळावे म्हणून ‘मुस्कान’ संघटनेनं विशेष प्रयत्न केले.
१४- शनि शिंगणापूर ग्रामस्थांच्या ग्रामसभेत निषेध ठराव मंजूर
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेण्टी-20 चा थरार
अॅडलेड : वन डे सामन्यांची मालिका गमावल्यानंतर महेंद्रसिंह धोनीची टीम इंडिया आजपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेण्टी-20 सामन्यांच्या मालिकेत उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेण्टी-20 मालिकेतील पहिला सामाना आज अॅडलेडच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुरु होईल.
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१६- दुष्काळनिवारणात समन्वय ठेवा, पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
१७- लोहा सहसील कार्यालयात आज भरणार 'गुराखी' संमेलन
१८- आसना पुलावरून ट्रक कोसळून एक ठार
१९- देगलूर; नेत्रशस्त्रक्रिया करून दोन गावे अंधत्वमुक्त, दीड हजारावर
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
माधवराव पाटील जवळगावकर, सचिन राठोड, सारड जाधव, उज्वल मिड, अक्षय वाटमवार, असद बल्खी, क्रांती कुमार, अनिल दोनेराव, सुदर्शन अल्लडवाड, प्रवीण बियाणी, बाळू भुरे, विशाल नागले, बालाजी कमलावार, रोहिदास पौळ, वीरेंदर मचाणवार, प्रांजली कपूर, गोविंद धांगे, संतोष खैरे, शिवम वर्मा, मुजीब सय्यद
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांणा उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो...
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच,
ती म्हणजे चारित्र्य आणि माणुसकी......
(गजानन दवे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment