नाशिक : नाशिक जिल्ह्यातल्या कसबे सुकेणे भागात यंदा नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या भागात फक्त 3.2 अंश तापमान नोंदवलं गेलं आहे.
कसबे सुकेणे हा भाग गोदावरी-बाणगंगा-कादवा या तीन प्रमुख नदयांच्या खोऱ्यात आहे. त्यामुळे या बागायती बेल्टमध्ये पारा काश्मीरप्रमाणे घसरतो.नीचांकी तापमानामुळे पुदिन्याच्या पानावरील दवबिंदू गोठल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. 2012 नंतर चार वर्षांनी पुन्हा पानांवर दव गोठले आहेत.
नाशिककर थंडीने गारठले असून नाशकात 6.4 तर निफाडमध्ये 5 अंश तापमानाची नोंद झाली आहे.


No comments:
Post a Comment