Thursday, 14 January 2016

लोहा डाक कार्यालयात नामविस्तार दिन साजरा

नामविस्ताराच्या मागे क्रांतिकारी इतिहास आहे- आरविंद गवळे
======================

=======================
लोहा-(आईनाथ सोनकांबळे)

येथील डाक कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाळ आर्पण करुण बाविसावा नमविस्तार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आपल्या भाषनात अरविंद गवळे म्हणाले की,डॉ. बाबासाहेब म्हणाले होते.की
"जो समाजाचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडऊ शकत नाहि".नामविस्ताराच्या मागेही फार मोठा क्रांतिकारी इतिहास आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की "शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे ते जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही ."आपल्या पीड़ित समाजाला शिक्षण घेणे सोपे व्हावे म्हणून त्यांनी मुंबई,नागपुर,औरंगाबाद,येथे शाळा कॉलेज,हॉस्टेल सुरु केल्या कालांतराने औरंगाबाद येथे विद्यापीठ सुरु झाले.आणी नाव देण्यात आले.' मराठवाडा विद्यापीठ 'खरेतर ज्या महामानवाने आपल सार आयुष विधेसाठी अर्पण केल.त्यांच नांव विद्यापीठाला देने म्हणजे त्या विद्यापीठाचा गौरव करन्याजोगे होते.पण तसे झाले नाही.आणि संघर्षाला सुरुवात झाली.त्यात नांदेडचे गौतम वाघमारे,यांनी आत्मदहन केले तर मातंग समाजाच्या पोचीराम कांबळे यांना जीवंत जाळन्यात आले.शेवटि 14 जानेवारी 1994 ला शरद पवार यांनी नाविस्तार केला."डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ " तीळगुळ देउन ही गोड बातमी आंबेडकरी आनुयायांनी एकमेकांना सांगितली. संघर्षा शिवाय काहीही मिळाले नाही ...हा बहुजनांचा इतिहास आहे.तो नव पिढीला ज्ञात असावा म्हणून हा नामविस्तार दिन देशभरात साजरा करण्यात येतो आसे ते म्हणाले.यावेळी जेष्ठ पत्रकार शुरेश जोंधळे,सुभाष आंकलकोटे,
के एम माळी,पतेवार,जलाल पठान,अरविंद गवळे,शंकर गालफाडे,आईनाथ सोनकांबळे,जे आर कल्याणकर,देवानंद मलुलवार आदि कर्मच्यारी उपस्थित होते.
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा 

No comments: