नांदेड, 6- पाणी हे मूल्यवान असून त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी केले. कंधार तालुक्यातील फुलवळ येथे दोन बोअरला लागलेले पाण्याचे जलपुजन कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
उपसरपंच गोकर्णाताई मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर, शिवहार मंगनाळे,हनमंतराव पेटकर, सुषमाताई मंगनाळे, परमेश्वर मंगनाळे, बी.आर.बनसोडे, बसवेश्वर मंगनाळे, गंगाधर शेळगावे, अजित शेख, आनंदा पवार आदींची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या शेष निधीमधून वर्षाताई भोसीकर यांना फुलवळ येथे दोन बोअर व मोटारी मंजूर करुन दिल्या होत्या. त्या दोन्ही बोअरला मुबलक पाणी लागले असून जलपुजनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्या म्हणाल्या, आपण मोठया प्रमाणावर भूगर्भातून पाण्याचा उपसा करतो त्यामुळे पाण्याची पातळी अधिकाअधिक खोल जात आहे. त्यामुळे भिषण पाणी टंचाई सामना करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. भविष्यकाळात ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाणी पुनर्भरणासारखे कार्यक्रम होती घ्यावे लागतील. यामध्ये जलयुक्त शिवार अभियान, गटारमुक्त अभियान, बोअर व विहिर पुनर्भरण तसेच जलसंधारणाची कामे हाती घेतल्यास पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे सर्वत्र टंचाई जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी सर्व नागरीकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वांभर बसवंते यांनी केले तर उपस्थितांचे आभार वसंत मंगनाळे यांनी मानले. या कार्यक्रमाला राजू बोधणे, पिराजी लोमासे, शिवसांब फुवलळे, संजय मंगनाळे, किशन मंगनाळे, विठ्ठल बोरगावे, राम शेंबाळे, गणेश मंगनाळे, रमाकांत डांगे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरीक व ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment