अरुणाचल प्रदेश – 27 जानेवारी : अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीला मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूरी दिली आहे. दरम्यान, केंद्राच्या या शिफारसीला काँग्रेसने सोमवारी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या आदेशावर सही केल्याने राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
दरम्यान, अरूणाचलमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे राष्ट्रपती राजवट आणण्याच्या या निर्णयाविरूध्द काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे.

No comments:
Post a Comment