मुखेड :- रियाज शेख
महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं ती आई म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्य शिवप्रेमींच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
स्थानिक संभावित अश्वारुढ शिवस्मारक स्थळी दि. 12 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गंगाधर पाटील, दिपक लोहबंदे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्याध्यक्ष शिवराज पाटील, तालुका अध्यक्ष संतोष पाटील इंगोले, गजानन बोडके, मंगेश पाटील इंगोले, काँ.अंकुश माचेवाड, अँड.गोविंद डुमणे, काँ.आकाश कलेपवार, राष्ट्रवादीचे संभाजी पाटील मुकनर, काँग्रेसचे मोहन तुरटवाड, सामाजिक कार्यकर्ते वजीर सलगरकर, युसुफ शहाँ, पत्रकार अँड.मिलिंद कांबळे, संदिप पिल्लेवाड सह आयोजक सामजिक कार्यकर्ते तथा वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण रँपनवाड, पत्रकार रियाज शेख उपस्थित होते. याप्रसंगी माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
" संभाजी ब्रिगेड च्यावतीने सावित्रीबाई फुले- माँ जिजाऊंना अभिवादन "
संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष संतोष पाटील इंगोले यांच्या नेतृत्वात शासकिय विश्रामगृहामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड सह बहुजन चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
--
+++++++++++++++++
नांदेड दि.12, जिजाऊ मासाहेब यांची ४१८ वी जयंती निमित्त जिल्हा परिषद नांदेड मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगलाताई आनंद गुंडले हस्ते जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद नांदेडच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिजाऊ मासाहेब यांची ४१८ वी जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.मंगलाताई आनंद गुंडले यांनी जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तसेच या प्रसंगी अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी गुलाबसिंह राठोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक एस. बी. भातलवंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आर. एस. राऊत, बांधकाम विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता बी. एन. लांडेकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एम. यु. गोहोत्रे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे सहायक प्रकल्प संचालक पी. पी. घुले, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सतिश कावडे आदी अधिकारी व कर्मचारी यांनी जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषद नांदेडच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिजाऊ मासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
+++++++++++++++++



No comments:
Post a Comment