~~~~~~~~~~~~~~~
महत्वाच्या बातम्या
१- नमस्कार लाईव्हच्या वेबसाईटचे अनावरण संपन्न
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/01/blog-post_13.html
~~~~~~~~~~~~~~~
२- फ्लॉवर एन फ्लॉवर्स विषयी मी अभिमानाने बोलू शकतो - शाम जाजू, भाजप राष्ट्रीय उपाध्यक्ष
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/01/blog-post_68.html
~~~~~~~~~~~~~~~
३- व्यापारी चोर नाहीत - शाम जाजू
http://namaskarlivenanded.blogspot.in/2016/01/blog-post_10.html
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
1- सिडनी : ख्रिस गेलला दंड, महिला पत्रकारासोबत फ्लर्टिंग महागात
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला 10 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. महिला पत्रकारासोबत फ्लर्टिंग केल्याबद्दल त्याला हा दंड ठोठावण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगदरम्यान, गेलने महिला पत्रकारावर वाईट टिप्पणी केली होती. यामध्ये तो दोषी ठरल्याने, त्याच्या संघाने दंड ठोठावला आहे. ‘बिग बॅश’ लीगमध्ये ख्रिस गेल मेलबर्न रेनिगेड्स संघाकडून खेळतो. रेनिगेड्स टीमचे सीईओ स्टुअर्ट कॉवेण्ट्री यांनी गेलला दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दिली. गेल्याच्या दंडाची रक्कम मॅकग्रा फौंडेशनला दान करण्यात येणार आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
2- पाकसाठी निवडणुकीपूर्वीचे मोदी हवे - उद्धव ठाकरेंचे टोला
3- सनातनचा सल्ला, श्रीपाल सबनीस, मॉर्निंग वॉकला जात चला
तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला, श्रीपाल सबनीस, असं ट्वीट सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केलं आहे. त्यामुळे संजीव पुनाळेकर पिंपरी-चिंचवड साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना धमकावत आहेत का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
4- दिवाकर रावतेंच्या गाडीला अपघात, रावते सुखरुप
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या गाडीला गंभीर अपघात झालाय. या अपघातात गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. लोअर परळ इथल्या फिनिक्स मिलजवळ हा अपघात झाला. या अपघातात रावते यांना किरकोळ दुखापत झाली आहे. महालक्ष्मीच्या दिशेने जाणार्या स्विफ्ट डिझायर गाडीने अचानक यु टन घेतला आणि दादरच्या दिशेने जाणार्या रावतेंच्या गाडीवर येऊन धडकली. या अपघातात रावतेंच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर लगेचच शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. रावतेंना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना लगेचच उपचाराकरता जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
5- गृहमंत्रालयाकडून ३५ जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागांसाठी १००० कोटी रुपयांची आर्थिक मदतीला मंजुरी देण्यात आली
6- संजय दत्त २७ फेब्रुवारी रोजी सुटणार
मुंबई बॉम्बफोट हल्ल्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी येरवडा कारागहात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूडचा अभिनेता संजय दत्त आता कायमचा तुरूंगाबाहेर येणार आहे. येत्या फेबुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात तो तुरूंगातून सुटणार असल्याचं माहिती सूत्रांकडून देण्यात आली. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी संजय दत्तची उर्वरित शिक्षा माफ करण्याची परवानगी दिल्याचं समजते. तुरूंगात चांगल्या वार्तनाच्या बदल्यात सर्व कैद्यांना 114 दिवसांची सूट मिळते. त्यामुळे त्याच्या शिक्षेत कपात करत त्याची साडेतीन महिनेआधी सुटका करण्यात येणार असल्याचं गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं. मात्र, यासंदर्भात गृहविभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
7- ओदिशातील दुष्काळग्रस्त भागासाठी केंद्र सरकारने ८१५ कोटी रुपये मंजूर
8- शनीची कृपादृष्टी, विश्वस्तमंडळात प्रथमच महिलांची वर्णी
शनिशिंगणापूर देवस्थानच्या इतिहासात क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थानच्या विश्वस्तमंडळात पहिल्यांदाच महिलांचा समावेश करण्यात आला आहे. सहायक धर्मादाय आयुक्तांनी या विश्वस्तमंडळाची यादी जाहीर केली आहे. शनिशिंगणापूर देवस्थानच्या अकरा सदस्यीय विश्वस्तमंडळात अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोन्ही महिलांना संधी मिळाली आहे. विश्वस्तपदासाठी तब्बल 98 अर्ज आले होते. यात 88 अर्ज पुरुषांचे तर दहा अर्ज महिलांनी केले होते. त्यापैकी दोन महिलांना अकरा सदस्यांच्या विश्वस्तमंडळात नेमणूक करण्यात आली आहे. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर एका महिलेने प्रवेश केला आणि त्याचे पडसाद देशभरात उमटले. यानंतर 4 ते 5 महिलांनी विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अखेर आज अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोन महिलांना संधी मिळाली आहे.
9- गडचिरोलीच्या तरुणाची खऱ्याखुऱ्या मोत्यांची शेती
आस्मानी अन् सुलतानी संकटांमुळं शेती करणं अवघड होत चाललं असताना, गडचिरोलीच्या एका तरुणानं याचं शेतीला लाखमोलाचा दर्जा दिला आहे. ज्या शेतीतून पूर्वी काही क्विंटलभर धान निघत होतं, तिथं आता चक्क मोती पिकताहेत. या मोत्याच्या शेतीची कहाणी. ज्याच्या हव्यासानं राजा महाराजांना वेड लावलं, जो महाराण्यांच्या गळाचा साज बनला, प्रियकरानं ज्याला प्रेयसीच्या डोळ्यांची उपमा दिली आणि अनेक महान कवींच्या कविता ज्याच्या उल्लेखाशिवाय पूर्णच झाल्या नाहीत, असा तो मोती.
हाच मोती गडचिरोलीतील पारडीच्या संजय गडांटे या आदिवासी तरुणासाठी लाखमोलाचा ठरला आहे.लहानपणापासूनच संजयला मोत्यांची आवड आणि उत्सुकता होती. पुढं हाच ध्यास घेऊन संजय मोठा झाला. वकील झाला. पण मोत्याचा विचार काही मनातून जात नव्हता. नदी जवळ होती अन् शेतही होतं. पण या दोघांची सांगड कशी घालावी हे सुचत नव्हतं. यासाठी गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली आणि इथंच मोत्याच्या शेतीचा मार्ग सापडला. संजय गडांटेंनी नदीतून शिंपले गोळा करुन घरी आणले आणि मोत्याचा प्रयोग केला. साधारण मोत्यांवरच न थांबता संजयनं प्रयोग करण्यास सुरुवात केली. आणि वेगवेगळ्या आकाराचे..डिझाईन्सचे आणि आजच्या ट्रेंडींगचे मोती तयार केले. सोबत आजूबाजूच्या तरुणांनाही मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
10- मुंबईत घरांच्या किमती 20 टक्क्यांनी घसरण्याचे संकेत
जर तुम्ही मुंबईत नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काळात मुंबईतील घरांच्या किमती 20 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. नव्या बांधकामासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आल्यामुळे दर घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जलद गतीने मिळणाऱ्या परवानग्या आणि परवानग्यांचा आकडा 119 वरुन 58 वर आणल्याने 20 टक्क्यांपर्यंतची घसघशीत सूट गृहखरेदीदारांना मिळू शकते, असा दावा काही बिल्डर करत आहेत. बांधकामाचं एकूण बजेट 30 टक्क्यांनी कमी होणार असल्याने नफा धरुन ग्राहकांना 20 टक्के सूट देता येऊ शकते, असं रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार मानतात.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
11- मरिन ड्राईव्हची शान परतणार, सात दिवसात राणीचा रत्नहार झळाळणार
येत्या सात दिवसांत मरिन ड्राईव्हवर पुन्हा एकदा सोनरी झगमगाट पाहायला मिळणार आहे. मुंबईची शान असलेल्या मरिन ड्राईव्हवरील गोल्डन क्विन्स नेकलेस एलईडी दिव्यांमुळे काहीसा काळवंडला होता. मात्र, आता लवकरच मरिन ड्राईव्हची ती शान पुन्हा पाहायला मिळणार आहे. मरिन ड्राईव्हच्या रस्त्यावर लावलेले पांढरे एलईडी दिवे बदलून पुन्हा पिवळे दिवे बसण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिले आहेत. येत्या सात दिवसात हे दिवे बदलण्याचे आदेश ईईसीएल कंपनीला देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सात दिवसात मरिन ड्राईव्हवर पुन्हा एकदा राणीचा रत्नहार झळाळताना दिसेल. काही महिन्यांपूर्वीच न्यायालयाने अशा प्रकारचे आदेश दिले होते. त्यामुळे या आदेशाची कार्यवाही करण्यात येत आहे.
12- रायपूर : कॉ़ंग्रेसचे नेते अजित जोगी यांना रुग्णालयात दाखल
13- कटक : समृद्ध जीवन फुड्स कंपनीचे महेश मोतेवारांची रवानगी कारागृहात, रुग्णालयात दाखल होण्याची विनंती फेटाळली.
14- पंजाबमधील खेमकारन सेक्टरमधून बीएसएफने ३० कोटी रुपये इतक्या किंमतीचे हेरॉइनचे सहा पॅकेट्स जप्त
15- आसाममध्ये ४ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
16- पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून काही भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानी वेबसाईट्स विद्रुप केल्या
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
17- विश्वविक्रमी प्रणवला MCAची शिष्यवृत्ती, महिन्याला 10 हजार रुपये
एकाच डावात एक हजार धावांचा डोंगर उभारणारा कल्याणचा युवा क्रिकेटर प्रणव धनावडे याला मुंबई क्रिकेट असोसिएशननं शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. एकाच सामन्यात प्रणवने एकट्याने नाबाद 1009 धावा ठोकल्या. याच कामगिरीसाठी एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रणवला दरमहा 10 हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. जानेवारी 2016 ते डिसेंबर 2021 या पुढील पाच वर्षांच्या काळात प्रणवला दरमहा या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. तसंच, पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रणवचं क्रिकेट प्रशिक्षण आणि शालेय शिक्षणाकडेही एमसीए जातीने लक्ष ठेवणार असल्याचं एमसीएचे संयुक्त सचिव डॉक्टर पी व्ही शेट्टी आणि डॉक्टर उन्मेश खानविलकर यांनी जाहीर केलं. प्रणवनं नुकतंच एमसीएच्या वतीनं ठाणे जिल्ह्यात आयोजित एचटी भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत एक हजार धावांची खेळी करण्याचा पराक्रम गाजवला होता. प्रणवनं अवघ्या 323 चेंडूत 59 षटकार आणि 129 चौकार लगावत 1009 धावा केल्या. त्यामुळं प्रणवच्या के.सी. गांधी स्कूलनंही 1465 धावांची मजल मारली.
18- ख्रिस गेलला दंड, महिला पत्रकारासोबत फ्लर्टिंग महागात
19- ज्यांनी 26/11 हल्ल्यात NSG चं नेतृत्त्व केलं, तेच टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात
धोनीच्या टीम इंडियाचं बुधवारी पर्थमध्ये आगमन झालं. पर्थच्या विमानतळावरून एका विशेष बसनं भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये दाखल झाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दाखल झालेल्या टीम इंडियाच्या पथकात, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून 27 जणांचा समावेश आहे. प्रथमच भारतीय संघासोबत सुरक्षा सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त ब्रिगेडियर गोविंद सिंग सिसोदिया या दौऱ्यावर सुरक्षा सल्लागार म्हणून टीम इंडियासोबत आहेत. खरं तर ऑस्ट्रेलिया हा देश तसा सुरक्षित मानला जातो. पण येत्या काळात भारतीय संघ मायदेशात ट्वेन्टी20 विश्वचषकात खेळणार असून त्यानंतर बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशातील तणावाची परिस्थिती पाहता, बीसीसीआयनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं आधीपासूनच तयारीवर भर दिला आहे. त्यामुळंच सिसोदिया यांची नियुक्ती झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय.
20- 'वर्देंची' फेम अक्षय वर्देंच्या बाईक शॉपमध्ये चोरी
अभिनेत्री समीरा रेड्डीचा पती, वर्देंची मोटरसायकलचा जनक अक्षय वर्दे यांच्या बाईक शोरुममध्ये चोरीची घटना घडली आहे. वांद्र्याच्या पाली हिल भागात असलेल्या ‘वर्देंची’ शोरुममध्ये शनिवारी रात्री चोरी झाली. सुदैवाने वर्दे यांचं मोठं नुकसान झालं नाही. तीन अज्ञात चोरांनी शनिवारी रात्री 2 वाजता वर्देंची शोरुममध्ये प्रवेश मिळवला. सुदैवाने दोन लेदर जॅकेट्स आणि दोन सेलफोन व्यतिरिक्त फारसा मुद्देमाल हाती लागला नाही. मात्र दुकानात मोठी रोकड असल्याची माहिती चोरांना मिळाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 44 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचं म्हटलं जात आहे. शोरुमच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यांनी कुटुंबीयांना याची माहिती दिल्यावर समीराची आई नक्षत्रा यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी दूर अंतरावरील सीसीटीव्ही फूटेज तपासलं असूनतीन चोर कॅमेरात कैद झाले आहेत.
21- आमिरचं राहणार ‘अतुल्य भारत’चा ब्रँड अॅम्बेसेडर
असहिष्णुता वादावर जाहीर भाष्य करणं अभिनेता आमिर खानला भोवलं की काय अशी शक्यता निर्माण झालीये. कारण, ‘अतुल्य भारत’ च्या जाहिरातीतून आमिरला वगळ्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, पर्यटन मंत्रालयाने आमिर खानचं ब्रँड अॅम्बेसेडर असणार आहे असं स्पष्ट केलंय. भारतात अलीकडे असहिष्णुता वाढलीये. त्यामुळे देशात राहण्यास भीती वाटतेय. पत्नी किरणने आपल्याला देश सोडण्याचा सल्ला दिला होता असं वक्तव्य आमिर खानने एका पुरस्कार सोहळ्यात केलं होतं. आमिर खानच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. भाजपच्या नेत्यांनी आमिरवर एकच टीकास्त्र सोडलं. आमिरनेही आपण जे बोललो त्यात काही चुकीचं नाही आणि माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका मांडली होती. हा वाद शमल्यानंतर आता ‘अतुल्य भारत’च्या जाहिरातीत आमिर खान दिसणार नाही. तो ‘अतुल्य भारत’चा ब्रँड अॅम्बेसेडर असणार नाही असं केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून सांगण्यात येत होतं. जाहिरातीचा करार आधीच रद्द करण्याची हालचाल सुरू झाली होती. पण आता पर्यटन मंत्रालयानं आमिर खानचा जाहिरातीचा करार रद्द केला नाही. तो या पुढेही अॅम्बेसेडर असणार आहे असं स्पष्ट केलंय.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
22- उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर
http://goo.gl/G3NA2a
~~~~~~~~~~~~~~~
23- मुखेड येथे दर्पण दिनानिमित्य आजी-माजी आमदार तर्फे पत्रकारांचा सन्मान
http://goo.gl/sYJMh6
~~~~~~~~~~~~~~~
24- फोनवर बोलताना नदीत पडून मुलीचा मृत्यू - व्हिडीओ
http://goo.gl/Bzerxt
~~~~~~~~~~~~~~~
25- पाणी हे मूल्यवान असून त्याचा काटकसरीने वापर करावा - सौ.वर्षाताई भोसीकर
http://goo.gl/VVi5uV
~~~~~~~~~~~~~~~
26- पत्रकार दिनानिमित्त पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया यांची पत्रकार परिषद संपन्न
http://goo.gl/VmJ5Gr
~~~~~~~~~~~~~~~
27- नांदेड पोलीसातील महिला रेणुका देवणेने जिंकले दुसरे सुवर्ण पदक
http://goo.gl/2rcF2l
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचं असेल तर स्वतःचेच तेज निर्माण करता आले पाहिजे
[अविनाश पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment