Wednesday, 27 January 2016

मरीन ड्राईव्हला पुन्हा सोनेरी झळाळी, पिवळे LED बसवण्याचं काम सुरु




मुंबई: मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेसची सोनेरी झळाळी अखेर आजपासून परतण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर पालिकेने पुन्हा पिवळे एलईडी दिवे बसविण्याचं काम सुरु केलं आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर मरीन ड्राईव्हवर पुन्हा पिवळे दिवे बसविण्यासाठी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना 26 जानेवारीपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा पायउतार होण्याची मागणी करण्यात आली होती. EESL आणि महापालिका आयुक्तांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

दरम्यान, नरिमन पॉईंट ते पोलीस जिमखान्यापर्यंत पिवळे LED दिवे बसविण्यात आले असून. उर्वरित, पिवळे दिवे आज रात्री 12 वाजल्यापासून बसविण्यात येणार आहेत.

No comments: