Saturday, 9 January 2016

नमस्कार लाईव्ह 09-01-2016 सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]


1- भारतीय लष्करांसोबत फ्रान्सचे लष्कर सुद्धा २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये भाग घेणार 
2- अफगाणिस्तानमधील भारतीय राजदूताजवळ स्फोटकांसह कार सापडली असून याप्रकरणी एकाला अटक 

3- येत्या काही दिवसातच आता मोटो डिव्हाईसवरील मोटोरोलाचं ब्रॅण्डिंनहीसं


येत्या काही दिवसातच आता मोटो डिव्हाईसवरील मोटोरोलाचं ब्रॅण्डिंग नाहीसं होणार आहे. चीनी टेक्नोलॉजी कंपनी लेनोव्होने 2014मध्ये गुगलकडून मोटाराला विकत घेतलं होतं. आता कंपनीने याला नवी ओळख देण्याची योजना तयार केली आहे. लवकरच हे डिव्हाईस मोटो बाय लेनोव्हो “Moto by Lenovo” नावाने बाजारात दिसेल. याबाबतची माहिती मोटोरोलाचे सीओओ रिक ऑस्ट्रेलोह यांनी केली. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, मोटोरोला ब्रॅण्ड पूर्णपणे संपविण्यात येणार नाही. लेनोव्हो याचा वापर कॉर्पोरेट कामामध्ये करीत राहिल.

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]

4- पंतप्रधानांची आज पठाणकोट हवाईतळाला भेट 



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दहशतवादी हल्ला झालेल्या पठाणकोट हवाईतळाला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजता मोदी पठाणकोटमध्ये दाखल होणार असल्याचीही माहिती मिळते आहे. 31 डिसेंबरच्या रात्री जवळपास 3 वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी पठाणकोट हवाईतळावर हल्ला केला. ग्रेनेड आणि लाईट मशिन गनच्या सहाय्याने हा हल्ला दहशतवाद्यांनी घडवून आणला. दहशतवाद्यांचा खात्मा करताना भारताचे सात जवांनांना वीरमरण आलं.

5- केंद्राची नवी पीक विमा योजना खरीप हंगामापासून अंमलात



केंद्र सरकार लवकरच देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी नवी पीक विमा योजना लागू करणार आहे. या नव्या योजनेत माफक प्रीमियम (विमा हफ्ता) आणि नुकसान भरपाईची पाहणी करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर या योजनेचं सादरीकरण केलं.
1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात ही नवी पीक विमा योजना अंमलात येईल तसंच त्याची प्रत्यक्षातील अंमलबजावणी ही खरीप हंगामापासून म्हणजे साधारणपणे जून महिन्यापासून होणार आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुष्काळ आणि नापिकीची झळ सोसणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांसाठी ही नवी पिक योजना म्हणजे एक वरदान असेल, यामुळे शेतीतली जोखीम बऱ्यापैकी कमी होईल, असा दावा केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केला आहे.

6- श्रीनगरः मेहबूबा मुफ्ती आज घेणार जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरूवारी निधन झाले.


~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]

7- MPSCसाठी खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादा वाढवा, नितेश राणे ‘सही मोहीम’ राबवणारराबवणार


राज्यात लाखोंच्या संख्येने तरुण-तरुणी ‘एमपीएसी’च्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनामध्ये संधी मिळवण्यासाठी दरवर्षी प्रयत्न करीत असतात. मात्र, ही परीक्षा देत असताना राज्य सरकारचा आत्ताचा जो काही आराखडा आहे, त्या आराखड्यानुसार खुल्या प्रवर्गातील मुलां-मुलींसाठी वयोमर्यादा कमी असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वाढवन द्यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे.


~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]

तहसील कार्यालयाचं वीज बिल भरण्यासाठी वसईत मनसेचं भीक मांगो आंदोलन


पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज वसईत अनोखं आंदोलन केलं. वीज बील न भरल्याने वसई तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्याच्या निषेधार्थ मनसेने भीक मांगो  आंदोलनं केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून भीक मागून तहसीलदारांना वीज बील भरण्यासाठी पैसे देण्यात येणार होते. कोट्यवधी रुपयांचा महसूल वसूल करणाऱ्या वसई तहसील कार्यालयाने जवळपास दोन वर्षांपासून दहा लाख रुपयांचं वीज बील भरलं नव्हतं. त्यामुळे महावितरणने 6 जानेवारीला खंडित केला होता. बील भरण्याची लेखी स्वरुपात हमी दिल्यानंतर 7 जानेवारीला महावितरणने वीज पुरवठा दुपारी सुरु केला.

9- क्षुल्लक कारणावरुन आईची गळा चिरुन हत्या




  • सांगली: क्षुल्लक कारणावरुन आईची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीतल्या बाजमध्ये घडली. किरण बडगे असं आरोपीचं नाव असून त्यांना वडील आणि आजीवरही प्राणघातक हल्ला केला. नंदाताई बडगे असं मृत महिलेचं नाव आहे.काल संध्याकाळी किरणनं हात-पाय धुतल्यानंतर टॉवेलनं पुसण्याऐवजी आईच्या कपड्यांना पुसले. त्यावेळी नंदाताई या किरणवर रागावल्या. तोच राग मनातिवारीन मध्यरात्री किरणनं आईची गळा चिरुन हत्या केली. तर वडील आणि आजीवरही हल्ला केलातिवारीच्यावर मिरजेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी किरण बडगेला जत पोलिसांनी अटक केली आहे.




[इतर]

14- शाहरुख, आमीरच्या सुरक्षेत कपात नाही : मुंबई पोलिस


मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, आमीर खान यांच्या सुरक्षेत कपात केल्याचं वृत्त मुंबई पोलिसांनी फेटाळलं आहे. फिल्मी कलाकारांना पुरवण्यात येत असलेल्या सुरक्षेत कोणतीही कपात केली नाही, असं मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

15- आता कुठल्याही लॅपटॉपला बनवा ‘टचस्क्रीन’





 जर तुमचा लॅपटॉप ‘टचस्क्रीन’ नसेल, तर पूर्ण लॅपटॉप बदलण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही घरच्या घरी तुमच्या लॅपटॉपला ‘टचस्क्रीन’ बनवू शकता. स्विडनस्थित एका कंपनीने ‘AirBar’ नावाचं एक डिव्हाईस तयार केलं आहे. या डिव्हाईसद्वारे टचस्क्रीन नसलेल्या लॅपटॉपलाही ‘टचस्क्रीन’ बनवू शकता. विशेष म्हणजे यासाठी लॅपटॉप बदलण्याची किंवा लॅपटॉपला सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जाण्याचीही गरज नाही. लॅपटॉपच्या यूएसबी पोर्टलला हे डिव्हाईस जोडून अगदी सोप्या पद्धतीने लॅपटॉपला टचस्क्रीन बनवू शकता. यूएसबी पोर्टलला कॉड जोडून त्यानंर हे डिव्हाईस लॅपटॉपच्या स्क्रीन खाली फिट करावी लागेल. त्यानंतर तुम्ही सर्वसाधारण लॅपटॉपही टचस्क्रीनने ऑपरेट करु शकता.

16- 'अॅप'डेट : डासांपासून बचावासाठी खास अॅप


जर तुम्हाला डासांचा प्रचंड त्रास होत असेल आणि वेगवेगळे उपाय करुनही डासांचा पिछा सुटत नसेल, तर तुमच्यासाठी एक खास अॅप आहे. ज्याद्वारे तुम्हा डासांना तुमच्यासापासून दूर ठेवू शकता. कधी हातांनी, तर कधी रुमालाने डासांना मारण्याचं बंद करुन आता थेट एका अॅपद्वारे तुम्ही डासांपासून स्वत:चा बचाव करु शकता. तुमच्या स्मार्टफोनवर ‘Hertzier’ नावाचं अॅप इन्स्टॉल करुन तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या डासांपासून तुमचं संरक्षण करु शकता. या अॅपमध्ये हाय-फ्रिक्वेन्सी आवाज बाहेर येतो, ज्यामुळे डास तुमच्यापासून दूर राहतात. या अॅपमध्ये काही साऊंड्स लॉक्ड केले गेले आहेत. मात्र, जर तुम्ही 60 रुपये देऊन हे अॅप खरेदी केलं, तर डासांपासून बचावासाठी आणखी वेगवेगळे आवाज तुम्हाला उपलब्ध होतील. या अॅपमध्ये डासांना पळवून लावण्यासाठी खास फ्रिक्वेन्सी आवाज असतो. विशेष म्हणजे हा आवाज युजर्सना ऐकायला येत नाही. विशेष म्हणजे या अॅपच्या मदतीने तुम्ही कुत्रा किंवा मांजरांनाही पळवून लावू शकता.
~~~~~~~~~~~~~~~
(सुविचार)

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. 

[सतिश लोटे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व

सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १४७५
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१४७५ ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: