मुखेड अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अँड.शिवराज पाटील तर उपाध्यक्षपदी अँड.अस्लम शेख यांची निवड "
मुखेड :- रियाज शेख
मुखेड तालुका अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अँड.शिवराज पाटील कुंद्राळकर, उपाध्यक्षपदी अँड.अस्लम शेख वडगावकर तर सचिवपदी बाबुराव जाधव होनवडजकर यांची निवड करण्यात आली. अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी अँड.रहिम खान यांनी दिली.
मुखेड अभिवक्ता संघाचे मावळते अध्यक्ष अँड.प्रकाश आचमारे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे अभिवक्ता संघाची सन 2016-17 या वर्षाची नुतन कार्यकारिणीची निवडणुक 5 जानेवारी रोजी घेण्यात आली. यामध्ये मुखेड अभिवक्ता संघाच्या तालुका अध्यक्षपदी अँड. शिवराज पाटील कुंद्राळकर व सचिवपदी अँड. बाबुराव जाधव होनवडजकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदासाठी निवडणुक घेण्यात आली. सदर पदासाठी अँड.असलम शेख आणि अँड. भाग्यश्री कासले हे दोन उमेदवार रिंगणात होते. एकुण 35 मतदारांपैकी 33 मतदातांनी मतदान केले. ज्यामध्ये अँड. कासले यांना 2 मते पडली तर असलम शेख यांना 31 मते मिळुन त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नुतन कार्यकारिणीची निवड निवडणुक निर्णय अधिकारी अँड रहिम खान यांनी केली. यावेळी मावळते अध्यक्ष आचमारे यांनी आपल्या मागील एक वर्षाच्या कार्याची माहीती दिली. नुतन कार्यकारिणीचे न्यायाधीश मोहम्मद एजाज , न्यायाधीश विनोद पाटील सह सर्व अभिवक्त्यांनी अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment