चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविणार असून संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या चित्रपटानंतर मुन्नाभाई मालिकेतील आगामी चित्रपट करण्याचा इरादा आहे. मुन्नाभाई मालिकेतील पुढच्या चित्रपटासाठी कथा मिळाली असली तरी त्यावर काम व्हायचे बाकी आहे, असे राजकुमार हिरानी यांनी सांगितले. ‘साला खडूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपूरभेटीवर आलेले राजकुमार हिरानी आणि अभिनेत्री रितिका सिंह यांनी ‘लोकमत भवन’ला भेट देऊन संपादकीय सहका-यांशी केलेली बातचीत..
चित्रपटाचे शीर्षक ‘साला खडूस’ आहे. त्याबाबत काय सांगाल?
राजकुमार हिरानी : चित्रपट पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, हे शीर्षक किती योग्य आहे? प्रत्येकाच्या आयुष्यात ‘साला खडूस’ अशी व्यक्ती कधी ना कधी येत असते. तथापि, खडूस असला तरी आपल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याकामी या व्यक्तीची भूमिका मात्र महत्त्वाची असते. गुरु आणि शिष्य यांच्या दरम्यानच्या ‘टशन’ची ही कथा आहे.

No comments:
Post a Comment