Wednesday, 27 January 2016

परभणी : हुंड्यासाठी जाळलेल्या महिलेचा अखेर मृत्यू, सासूविरोधात गुन्हा


परभणी : परभणीत हुंड्यासाठी जाळलेल्या नवविवाहितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. शासकीय रुग्णालयात तिचा अखेर मृत्यू झाला. हदगावमध्ये हुंड्यासाठी विवाहितेला पेटवून दिलं. या घटनेत ती 92 टक्के भाजली होती. याप्रकरणी विवाहितेच्या सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
मालनबी नावाच्या महिलेचं पाथरी तालुक्यातील हादगाव नखाते येथील राहणाऱ्या मुनवर बेग याच्याशी अवघ्या आठ महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाहाच्या काही दिवसातच सासरच्या लोकांनी गाडी आणि पैशासाठी तिचा छळ सुरु केला.

सोमवारी रात्री उशिरा घरी कोणीही नसताना सासूने अंगावर रॉकेल टाकून मालनबीला पेटवून दिलं. यानंतर सासरच्या लोकांनीच तिला परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण माहेरच्या कोणालाही याची माहिती देण्यात आली नव्हती. अखेर मंगळवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.

No comments: