[अंतरराष्ट्रीय]
१- मोदी परतताच शरीफांच्या घरी दाऊदचं स्वागत
भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिमबाबत एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या लग्नात दाऊदने हजेरी लावली होती. खास गोष्ट म्हणजे बरोबर एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी देखील शरीफ यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. मुंबईतील वरिष्ठ पत्रकार बलजीत परमार यांनी हा दावा केला आहे. 26 डिसेंबरला दाऊद हा लाहोर शहरात होता. फक्त शहरातच नव्हे तर रायविंड पॅलेसमध्ये शरीफ यांच्या नातीच्या लग्नासाठी संपूर्ण कुटुंबियांसह पोहचला होता. या लग्नात भारताचा एक मोठा व्यापारी आणि मुंबईतील काही लोकही उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे तेच पत्रकार आहेत ज्यांनी 80च्या दशकात दुबईत दाऊदची दोनदा भेट घेतल्याचा दावा केला होता. एकीकडे पंतप्रधान मोदींनी मैत्री निभविण्याचा प्रयत्न करीत अफगाणिस्तानहून परततना पाकिस्तानात जाऊन शरीफ यांची भेट घेतली होती. शरीफ यांची नात मेहरुन्निसा उर्फ माहनूर सफदरला आशीर्वाद देत, भेटवस्तूही दिल्या होत्या. एकीकडे भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखविणाऱ्या शरीफांच्या नातीच्या लग्नात दाऊदने उपस्थिती लावल्याच्या दावा करण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
२- पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनू शकतं – ओबामा
पाकिस्तान, अफगाणिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये पुढची काही दशके अस्थिरता कायम राहील. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान भविष्यात दहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण बनू शकतं, आशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बुधवारी पाकिस्तानवर ताशेरे ओढले. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून बराक ओबामा यांनी आज (बुधवारी) आपलं शेवटचं भाषण केलं. ‘स्टेट ऑफ द युनियन अड्रेस’ म्हणून संबोधल्या जाणार्या या भाषणात ओबामा यांनी अमेरिका आणि जगातील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच, दहशतवादापासून अमेरिकेला असलेल्या धोक्याकडे लक्ष वेधलं. अल कायदा आणि इसिस या दोन्ही संघटना आपल्या लोकांना थेट धोका निर्माण करीत आहेत. कारण आजच्या जगामध्ये ज्यांना स्वत:सह इतर मानवी जीवांची कसलीही किंमत नाही ते खूप नुकसान करू शकतात. इसिस संघटना नसती तरी, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि अन्य काही देशांमध्ये अजून काही वर्षं अस्थिरता कायम राहिली असती. पाकिस्तान, अफगाणिस्तान हे भाग अतिरेक्यांसाठी सुरक्षित ठिकाण बनू शकतं, या धोक्याकडेही ओबामांनी लक्ष वेधलं.
३- फेसबुकचा वर्धापनदिन फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा करा : मार्क
फेसबुकचा बारावा वर्धापनदिन म्हणजेच 4 फेब्रुवारी हा दिवस फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा करा, असं आवाहन फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने 150 कोटी फेसबुक यूझर्सना केलं आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभरात फ्रेण्डशिप डे म्हणून साजरा केला जातो. मात्र अनेकांचे दुरावलेले मैत्र पुन्हा जोडणारा आणि नवीन मित्र-मैत्रिणी शोधण्यास महत्त्वपूर्ण असणाऱ्या फेसबुकचा फाऊण्डेशन डे मैत्रीदिन म्हणून साजरा व्हावा अशी झुकरबर्गची इच्छा आहे. जानेवारी 2004 मध्ये मार्क झुकरबर्गने त्याच्या कॉलेज विद्यार्थ्यांना जोडणारी यंत्रणा म्हणून फेसबुकचं कोडिंग केलं. मात्र 12 वर्षांमध्ये मित्र आणि आप्तांशी कनेक्टेड राहण्यासाठी जगभरातील अब्जावधी नागरिकांनी फेसबुकला जवळ केलं. ‘4 फेब्रुवारीला तुम्ही #friendsday सेलिब्रेट करण्यासाठी मला जॉईन व्हाल, अशी आशा आहे’ असं मार्कने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘जर तुमच्या मैत्रीची काही कथा असेल, तर मला कळवा. मला शक्य होईल तितके किस्से वाचायला आवडतील’ असंही मार्क म्हणतो.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- शिवसेनेत जाणार नाही, छगन भुजबळांनी केलं स्पष्ट
‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यासंबंधीचं पत्र हे भुजबळांना नाही तर अधिकाऱ्यांना क्लीन चिट देणारं आहे.’ असं स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. शिवसेनेच्या संजय राऊतांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घोटाळ्याची चौकशी सुरु असताना काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्यानं कोणताही घोटाळा न झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर राऊतांनी लिहिलेल्या पत्रानं पुन्हा एकदा खल माजला आहे. या पत्रानंतर सेना आता बचावाच्या भूमिकेत गेली असली तरी यामुळे भुजबळ पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहेत. संजय राऊत यांचं पत्र हे अन्यायाचा खुलासा करणारं आहे. अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
५- ‘त्या’ मुलीला रोखणार्या पुणे एटीएस पथकाला इसिसकडून धमकी
पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांना सीरियातील दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकी मिळाली. मुंबई पोलिसांना हा धमकीचा ई-मेल आलाय. त्यात पुणे एटीएस युनिट आणि भानुप्रताप बर्गे यांच्या कुटुंबीयांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी हा ईमेल नेमका कुठून आलाय. त्याचा तपास सुरू केला आहे. भानू प्रताप बर्गे यांच्या टीमने मागील महिन्यात एका अल्पवयीन मुलीला इसिसमध्ये जाण्यापासून थांबवलं होतं. पुण्यातील एक 16 वर्षांची मुलगी इसिसच्या संपर्कात असल्याचं गुप्तचर यंत्रणेच्या तपासातून समोर आलं होतं. सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून या मुलीशी संपर्क साधण्यात आला होता. एवढंच नाहीतर या मुलीला सुसाईड बॉम्बरही बनवण्याचा प्लॅन आखाण्यात आला होता. ही माहिती बर्गे यांच्या टीमला कळताच या मुलीला ताब्यात घेऊन तिचं मतपरिवर्तन केलं होतं. त्यानंतर या मुलीने इसिसचा मार्ग सोडला होता. तोच राग मनात धरुन बर्गेंना ही धमकी देण्यात आलीय का याचाही तपास केला जातोय.
६- लष्कर कुठल्याही मोहिमेसाठी सज्ज - लष्करप्रमुख सुहाग
ज्यांनी भारताला वेदना दिल्या, त्यांनाही तशाच वेदना झाल्या पाहिजेत. वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवू, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर सोमवारी म्हणाले होते. त्यांनी पाकिस्तानला नाव न घेता हा अप्रत्यक्ष इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी बुधवारी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मात्र लष्कर कुठलीही मोहिम पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे सूचक वक्तव्य केले. पठाणकोट हल्ल्यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सुहाग म्हणाले की, अतिरेक्यांविरुध्द कारवाई सुरु असताना समन्वयाचा मुद्दा नव्हता. सर्व यंत्रणांमध्ये समन्वय होता असे त्यांनी सांगितले. पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर घुसलेल्या सहा अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय सुरक्षापथकांना तीन दिवस लागल्याने सरकारवर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी समन्वयाच्या अभावाचा मुद्दा खोडून काढला. अतिरेकी ज्या इमारतीमध्ये होते त्या इमारतीमध्ये दोन सैनिक होते. सर्वप्रथम त्या सैनिकांना सुरक्षित बाहेर काढणे आवश्यक होते. ही कारवाई सोपी नव्हती. जिवीतहानी टाळण्यासाठी आम्ही वेळ घेतला असे सुहाग यांनी सांगितले.
७- पठाणकोट दहशतवादी हल्ला - पाकिस्तान त्यांची एक चौकशी समिती भारतात पाठवणार
८- अहमदाबाद - पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांना स्थानिक न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
९- आज पासून पंतप्रधान पीकविमा योजना सुरु करणार आहे - राजनाथ सिंह, केंद्रिय मंत्री
१०- मद्याच्या पॅकिंगसाठी फक्त काचेच्या बाटल्या वापरा, राज्यात टेट्रा पॅकचा वापर करण्यास बंदी - पर्यावरण रक्षणासाठी शासनाचा निर्णय
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- बेळगावात 'मराठी टायगर्स' सिनेमा बंद पाडण्याची धमकी
येळ्ळूरमध्ये 25 जुलै 2014 रोजी मराठी भाषिकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारावर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. अमोल कोल्हेची प्रमुख भूमिका असलेला ‘मराठी टायगर्स’ फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रासह बेळगावातही प्रदर्शित होत आहे. हे कमी म्हणून की काय आज पोलिस उपायुक्त अनुपम अगरवाल यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची बैठक घेऊन शहरातील शांततेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य केले जाऊ नये, असं ताकीदच दिली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाविषयी चर्चा सुरु आहे. सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी कोणतंही मत प्रदर्शन करु नये, तसंच चित्रपट प्रदर्शित झाला म्हणून आनंदोत्सव करुन दुसऱ्या बाजूच्या भावना दुखवू नये, असं आवाहनही अनुपम अगरवाल यांनी केलं आहे.
१२- क्लीन चिट भुजबळांना नव्हे, तर अधिकाऱ्यांना: संजय राऊत
छगन भुजबळ शिवसेनेत परतणार या बातमीने राजकीय वातावरण चांगलेच तापले. पण चर्चेला खुद्द छगन भुजबळ यांनी पूर्णविराम दिलाय. शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यासोबत चर्चा झालेली नसून आपण शिवसेनेत जाणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. तसंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडल्याबद्दल त्यांचे आभारही भुजबळांनी मानले. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळांची बाजू घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. भुजबळ आणि अधिकार्यांवर झालेले आरोप घिसाडघाईने झाले आहे. अँटी करप्शन विभागाने कोणताही नीट अभ्यास न करता गुन्हे दाखल केले असं निदर्शनास आलं. त्यामुळे निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये असा सल्ला राऊत यांनी दिला होता. संजय राऊत यांच्या पत्रामुळे भुजबळांची घरवापसी होते की काय ?, या चर्चेला उधाण आलं. भुजबळांची चौकशी सुरू आहे पण राष्ट्रवादी खंबीरपणे पाठीशी उभी नाही अशी भावना भुजबळांची आहे. नाशिकमध्येही भुजबळांवर होत असलेल्या कारवाईमुळे तीव्र नाराजी आहे. त्यामुळे भुजबळ सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण, खुद्द भुजबळ यांनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय. आपण शिवसेनेत जाणार नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलं. शिवसेनेकडून असा कोणताही प्रस्ताव नाही. सेनेच्या कोणत्याही नेत्यांसोबत चर्चा झाले नाही असंही भुजबळ म्हणाले. परंतु, नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नाराजी सर्व काही सांगून जात आहे.
१३- 'म्हाडा' करतंय सर्वसामान्यांची फसवणूक
सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा दरांत घरं उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'म्हाडा'च आता ग्राहकांना चुना लावत असल्याचं समोर येतंय. 'सकाळ' या वर्तमानपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, विरारमधील 'अल्प उत्पन्न' गटातील ३३० चौरस फूट (कार्पेट एरिया) घरांसाठी ग्राहकांकडून ६५२ चौ. फुटांची (बिल्टअप) किंमत वसूल केली जातेय.
म्हाडानं विरार - ३७५५, बाळकुम ठाणे - १९, मिरा रोड - ३१०, कावसेर ठाणे - १६४ तर वेंगुर्ला - २७ घरांची विक्री जाहीर केलीय. यासाठी १३ जानेवारीपासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. परंतु, लॉटरीत विजेत्या ठरलेल्या ग्राहकांची घोर फसवणूक होण्याची चिन्हं आहेत.
म्हाडानं दिलेल्या घरांच्या माहितीत कार्पेट एरियाच्या तुलनेत बिल्टअप एरियामध्ये दुप्पट वाढ करून दाखवण्यात आलीय. इमारत बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बिल्टअप एरियानुसार घराची किंमत निश्चित केली जाते.
- विरारच्या मेगा प्रकल्पात अल्प उत्पन्न गटातील घराचं चटई क्षेत्रफळ हे ३०.६८ चौ. मीटर (३३० चौरस फूट) तर बिल्टअप एरिया ६०.६४ चौ. मीटर (६५२ चौ. फूट) दाखवण्यात आलेत.
- ठाण्यातील कावेसरमध्ये घराचं चटई क्षेत्रफळ ३४.८० चौ. मीटर (३७४ चौ. फूट) तर बिल्टअप एरिया ६२.६७ चौ. मीटर (६७४ चौ. फूट) दाखवण्यात आलाय.
नियमाप्रमाणे कार्पेट एरियाच्या तुलनेत २० ते ३० टक्के जास्त बिल्टअप एरिया अपेक्षित असतो; पण या दोन्ही प्रकल्पांत ८० ते १०० टक्के बिल्टअप एरिया विजेत्यांच्या माथी मारला जाणार आहे.
१४- प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेडमध्ये महाराष्ट्रातील 25 NCC कॅडेट्स
प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 25 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. तर 28 जानेवारीला होणाऱ्या पंतप्रधान रॅलीमध्ये मानवंदना देण्यासाठी राज्यातील 9 कॅडेट्स सहभागी होणार आहेत. राजपथावरील पथसंचलनात देशभरातील 296 एनएसएस कॅडेट्स सहभागी होणार आहेत. यासाठी राज्यातील निवड झालेल्या 25 कॅडेट्समधे 15 मुलं तर 10 मुलींचा समावेश आहे. तर पंतप्रधान रॅलीत मानवंदना देण्यासाठी निवड झालेल्या 9 कॅडेट्समध्ये 6 मुलं आणि 3 मुलींचा समावेश आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- मुळा-मुठा नदी शुद्धीकरणासाठी जपानच्या जायका कंपनीसोबत ९०० कोटींचा करार - केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर
गंगा नदीच्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या स्वच्छतेचा विडा केंद्र सरकारनं उचलला आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं जपानच्या जायका (जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) कंपनीसोबत करारही केला आहे.एकूण 990 कोटींच्या या करारात 85 टक्के वाटा हा केंद्राचा, तर 15 टक्के वाटा पुणे महापालिकेचा असेल. पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. येत्या 6 वर्षात म्हणजे 2022 पर्यंत स्वच्छतेचं हे काम पूर्ण होऊन मुळा-मुठा प्रदूषणविरहीत होईल, अशी ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. या करारांतर्गत 11 नवे मलनिस्सारण प्रकल्प उभे केले जाणार आहेत. यामुळं नदीचं प्रदूषण रोखण्याससाठी मोठी मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळानं देशातल्या 302 प्रदूषित नद्यांची यादी बनवली आहे. या यादीत पुण्यातील मुळा-मुठेचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेअंतर्गत (एनआरसीपी) महाराष्ट्र सरकाकरने या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रस्ताव पाठवला होता.
१६- पाकिस्तानी प्रियकरासाठी यूपीच्या तरुणाचं लिंगपरिवर्तन
पाकिस्तानातल्या प्रियकरासाठी उत्तर प्रदेशातल्या एका तरुणानं चक्क आपलं लिंगपरिवर्तन केलं आहे. कथक नर्तक असणाऱ्या या तरुणाचं नाव गौरव शर्मा असं आहे.५ वर्षांपूर्वी गौरवची फेसबूक आणि स्काईप सारख्या सोशल माध्यमांद्वारे पाकिस्तानच्या रिजवानशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर पुढे प्रेमातही झालं. त्यानंतर रिझवाननं गौरवला लग्नाची मागणी घातली आणि गौरवनं त्यानंतर शस्त्रक्रियाद्वारे लिंगपरिवर्तन करुन या मागणीस होकारही दिला.
१७- जळगाव - भूसावळमधील नाहता चौकात अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या गोळीबारात १ जण गंभीर जखमी
१८- यवतमाळ; कचरा उचलून उपजीविका करणारा बॉडी बिल्डर
राज्यभरात ‘महाराष्ट्र केसरी’ची चर्चा सुरू असतानाच, तिकडे यवतमाळच्या एका तरुणाने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत लौकिकास्पद यश मिळवलं आहे. नगर परिषदेत घंटागाडी चालवून उपजीविका करणाऱ्या एका दिनेश राजूरकरने विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत बाजी मारली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये झालेल्या विदर्भ स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत 60 किलो वजनी गटात त्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे. 30 वर्षीय दिनेशला लहानपणापासूनच बॉडी बिल्डिंगची आवड होती. त्यामुळे या क्षेत्रात यश मिळवण्याचं ध्येय दिनेशचं होतं. दहावी शिकलेला दिनेश गेल्या 7 वर्षांपासून पिळदार शरीर बनवण्यासाठी मेहनत घेतो आहे. शहरात घंटागाडी चालवून शहर स्वछता करता करता, दिनेशने स्वत:चे शरीर पिळदार बनवून शरीर सौष्टवसारख्या विदर्भ स्तरीय स्पर्धेत बाजी मारली.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- 'कॉमेडी नाईट्'स मधील पलकला बेड्या, जेलमध्ये रवानगी
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’मध्ये पलकची भूमिका साकारणारा अभिनेता किकू शारदाला अटक करण्यात आली आहे. डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची मिमिक्री करण्याच्या आरोपाखाली किकूला अटक करून, त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे.कॅथल पोलिसांनी आज सकाळीच कीकूला मुंबईत अटक केली. त्यानंतर त्याला चंदीगडमधील कोर्टात हजर केलं. कोर्टाने किकूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किकूविरोधात कलम 295 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमध्ये किकूने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांची मिमिक्री केल्याचा आरोप आहे. किकूने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. “जर माझ्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल, तर मी हात जोडून माफी मागतो”, असं किकूने म्हटलं आहे.
अटकेची निंदा
दरम्यान, अभिनेता रझा मुराद यांनी किकूच्या अटकेबद्दल निंदा व्यक्त केली आहे. जर किकूने माफी मागितली असेल, तर त्याला अटक का?, असा सवाल रझा मुराद यांनी विचारला आहे.याशिवाय कॉमेडीयननी संयम राखावा असंही, मुराद यांनी म्हटलं आहे.
२०- रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करु नका: सचिन तेंडुलकर
मुंबई: ‘रेल्वच्या टपावर बसून प्रवास करु नका’ असं आवाहन आता खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं प्रवाशांना केलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान सचिन बोलत होता. मुंबईत लोकल प्रवासाच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी जीवाची पर्वा न करता थेट लोकलच्या टपावरुन प्रवास करतात. त्यामुळे आजवर हजारो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामुळेच आता खुद्द सचिननं लोकल प्रवाशांना आपला जीव धोक्यात न घालण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईती रेल्वे पोलिसांच्या वतीनं रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षा यासाठी दोन वेगवेगळ्या योजनांचे अनावरण सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. ‘समिप’ आणि ‘बी-सेफ’ अशी या योजनांची नावे आहेत. या योजनांमधून प्रवाशांसाठी सुविधा आणि सुरक्षा यावर भर देण्यात आहे.
२१- श्री-जान्हवीची जोडी येणार परत
श्री-जान्हवीच्या मुलीच्या बारशाने ‘होणार सून मी या घरची…’ या मालिकेचा समारोप 23 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे ‘कला कायमची गप्प बसणार’ असं अनेकांना वाटत होतं. मात्र, ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळीनीं एका दैनिकाला ही माहिती दिली आहे. अवघ्या काही महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आपलं गारुड निर्माण केलं होतं. राज्यातल्या प्रत्येक घरात श्री-जान्हवीचा वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला होता. अखेर साडे-सातशे भागांचा टप्पा पार केल्यानंतर जान्हवीच्या बाळाच्या जन्माच्या आनंदी नोटवर ही मालिका संपणार आहे. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आगामी काळात जान्हवीच्या बाळाची वेगळी कथाही प्रेक्षकांना पहायला मिळू शकेल असं दिग्दर्शक देवस्थळी यांनी स्पष्ट केलं आहे. जर प्रेक्षकांची इच्छा असल्यास या मालिकेचा सिक्वेल सुरु करण्याचा विचार केला जाईल असं दिग्दर्शक मंदार देवस्थळीनं सांगितलं. चटपटीत संवाद, उत्कंठा वाढवणारं कथानक, सर्वच कलाकारांचा सहज अभिनय यामुळे प्रेक्षकांना मालिकेने आपलंसं केलं. मालिकेने नुकताच 750 भागांचा टप्पाही पार केला होता. झी मराठी अवॉर्डमध्ये अनेक पुरस्कार पटकावत प्रेक्षकांच्या पसंतीची पावतीही मालिकेने मिळवली. या संकल्पनेवरुन हिंदीत सतरंगी ससुराल अशी मालिकाही तयार करण्यात आली.
२२- अभिनेत्री डायना हेडन झाली 'मॅजिक' आई
आठ वर्षांपूर्वी जतन करून ठेवलेल्या बीजामधून डायना हेडन हिला अपत्य प्राप्ती झाली. मातृसौख्य लाभल्याने विश्वसुंदरी आनंदीत आहे. ८ वर्षांपासून जतन करून ठेवलेल्या स्त्रीबिजातून ४२ वर्षीय माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री डायना हेडन हिला मुलगी झाली आहे. तिचं नाव 'आर्या' असं ठेवण्यात आलंय. करिअर करण्यामध्ये व्यस्त असल्यानं आणि लवकर लग्न करण्याची इच्छा नसल्यानं २००७-२००८ च्या दरम्यान डायना हेडननं आपले स्त्रीबीज डॉ नंदीता पालशेतकर यांच्या सहाय्यानं फ्रिजींग करून ठेवले होते. कारण वय वाढेल तसं महिलांमधील स्त्रीबीजाचे प्रमाण कमी होत जाते. यामुळं चाळीशीनंतर अपत्यप्राप्ती होण्यात मर्यादा पडतात. दोन वर्षापूर्वी अमेरिकन नागरिक कॉलीन डिक याच्याशी डायनानं लग्न केल्यानंतर तिनं अपत्यप्राप्तीचा निर्णय घेतला. यावेळी तिच्या मदतीला आले ते ८ वर्षांपासून जतन करून ठेवलेले स्त्रीबीज. डॉ नंदिता पालशेतकर यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालंय.
२३- हृतिक रोशनमुळे हॉटेलला 25 हजार रुपयांचा दंड
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनमुळे एका हॉटेलला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वरळीच्या फोर सीझन्स हॉटेलमध्ये हृतिक मित्रांसह त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत होता. म्युझिकचा मोठ्या आवाजामुळे स्थानिकांनी पहिल्यांदा रात्री 1.30 वाजता पोलिसांत तक्रार केली. मात्र तरीही कारवाई न झाल्याने स्थानिकांनी रात्री 3.30 वाजता पुन्हा तक्रार केल्यानंतर मोठ्या आवाजातील गाणी बंद झाली. मागील शनिवारी फोर सीझन्स हॉटेलमध्ये होत असलेल्या पार्टीत मोठ्या आवाजात गाणी सुरु होती. याबाबत एका नागरिकाने तक्रार केली तेव्हा समजलं की हॉटेलकडे रात्री उशिरापर्यंत मोठ्याने गाणी लावण्याचा परवाना नाही.
या पार्टीमुळे हॉटेल मॅनेजरवर एकाच रात्री दोन वेळा दंड ठोठावण्यात आला आणि तेव्हा कुठे रात्री 3.30 वाजता म्युझिक बंद झालं. ही पार्टी हॉटेलच्या 34 व्या मजल्याच्या रुफ टॉपवर बनलेल्या एईआर लाऊंजवर सुरु होते. पार्टीत अनेक सेलिब्रिटीज सामील झाले होते. त्यामुळे हॉटेलबाहेर पार्क केलेल्या त्यांच्या गाड्यांमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालं होतं. दक्षिण मुंबईचा रहिवासी अशरफ खानने लाऊड म्युझिक संदर्भात दोन वेळा तक्रार केली. त्यामुळे हॉटेल मॅनेजरला दोन्ही वेळी प्रत्येकी 12,500 असा एकूण 25 हजार रुपयांचा दंड भरावा लागला.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२४- लोहा; विहिरीत पडलेल्या काळविटाचे वनरक्षकाने वाचवले प्राण
http://goo.gl/QVvkdu
~~~~~~~~~~~~~~~
२५- मुक्रमाबाद मराठी पञकार संघाच्या वार्षिक दिनदर्शीकेचे प्रकाशन
http://goo.gl/5rqAm8
~~~~~~~~~~~~~~~
२६- आधारक्रमांक न दिल्यास धान्यपुरवठा बंद - तहसीलदार सुरेश घोळवे, आधार नसणारे होणार 'निराधार'
http://goo.gl/yvKrUd
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आई शिक्षित असो वा अशिक्षित, जेंव्हा तुम्ही अपयशी होता तेंव्हा तिच्या सारखा मार्गदर्शक दुसरा शोधून सापडणार नाही
[सिद्धार्थ बहात्रे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
सजवा आपले घर...निरंतर....!
घरांची आर्टिफिशिअल सजावट
५०० पेक्षा जास्त प्रकारामध्ये उपलब्ध
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
आता नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment