आयसिसने जॉर्डन येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पतीच्या मृत्यूस ट्विटर जबाबदार आहे, असा आरोप एका महिलेने केला आहे. तिने ट्विटरविरोधात कॅलिफोर्निया येथील ऑकलंडच्या फेडरल कोर्टात तक्रार दाखल केली आहे.
फ्लोरिडातील तमारा फिल्ड्स हिचे पती लॉइड हे ९ नोव्हेंबरला पोलिस प्रशिक्षण केंद्रावरील दहशतवादी हल्ल्यात मारला गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती. पत्नी फिल्ड्स हिने लॉइडच्या मृत्यूला ट्विटर जबाबदार आहे, असा आरोप केला आहे. जगातील सर्वाधिक क्रूर असलेल्या आयसिस या दहशतवादी संघटनेला आपला संदेश जगभरात पोहचवण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी ट्विटरमुळे एक व्यासपीठ मिळालं आहे. या सोशल नेटवर्किंगशिवाय या दहशतवादी संघटनेला प्रचार आणि प्रसार करणं शक्य झालं नसतं, असंही या महिलेनं म्हटलंय.
No comments:
Post a Comment