श्रीक्षेत्र माळेगाव, मिडीया सेंटर,9- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहितीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रदर्शनातून आरोग्य माहितीच्या प्रदर्शनासह कलापथकाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे.
जनसेवा कलापथक पानभोसी ता.कंधार येथील शाहीर सिताराम जोंधळे आणि त्यांच्या संच माळेगाव यात्रेत आरोग्य आणि स्वच्छतेचा जागर घालत आहेत. नांदेड जिल्हयाने शौचालय बांधकामात राज्यात आघाडी घेतलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने राज्यात पहिले स्थान पटकाविले आहे. या सर्व कार्याचा गौरव या प्रदर्शनातून मांडण्यात आला आहे.
तुम्ही करु नका परिसर घाण, सारा गाव निर्मल ठेवा छान... , संत तुकडोजी सांगून गेले, गाडगेबाबांनी मार्ग दिले..., लक्ष देऊया - स्वच्छ ठेवूया - गावाला सुंदर ठेवूया... या गितांव्दारे भाविकांना मंत्रमुग्ध करत आहेत. स्त्रिभ्रूण हत्या, हुंडा बंदी, दारु बंदी, स्वच्छ भारत मिशन, राजीव गांधी जीवनदायी योजना, एड्स, कुपोषण, मुलींचे शिक्षण, पर्यावरण, बचतगट आदीं विषयांवर या स्टॉलमधून गितांव्दारे शाहीर सिताराम जोंधळेंसह केरबा गच्चे, नागेश गिरी, देविदास जाधव, भाऊसाहेब सिंगारपुतळे, जनार्दन साळवे आदी कलाकार यात्रेकरुंचे लक्ष वेधून प्रबोधन करत आहे.
No comments:
Post a Comment