Tuesday, 12 January 2016

नमस्कार लाईव्ह १२-०१-२०१६ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १२-०१-२०१६ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- इराकमध्ये एका कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटात २० जणांचा मृत्यू 
२- इंडोनेशियातील मोलुक्का बेटावर ६.९ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचे भूकंपाचे धक्के 
३- बगदाद मधील आतंकी हल्यात ७ जणांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- महात्मा फुलेंचे वंशजांचं संघाच्या कार्यक्रमात पथसंचलन 

                   पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बहुजन समाजाचे नेते, समाजसुधारक महात्मा फुले यांच्या वंशजांनीही हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फुले यांची चौथी आणि पाचवी पिढी या कार्यक्रमात संघाच्या गणवेशात हजर होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्याजवळील मारुंजी येथे 3 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात दीड लाख स्वयंसेवकांनी हजेरी लावली होती. यावेळी महात्मा फुलेंचे मोठे बंधू राजाराम यांचे खापरपणतू नितीन फुले, त्यांचा 21 वर्षांचा मुलगा रितेश फुले हे या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून हजर होते. महात्मा फुले यांच्यापासून त्यांचं कुटुंब जुनं गंज पेठ या परिसरात राहत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समरसतेचा विचार हा जातविरहीत आणि कोणताही भेदभाव  न मानणारा आहे, अशी प्रतिक्रिया नितीन फुले त्यांच्या उपस्थितीबाबत दिली आहे. 

५- अफजल गुरुचा मुलगा म्हणतो, 'माझा भारतावर विश्वास नाही' 

                      संसद हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरुचा मुलगा गालिबने 95 टक्के गुणांसह दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना, माझा भारतावर विश्वास नसल्याचं अफझलचा मुलगा गालिबने म्हटलं आहे. वडिल अफजल गुरुप्रमाणे डॉक्टर होण्याचं स्वप्न असून त्यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं गालिबने म्हटलं आहे. पुढच्या शिक्षणासाठी सरकारकडून मदत हवीय का, असा प्रश्न विचारला असता भारतावर विश्वास नसून मी स्वतःच्या हिंमतीवर पुढे जाईन असं गालिबने स्पष्ट केलं. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दहशतवादी अफझल गुरुला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मुलगा गालिब जम्मू-काश्मीर बोर्ड परीक्षेत 95 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याने अफझल गुरुचं नाव दोन वर्षांनी पुन्हा चर्चेत आलं. दरम्यान, गालिबची ओळख सगळीकडे दहशतवादी अफझल गुरुचा मुलगा, अशीच सांगितल्याने पत्नी तबस्सुमने नाराजी व्यक्त केली आहे. अफझल गुरु तुमच्यासाठी दहशतवादी असेल, पण इथल्या लोकांसाठी तो शहीद आहे, असं तिने ठामपणे सांगितलं.

६- एअर इंडियाने प्रवास करायचाय? विमानतळावर 3 तास आधी पोहोचा 

                     पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्यानंतर देशभरातील विमानतळांवरी सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली आहे. एअर इंडियाने सुरक्षेच्या कारणास्तव एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चेकिंगसाठी 3 तास आधीच प्रवाशांनी विमातळावर हजर राहण्याची विनंती एअर इंडियाने केली आहे. देशांतर्गत विमान प्रवासासाठी 75 मिनिटं आधी विमानतळावर पोहोचणं आवश्यक असतं. मात्र, आंतरराष्ट्री प्रवासासाठी ही वेळ 150 मिनिटं होती. मात्र, आता प्रवाशांना तीन तास आधीच विमानतळावर पोहोचावं लागणार आहे. एका पत्रकाद्वारे एअर इंडियाने प्रवाशांना हे आवाहन केलं आहे. एअर इंडिया वगळता अन्य कोणत्याही विमान कंपनीने अद्याप तरी असं आवाहन केलेलं नाही. पठाणकोट हवाईतळावरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांची आणि प्रवशांच्या सामानांची तपासणी केली जाते आहे.

७- शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी का? : सुप्रीम कोर्ट 

                   तिरुअनंतपुरम : एकीकडे शनिशिंगणापूरमध्ये नवनिर्वाचित महिला अध्यक्षांनी महिलांना शनीदेवाच्या चौथऱ्यावर असलेली बंदी कायम ठेवणारा पुरोगामित्वाला हरताळ फासणारा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे केरळच्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारण्यावर सुप्रीम कोर्टाने मंदिर प्रशासनाला धारेवर धरलं आहे. केरळच्या शबरीमालातील अय्यप्पा मंदिरात महिला भक्तांना प्रवेशबंदी आहे. मात्र अशाप्रकारे प्रवेश नाकारण्याला कुठलाही संविधानात्मक आधार नसल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. ‘इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन’ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मंदिर प्रशासनाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. 10 ते 50 वर्ष वयोगटातील मासिक पाळी सुरु असलेल्या महिलांना शबरीमाला मंदिरात प्रवेश ोनाकारल्याचं वृत्त आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरुन महिलांसह पुरुषांनी टीकेची झोड उठवली.

८- काळा पैसा परत आणण्यासाठी काम झाले, पण त्याचा अपेक्षित निकाल मिळू शकला नाही - बाबा रामदेव 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी आयटम साँगवर ठुमके 

                    नांदेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी माळेगावात एक नवा फंडा वापरला गेला. आयोजकांनी आपलं सुपीक डोकं वापरत चक्क तरूणींना मराठी आणि हिंदी आयटम साँगवर तोकड्या कपड्यात नाचवलं. नांदेड जिल्ह्यात दक्षिण भारतातील सगळ्या मोठी माळेगावची यात्रा भरते. माळेगाव यात्रेत खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतरच्या धनगर मेळाव्याला संबोधत करण्यासाठी मुख्यमंत्री येणार होते. पण ते येण्याआधी गर्दी जमवण्याकरता कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठी आणि हिंदी आयटम साँगवर तोकड्या कपड्यात काही तरुणींनी नाचवण्यात आलं. त्यांनी अश्लील डान्स करुन गर्दी जमवली. खरं तर मुख्यमंत्री येईपर्यंत गर्दी खेचून ठेवण्यासाठी एका कलापथकाला बोलावण्यात आलं होतं. पण, या कलापथकाने चक्क मराठी, हिंदी आणि एका तेलगु आयटम साँगवर नृत्य केलं. अतिशय तोकड्या कपड्यात व्दैअर्थी हावभाव करून नाच सुरू होता. दुपारी एकपर्यंत हा बिभत्स प्रकार सुरू होता. जमलेला समुदाय सुद्धा गाण्यांवर धुमाकूळ घालत होता. आयोजकांनी असं होऊनही हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय.

१०- लोकलवरील ताण कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळेत बदल 

                     लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आणि होणारे अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार काही कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा विचार करत आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारने याबाबत माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवास करताना होणाऱ्या त्रासाबद्दल मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना लोकल ट्रेनमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गर्दीला ताब्यात ठेवण्यासाठी काय उपाययोजना केली, याबाबत राज्य सरकारला विचारणा केली होती. साधारणपणे 10 ते 5 या कार्यालयीन वेळा आहेत. मात्र काही कार्यालयं 11 वाजता सुरु करता येऊ शकतात का, शनिवार-रविवारऐवजी मधल्या वारांना सुट्टी देऊन विकेंडला कार्यालयं सुरु ठेवल्यास गर्दीवरील  ताण कमी होऊ शकेल का, याबाबत विचार सुरु आहे. रेल्वेद्वारे स्वच्छतागृहांची साफसफाई आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. 

११- सर्व अनुदानित शाळांत CCTV लावा, हायकोर्टाचे आदेश 

                     मुंबईतील दादरमधल्या शाळेत कर्मचाऱ्यानेच विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याच्या घटनेची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. महिला सुरक्षाप्रश्नी सर्व अनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. विशेष म्हणजे आदेशाचं पालन न करणाऱ्या शाळांचं अनुदान रद्द करण्याच्या सूचनाही मुंबई हायकोर्टाने दिल्या आहेत. हायकोर्टाने सुओ मोटो दाखल करत याचिकेवर सुनावणी केली. राज्य सरकारने तातडीने मुंबईतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलवावी, असंही कोर्टाने सांगितलं आहे. गेल्या काही दिवसात शाळांमधील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्वरित पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१२- चूल आणि मूल हा महिलांना मिळालेला वरदानच – पंकजा मुंडे 

                    शनिशिंगणापूर प्रकरणात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा अमरावतीत एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. चुल आणि मुल हा महिलेला मिळालेला शाप नसुन ते वरदान असल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. सगळ्या महिला बचतगटाच्या सदस्यांना त्यांच्या पायावर उभं राहता यावं, ग्रामीण भागातील महिलांचं सक्षमीकरण व्हावं या उद्देशानं अमरावती मध्ये विभागीय महिला मेळावा तसंच स्वयंसहाय्यता बचत गटांद्वारे उत्पादित वस्तुंचे विकास गंगोत्री या विभागीय विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्याहस्ते झालं. मात्र यावेळी, चूल आणि मुल या मधून जर भारतातील स्त्री बाजूला झाली तर या देशाची संस्कृती सुद्धा लोपून जाईल, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे पुन्हा एका चर्चेला उधाण आलं आहे.

१३- एन्कॉउंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलिस दलात, निलंबनाची कारवाई मागे 
१४- गोविंद पानसरे हत्या प्रकरण, केस लढवण्यासाठी अॅडव्होकेट जनरलची नेमणूक करावी, पानसरे कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- कोल्हापुरात थकबाकीदारांच्या घरावर सनई-चौघड्यांसह वसुली मोर्चा 

                      थकबाकीदारांनी कोट्यवधी रुपयांची कर्ज थकवल्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत आली आहे. बँकेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी संचालकांनी नामी शक्कल शोधली आहे. बुडव्या थकबाकीदारांकडून गांधीगिरीने कर्ज वसुलीसाठी बँकेच्या अध्यक्षांसह कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दारात सनई-चौघडे वाजवून त्यांना कर्ज भरण्याचं आवाहन केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार दिवंगत उदयसिंहराव गायकवाड यांचे पुत्र थकबाकीदार मानसिंगराव गायकवाड यांच्या दारात आज बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह बँकेचे कर्मचारी अधिकारी सनई-चौघडे घेऊन पोहोचले. बँक कर्मचारी दिवसभरात मानसिंहराव गायकवाड, डॉ. संजय एस. पाटील, विजयमाला देसाई यांच्यासह चौघांच्या दारात वसुलीसाठी दाखल झाले. त्यांच्या दारातच सनई- चौघडे वाजवून आणि त्यांना गुलाब पुष्प देऊन बँकेचं कर्ज भरण्याची विनंती केली. 

१६- ठाण्यात गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार, 5 नराधम अटकेत 

                   ठाण्यात एका 22 वर्षीय गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. लोकमान्य नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 5 नराधमांना अटक करण्यात आलीये. 8 जानेवारीच्या रात्री ही तरुणी खानावळीत जेवण आणायला जाते म्हणून बाहेर पडली. त्याचवेळी तिला तिचा शेजारी गोपी बोरा याने रिक्षातून फिरवून आणतो म्हणून तिला दुसरीकडे नेलं. आपल्या चार साथीदारांच्या बरोबर गोपीने या तरुणीवर रात्रभर अत्याचार केला. रात्री 11 वाजता बाहेर पडलेली मुलगी पहाटे 5:30 वाजता घरी परतली. त्यानंतर या मुलीने घडला प्रकार आईला सांगितला. लगोलग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्यानंतर गोपी बोरा, बालाजी खरात, कमलेश गुप्ता, विनयबहादूर गुप्ता आणि राजेश मोर्य या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

१७- उत्तर प्रदेश; सूनेचा क्रुरपणा, सासूला ठार मारण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद 

                     लखनऊ : सासू -सून  यांच्यातील हेवेदावे आणि वाद नवे नाहीत. अनेक घरांत कमी जास्त प्रमाणात असं चित्र पाहायला मिळतं. मात्र उत्तर प्रदेशमधील एका कुटुबांत सून आपल्या ७० वर्षीय सासूवर कसा अत्याचार करते, हे पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. सासूला ठार मारण्याचा प्रयत्न करते. त्याची दृश्य पाहिल्यावर धक्का बसतो. ही सगळी थरारक दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. यूपीतील बिजौरीया भागातील नेहतरमध्ये ही घटना घडली. संदीप जैन यांची पत्नी संगिता जैन हीने हे क्रूर कृत्य केले आहे. आपली सासू राजराणी जैन यांचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. 

इथपर्यंतच संगीताचा क्रूरपणा थांबत नाही. तर घरातील वरवंठा आणून डोक्यात घालत मारण्यापर्यंत तिची मजल गेली. पाच जानेवारीला दुपारी हा प्रकार घडलाय. खोलीत लपवलेल्या सीसीटीव्हीमुळे संगीताचा क्रुरपणा समोर आलाय. पोलिसांत या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. सात वर्षांपूर्वी संगीताचं लग्न झालंय. आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. 

१८- दिल्ली; सतत १५ दिवस बलात्कार केल्यानंतर गोळ्या घातल्या 

                    एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले, नंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडून एका खोल विहिरीत फेकून दिले.  उच्चभ्रू तरुणांनी आलिशान गाडीचा वापर करून, राजधानी दिल्लीजवळ ही घटना घडली. पीडित तरुणी 22 नोव्हेंबर रोजी बाजारातून घरी येत असताना ग्रेटर नोएडा येथील तिच्या घराजवळून 3 तरुणांनी तिचे अपहरण करण्यात आले. पांढऱ्या रंगाच्या एका आलिशान एसयूव्ही गाडीतून तिला एका फार्महाऊसवर घेऊन गेले. तिथे त्यांनी सलग पंधरा दिवस तिच्यावर तिघांनी बलात्कार केले. नंतर 5 डिसेंबर रोजी रात्री तिला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या. ती जिवंत वाचू नये यासाठी तिला तेथील खोल विहिरीत फेकून दिले. नग्न अवस्थेत फेकून ती 13 वर्षीय मुलगी केवळ जगण्याच्या इच्छाशक्तीमुळे वाचली. शुद्धीवर आल्यावर तिच्या छातीत घुसलेली बंदुकीची गोळी तिने स्वतः हाताने बाहेर काढली. दुसरी गोळी अद्याप तिच्या पाठीत आहे, मात्र तिच्या जिवाला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

१९- दिल्ली; मांडोली येथे गोदामाला भीषण आग; फायर ब्रिगेडच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- संकुल क्रीडा वसतिगृह मैदानावर १४ वर्षाखालील मुली व महिलांकरिता १८ ते २७ जानेवारी दरम्यान कराटे प्रशिक्षण शिबीर 
२१- विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद नांदेडला रुजु 
२२- हिमायतनगर; पाणी भरण्याच्या कारणावरून डोक्यात दगड घालून र्तारुनाचा खून 
२३- बारड येथील प्राध्यापकाच्या खून प्रकरणातील सूत्रधाराची लातूर जिल्ह्यातील देवणी येथे आत्महत्या 
२४- सावता माळी समाजाचा २४ जानेवारीला मेळावा 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- ज्येष्ठ अभिनेते शेखर नवरे यांचे निधन 

~~~~~~~~~~~~~~~
२६- जिल्हा परिषद नांदेड येथे प्रहार अपंग कार्यक्रते दि.२४जानेवारी २०१६पासून बेमूदत अमरण उपोषणास बसणार
http://goo.gl/OANVWw
~~~~~~~~~~~~~~~
२७- पती पत्नीच्या वादातून निर्घुण खून मुखेड तालुक्यातील केरुर येथील घटना
http://goo.gl/rxFtrd
~~~~~~~~~~~~~~~
कितीही दुःख आलं तरी, हसत ठेवा चेहरा..........
संभ्रमात पडेल दुःखही, कसला हा माज एवढा...
[देविसिंघ राजवंशी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संघरत्न पवार, इफ्तेकार आली, निखील अंभोरे, विनोद खडकीकर, कालिदास पाटील, शब्बीर तालुकदार, साईनाथ गरड, संजय पांचाळ, दत्ता कल्याणकर, प्रताप बोरगावकर, सचिन माळी, जय महापात्रा, निलेश मुनंकर, संतोष गाडा, धनंजय गायकवाड, पराग तरोडकर
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५  ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: