वाराणसी : उत्साहाच्या भरात कोण काय घोषणा देतील याचा नेम नाही. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील आमदार लक्ष्मण आचार्य यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ‘गणतंत्र दिवस अमर रहे’च्या घोषणा दिल्या.
रवींद्रपुरी परिसरातील भाजप जनसंपर्क कार्यालयात ही घटना घडली. ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर लक्ष्मण आचार्य यांनी गणतंत्र दिवस अमर रहे अशा चुकीच्या घोषणा दिल्या.
विशेष म्हणजे हा विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभा क्षेत्रात येतो.

No comments:
Post a Comment