Wednesday, 27 January 2016

शनिशिंगणापूर - चर्चा करा आणि प्रश्न सोडवा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन


अहमदनदर : शनिशिंगणापूर मंदिरात चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशाच्या वादात आता सरकार मध्यस्थी करणार आहे. भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. दुपारी एक ते दोन दरम्यान ही भेट होणार असल्याचं कळतं. 
चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना काल पोलिसांनी सुपे टोलनाक्यावरच ताब्यात घेतलं होतं. यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. 

 हा वाद चर्चेतून सोडवला जावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला आदेशही दिले आहे. भूमाता ब्रिगेडच्या आंदोलनामुळे आजही शनिशिंगणापुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

No comments: