[अंतरराष्ट्रीय]
१- पठाणकोट हल्ला - उच्चस्तरीय चौकशी नेमण्याची नवाझ शरीफ यांची घोषणा
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या सहभागासंदर्भात कारवाई करावी अशी मागणी भारताने केली त्याची सांगड १५ जानेवारी रोजी प्रस्तावित असलेल्या सचिवस्तरीय चर्चेशी जोडली, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जर पाकिस्तानने पठाणकोट हल्ल्यामागे असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही तर भारत पाकिस्तानमध्ये सचिवस्तरीय बोलणी होणार नाहीत असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दिला होता. पठाणकोट हल्ल्याशी सबंधित असल्यावरुन पाकिस्तानमध्ये काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचेही वृत्त आहे. या हल्ल्याच्या मूळाशी जाण्याचा शरीफ यांचा प्रयत्न असल्याचे पाकिस्तानमधल्या एका वृत्तपत्राने म्हटले आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- भारतावरील हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावेच लागतील - संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर
भारतावरील हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावेच लागतील, अशा कडक शब्दांत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बजावलं आहे. जे देशाला जखमा देत आहेत, त्यांना आता वेदना सहन कराव्याच लागतील असा इशारा पर्रिकरांनी दिला आहे. ‘देशाचे जवान जेव्हा शहिद होतात, तेव्हा खूप त्रास होतो. ज्या संघटना किंवा व्यक्ती आम्हाला त्रास देत आहेत, त्यांना आता याचे गंभीर परिणाम भोगण्यासाठी तयार रहावं लागेल.’ असा इशारा पर्रिकर यांनी दिला आहे. देशाने त्यांच्याविरोधात एकजुटीने उभं राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांना याचं सडेतोड उत्तर मिळणार, असंही पर्रिकर म्हणाले. पठाणकोट हल्ल्यात सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, मात्र देशाला सात जवान गमवावे लागले. हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ठोस पुरावे देत, जोपर्यंत पाक कुठलीही कारवाई करत नाही, तोपर्यंत चर्चा पुढे नेण्यास नकार दिला होता.
३- सबनीसांनी मॉर्निंग वॉकला जाऊन दाखवलं, सनातनला प्रत्युउत्तर
सबनीस मॉर्निंग वॉकला जात चला, अशी उघड धमकी देणार्या सनातन संस्थाला साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सडेतोड उत्तर दिलं. सबनीस यांनी पुण्यात मॉर्निंग वॉकला गेले. सबनीस यांना पाठिंबा देण्यासाठी आज (सोमवारी) पुण्यामध्ये सोशालिस्ट पार्टीनं मॉर्निंग वॉक केला. पुणे रेल्वे स्टेशनाजवळ गांधी पुतळा ते कलेक्टर कचेरी परिसरातला आंबेडकर पुतळा या मार्गावर या मॉर्निंग वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. श्रीपाल सबनीस हेही यामध्ये सहभागी झाले होते. सनातन संस्थेचे संजीव पुनाळेकर यांनी ट्विट करून ‘सबनीस मॉर्निंग वॉकला जात जा’ असा वादग्रस्त सल्ला दिला होता. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. त्याला उत्तर देत सबनीस मॉर्निंग वॉकला गेले. मी माझ्या विधानावर ठाम असून कुणाच्याही धमकीला घाबरत नाही असंही यावेळी सबनीस म्हणाले.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
४- नाशिक; गंभीर गुन्हे असलेल्या 12 मुलांचं बालसुधारगृहातून पलायन
नाशिकमधील बालसुधारगृहातून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 12 मुलांनी सोमवारी पहाटे पलायन केलं. विशेष म्हणजे सबजेलचा दर्जा असलेल्या या बालसुधारगृहाची गजं कापून, 16 फूट भिंतीवरुन चढून हे 12 आरोपी पळून गेले आणि जेल प्रशासनाला थांगपत्ताही लागला जुन्या सीबीएससमोर आणि शहराच्या अगदी मध्यवस्तीत असलेल्या या सुधारगृहात किशोरवयीन गुन्हेगारांना ठेवलं जातं. सबजेलचा दर्जा असल्यामुळे तिथली सुरक्षा जेलसारखीच कडेकोट असते. जेलला 16 फूट उंचीची भिंत बांधण्यात आली आहे. गुन्हेगारांना रात्री लॉकअपमध्ये ठेवलं जातं. इथेर रविवारी रात्री नेहमीप्रमाणेच सारं घडलं. मात्र पहाटे काही लॉपअपचे गज कापल्याचं सुरक्षारक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली आणि मुंबईतला 1, पुण्याचे 8, साताऱ्याचे 2 आणि इतर 1 असे एकूण 12 गुन्हेगार जेलमधून पळून गेल्याचं लक्षात आलं. 16 फुटांची भिंत चढण्यासाठी या गुन्हेगारांनी चादरींचा दोर केल्याचं उघड झालं.
५- शिवसैनिक रमेशने अतुल्य शौर्य दाखवलं: उद्धव ठाकरे
बँडस्टँडच्या समुद्रात दोन मुलींचा जीव वाचवताना मृत्यूमुखी पडलेल्या रमेश वळंजू यांच्यावरुन आता शिवसेना-भाजप श्रेयवादाची लढाई सुरु झाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वळंजू यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी रमेश यांच्या कुटुंबियांचं उद्धव ठाकरेंकडून सांत्वन करण्यात आलं. “मी आलो कारण माझं कर्तव्य आहे. श्रेयवादाचा प्रश्न माणुसकी सोडून आहे. शिवसैनिक कसा असावा यांचं मूर्तिमंत उदाहरण रमेश याने दाखवून दिले. शिवसेना वळंजू कुटुंबियांच्या पूर्णपणे पाठीशी आहे”, असं उद्धव ठाकरे “शिवसैनिकानं कसं असावं, याचा आदर्शच रमेशनं घालून दिला आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी वळंजू यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. देव करो, काही तरी चमत्कार व्हावा आणि रमेश परत घरी यावा अशी भावनाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
६- इतिहास घडला, शनी मंदिराच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला
अहमदनगर : शनी शिंगणापूरच्या भूमीत इतिहास घडला आहे. कारण शनी शिंगणापूर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. अनिता शेटे आता अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. तर उपाध्यक्षपदी नानासाहेब बानकर यांची निवड झाली आहे. महिलांच्या चौथऱ्याच्या प्रवेशावरून वाद ओढावल्याने शनी शिंगणापूर देवस्थान देशभरात चर्चेत आलं होतं. गेल्या महिन्यात एका महिलेनं बंदी असतानाही शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश केला होता. त्यानंतर पवित्र्य भंग पावल्याचा दावा करून पुजाऱ्यांनी शनीच्या शीळेवर अभिषेक घातला होता. महिलांना दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीमुळे राज्यभरातून मंदिर प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. त्याच पार्श्वभूमीवर झालेल्या विश्वस्तपदाच्या निवडणुकीमध्ये दोन महिलांनी अर्ज भरले होते. यंदा प्रथमच अनिता शेटे आणि शालीनी लांडे या दोन महिलांची विश्वस्तपदी निवड झाली होती. निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर आज अध्यक्षपदावरही अनिता शेटे यांची निवड झाली आहे. दरम्यान आता नव्या अध्यक्ष चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाची मुभा देणार का याकडे अवघ्या भक्तांचं लक्ष लागलं आहे. पण नियोजित अध्यक्षांनी मध्यंतरी एका वृत्तपत्राला मुलाखत देऊन, आपण परंपरांचा आदर केला पाहिजे असं म्हणत, आपल्या भूमिकेची कल्पना दिली होती.
७- शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश नाहीच - अध्यक्ष अनिता शेटे
शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी इतिहासात पहिल्यांदाच महिलेची निवड झाल्यानंतर तरी शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य महिलांकडून व्यक्त होत आहे. मात्र 'शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश वर्ज्यच असेल असे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिता शेटे यांनी स्पष्ट केल्याने महिलांना समानतेची वागणूक मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे.संस्थानाची परंपरा यापुढेही चालूच राहिल, असे शेटे यांनी स्पष्ट केल्याने महिला भाविकांची निराशा झाली आहे. आम्ही महिलांना चौथऱ्यावर प्रवेश घेऊच देणार नाही, अशी भूमिका शेटे यांनी घेतली. जर अध्यक्षपदी महिला चालते, तर दर्शनासाठी महिला का चालत नाही, असा प्रश्न विचारला असता, पूर्वापारपासून शनीदेवावर महिलेची सावलीही पडता कामा नये, असं म्हटलं जात असल्याने चौथऱ्यावर प्रवेश दिला जाणार नाही, असं अनिता शेटे यांनी सांगितलं
८- खुशखबर! म्हाडाच्या 4275 घरांची 24 फेब्रुवारीला लॉटरी
मुंबईत घरं घेणार्यांसाठी खुशखबर! म्हाडा कोकण मंडळाची येत्या 24 फेब्रुवारीला लॉटरी निघणार आहे. तब्बल 4275 घरासाठी लॉटरी निघणार असून ठाणे, विरार, मीरारोड आणि वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येनं घर उभारण्यात आली आहेत. 12 जानेवारीला याबाबत जाहिरात प्रसिद्ध होईल. ऑनलाईन नोंदणी 13 जानेवारीला, तर अर्ज भरण्याची सुरुवात 15 जानेवारीला होणार असून ऑनलाईन नोंदणी अंतिम तारीख 7 फेब्रुवारी तर अर्ज दाखल अंतिम तारीख 9 फेब्रुवारी असणार आहे. यामध्ये विरारमधल्या 3755 घरांचा तर घोडबंदर ठाणे-मीरारोड इथल्या 310 घरांचा समावेश असणार आहे. तसंच ठाण्यातील बाळकुमंबमधल्या 20, कावेसारमधल्या 164 घरं अल्प उत्त्पन्न गटातील असतील. त्यासोबत वेंगुर्लामध्ये 27 घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना घरांसाठी लॉटरीद्वारे आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
९- राज्यातील १२ साखर कारखान्यांचे गाळप रद्द; FRP न देणाऱ्या कारखान्यांवर साखर आयुक्तांची कारवाई
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१०- पुणे; गुगलचा अतिवापर, युवक जे. जे. रुग्णालयात दाखल
अवघ्या एका क्लिकमध्ये माहितीचं भांडार आपल्यासमोर आणणारी वेबसाईट म्हणजे गुगल… आजकाल अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी गुगलचा आपण सर्रास वापर करतो. पण हेच गुगल तुम्हाला अडणचणीचं ठरु शकतं. म्हणूनच याचा वापर जरा जपूनच करा. मुंबईतील जे. जे. रूग्णालयात एक असा पेशंट दाखल झाला आहे की, ज्यांचं आजाराचं कारण अती गुगलिंग होतं. मुंबईमधील एका ३० वर्षीय आयटी प्रोफेशनमध्ये असणाऱ्या एका युवकाला सतत गुगल करण्याच्या सवयीनं सायबरकॉन्ड्रीया या मानसिक आजारानं विळखा घातला आहे.
सायबरकॉन्ड्रीया या आजाराची लक्षणं:
> कुठल्याही लहान गोष्टीसाठी सतत गुगलिंग करणं.
> कोणताही छोटा आजाराची कारणं गुगलवर शोधणं.
> गुगलवर येणाऱ्या १० कारणांपैकी एखादं भीतीदायक कारण पाहून त्यावर डॉक्टरांपेक्षाही जास्त विश्वास ठेवणं. अशी लक्षणं या आजारात दिसतात.
११- पुणे; मोबाईलवर गाणं ऐकण्यास मनाई केल्याने तरुणीची आत्महत्या
मोबाईलवर गाणं ऐकण्यास आईने मनाई केल्याच्या रागातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये काळेवाडी येथे घडली. मृगनयनी पाचपिंडे असे आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय तरुणीचे नाव आहे. मृगनयनी ही इंदिरा महाविद्यालयात बीसीए करत होती. सकाळी मृगनयनी घरातच मोबाईलवर गाणे लावून ऐकत बसली होती. त्यामुळे तिच्या आईने तिच्या हातातील मोबाईल काढून घेत तिला गाणे ऐकण्यास मनाई केली व घरातील कामात थोडा हातभार लावण्यास सांगितले. यामुळे चिडलेली मृगनयनी घराबाहेर पडली. त्यानंतर काळेवाडी येथील ज्योतिबा उद्यानाजवळील पवना नदी घाटावरून तिने नदीत उडी घेत आत्महत्या केली.
१२- ठाणे; दर रविवारी रस्ते साफ करा, हाणामारी करणाऱ्यांना कोर्टाची अनोखी शिक्षा
ठाण्यात दसरा मिरवणुकीदरम्यान हाणामारी करणाऱ्या तरुणांना मुंबई हायकोर्टाने अनोखी शिक्षा सुनावली आहे. हाणामारी करणाऱ्या 4 तरुणांना 6 महिन्यांपर्यंत दर रविवारी 8 तास रस्ते झाडण्याची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. आता आधीच इज्जतीचा कचरा झालेले हे तरुण गपगुमान कोर्टाने प्रायाश्चितासाठी दिलेली शिक्षा भोगत आहेत. त्याचं झालं असं की, नवरात्रोत्सवादरम्यान 3 तरुणांनी एका तरुणीची छेड काढली. त्यावेळी एका तरुणाने यांना जाब विचारला. मग काय… या तिघांनी जाब विचारणाऱ्या चोप चोप चोपला. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना अटक केली आणि कोर्टाने शिक्षा सुनावली ती थेट झाडू मारण्याची. आम्ही केलेल्या गुन्ह्याचं आम्ही प्रायश्चित करत आहोत. शिवाय, आम्हाला आमच्या कृत्याचं वाईटही वाटतं आहे, असं शिक्षा झालेल्यांपैकी एक तरुणाचं म्हणणं आहे. या तरुणांना कोर्टाच्या शिक्षेनंतर उपरती झाली आहे. नुसती उपरती नव्हे, या तरुणांवर या शिक्षेचा इतका परिणाम झाला आहे की, ते आता इतरांनाही चांगलं वागण्याचे सल्ले देऊ लागले आहेत.
१३- भिवंडी; पूर्ववैमनस्यातून शेजार्यानं दीड वर्षाच्या मुलाला कारखाली चिरडलं!
पूर्ववैमनस्यातून शेजार्यानं दीड वर्षांच्या चिमुरड्याला गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघडकीस आली. देवांग पाटील, असं या चिमुकल्याचं नाव होतं. त्याला मोटारीखाली चिरडणारा विश्वनाथ पाटील पसार झाला आहे. देवांगचे वडील देवानंद पाटील आणि विश्वनाथ हुलावले हे ऐकमेकांचे शेजारी आहेत. या दोघांमध्ये गेल्या 15 वर्षांपासून घरातील सांडपाण्यावरून वाद आहे. याआधीही विश्वानाथ यानं या वादातून दयानंद यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही किरकोळ कारणावरून दोन्ही कुटुंबियांमध्ये कायम कुरबुरी सुरू होत्या. त्याचाच राग मनात धरून चिमुकला देवांग घरासमोर खेळत असल्याची संधी साधून विश्वनाथनं त्याच्या अंगावर गाडी घातली. देवांग गाडीखाली आल्याचं पाहून जवळच असलेली देवांगची काकी दर्शना आणि शेजारील द्वारकनाथ माळी यांनी मुलगा गाडीखाली आल्याची आरडाओरड केली. मात्र विश्वनाथ एवढ्यावरचं न थांबता त्याने देवांगच्या अंगावर उलट रिव्हर्स गाडी घेवून आणखीन एकदा त्याला चिरडले. दरम्यान, भिवंडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी सुरूवातीला अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीअंती आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४- तामिळनाडूतल्या मंदीरात जीन्स व स्कर्ट घालण्यास मज्जाव करण्याच्या निर्णयाला मद्रास हायकोर्टाने स्थगिती
१५- उत्तरप्रदेश गाझियाबादमध्ये गाडीने दोन दुचाकीना धडक दिली, अपघातात पाच जण ठार
१६- अंबरनाथच्या बुवापाडा येथे एकाच कुटुंबातील चौघांनी घेतले जाळून, सर्वांवर जे.जे.रुग्णालयात उपचार सुरू
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- 'होणार सून..'च्या जान्हवीला बाळ, बारशाने मालिकेचा निरोप
कटप्पाने बाहुबलीला का मारलं आणि जान्हवीचं बाळंतपण कधी होणार या प्रेक्षकांना पडलेल्या दोन प्रश्नांपैकी एकाचं उत्तर सापडलं आहे. ‘झी मराठी’वरुन लवकरच निरोप घेणारी लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ मधील श्री-जान्हवीला मुलगी झाली आहे. श्री-जान्हवीच्या लेकीच्या बारशाने या बहुचर्चित मालिकेचा समारोप होणार आहे. 23 जानेवारी रोजी प्रक्षेपित होणाऱ्या शेवटच्या भागात हे पाहता येईल. गेली अडीच वर्ष ‘होणार सून..’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. जान्हवीचं लांबलेलं बाळंतपण हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला होता, त्यामुळे मालिकेसोबतच या प्रश्नालाही पूर्णविराम मिळणार आहे. मात्र व्हॉट्सअॅपवर जान्हवी आणि श्रीचे नवे मेसेजही सुरु होण्याची शक्यता आहे. 15 जुलै 2013 ला प्रक्षेपित झालेल्या पहिल्या भागापासून ‘होणार..’ ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. नायक, नायिका आणि तिच्या सहा सासवा अशी आगळीवेगळी संकल्पना घेऊन आलेल्या झी मराठी वाहिनीला ‘होणार’ने टीआरपीचे आकडे वर ठेवण्यास साथ दिली. ‘पसंत आहे मुलगी’ ही नवी मालिका 25 तारखेपासून ‘होणार सून…’ ची जागा घेणार आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१८- माळेगाव यात्रा लावणी महोत्सव; सुरेखा पुणेकरांची माळेगावात लागणार हजेरी
http://goo.gl/gDpp4K
~~~~~~~~~~~~~~~
१९- नगर पंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा, भाजपची धुळदाण
http://goo.gl/3IhhGS
~~~~~~~~~~~~~~~
२०- सत्तर वर्षाचा खय्यूम पहेलवान माळेगावच्या आखाडयात
http://goo.gl/q8rOLx
~~~~~~~~~~~~~~~
२१- माळेगाव यात्रा; सोमठाण्याचा लालकंधारी वळू माळेगाव चँम्पियन
http://goo.gl/ttP3CS
~~~~~~~~~~~~~~~
२२- सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर शेतक-यांनी वापर करावा- जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले
http://goo.gl/x4A2Jk
~~~~~~~~~~~~~~~
२३- पारंपारिक लोककला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करू- आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
http://goo.gl/0zBRgb
~~~~~~~~~~~~~~~
२४- दुष्काळजन्य परिस्थितीत जोडव्यवसाय स्विकारने काळाची गरज - जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोंडगे
http://goo.gl/fLpL1g
~~~~~~~~~~~~~~~
२५- करु नका परिसर घाण सारा गाव निर्मल ठेवा छान... माळेगाव यात्रेत आरोग्य आणि स्वच्छतेचे प्रबोधन
http://goo.gl/21VxDQ
~~~~~~~~~~~~~~~
काम करताना चिंता करू नका. जे व्हायचे ते होणारच आहे. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत
[तातेराव इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
नमस्कार लाईव्हचे एकूण ग्रुप १५००
आपली जाहिरात पाठवा What's Upवर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख लोकांपर्यंत
एक महिन्यात ९० लाख What's Up मॅसेजेस......
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१५०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment